फोटो सौजन्य – X
भारत विरुद्ध इंग्लड यांच्यामध्ये पाच सामन्याची मालिका झाली आहे. यामध्ये भारताच्या संघाने त्याचबरोबर इंग्लिश खेळाडूंनी त्याचा जोर दाखवला आहे. काही खेळाडू या मालिकेचे चार सामने खेळले तर काही खेळाडू हे तीन. लाॅर्ड्स कसोटीमध्ये झालेल्या दुखापतीमुळे इंग्लडचा कर्णधार बेन स्टोक्स हा पाचव्या कसोटी सामन्यामधुन बाहेर झाला. त्याने संपुर्ण मालिकेमध्ये कमालीची कामगिरी केली होती. त्यानंतर लगेचच इंग्लडचे काही खेळाडू हे द हंड्रेड 2025 मध्ये सामील झाले आहेत.
द हंड्रेड 2025 स्पर्धेचा नवा सिझन सध्या सुरु आहे, यामध्ये अनेक नवे स्टार खेळाडू सामील झाले आहेत. अलीकडेच भारत आणि इंग्लंड यांच्यात ५ सामन्यांची कसोटी मालिका खेळवण्यात आली. त्यासाठी टीम इंडियाने इंग्लंडचा दौरा केला. मालिकेतील शेवटच्या सामन्यात टीम इंडियाने ओव्हल मैदानावर इंग्लंडचा ६ धावांनी पराभव केला आणि मालिका २-२ अशी संपवली. शेवटच्या सामन्यात इंग्लंडचा कर्णधार बेन स्टोक्स दुखापतीमुळे खेळू शकला नाही आणि त्याच्या अनुपस्थितीत ऑली पोपने कर्णधारपद भूषवले.
बेन स्टोक्स बऱ्याच काळानंतर कसोटी क्रिकेटमध्ये परतला आणि ही मालिका त्याच्यासाठी खूप चांगली होती. या मालिकेनंतर बेन स्टोक्सला हॅरी ब्रुकच्या संघाचे मार्गदर्शक बनवण्यात आले आहे. इंग्लंडमध्ये द हंड्रेड २०२५ सुरू झाले आहे. या स्पर्धेत बेन स्टोक्स खेळाडूची नाही तर मेंटरची भूमिका साकारताना दिसणार आहे. बेन स्टोक्सला नॉर्दर्न सुपरचार्जर्सचा मेंटर बनवण्यात आले आहे. हॅरी ब्रूक या संघाचे नेतृत्व करणार आहे. यापूर्वी बेन स्टोक्स नॉर्दर्न सुपरचार्जर्सकडून खेळला आहे. स्टोक्सने या संघासाठी ५ सामने खेळले आहेत.
ज्यामध्ये त्याने फलंदाजी करताना फक्त १४ धावा काढल्या आणि गोलंदाजी करताना ३ विकेट घेतल्या. वर्कलोड मॅनेजमेंटमुळे स्टोक्सने द हंड्रेडमधून आपले नाव मागे घेतले. इंग्लंडला ऑस्ट्रेलियासोबत अॅशेस मालिकाही खेळायची आहे, ज्यामध्ये बेन स्टोक्स महत्त्वाची भूमिका बजावणार आहे.
🚨 The Hundred 2025
Ben Stokes has joined Northern Superchargers as a mentor for the duration of The Hundred.#CricketTwitter pic.twitter.com/NgEyOsCcki
— T20 Franchise Rosters (Men) (@t20tracker) August 7, 2025
आतापर्यंत नॉर्दर्न सुपरचार्जर्सना द हंड्रेडमध्ये एकदाही विजेतेपद जिंकता आलेले नाही. यावेळी, नवीन कर्णधार हॅरी ब्रुकच्या खांद्यावर मोठी जबाबदारी असणार आहे. भारतासोबत खेळलेल्या कसोटी मालिकेत हॅरी ब्रुकची कामगिरी अद्भुत होती. या मालिकेत त्याच्या बॅटमधून ४०० हून अधिक धावा आल्या आणि त्याला प्लेअर ऑफ द सिरीज म्हणूनही निवडण्यात आले. अशा परिस्थितीत, नॉर्दर्न सुपरचार्जर्सना या हंगामात हॅरी ब्रुककडून खूप अपेक्षा असतील.