संजू सॅमसन अभिषेक नायरची प्रतिक्रिया (फोटो- सोशल मीडिया)
Sanju Samson: टीम इंडियाचा स्टार खेळाडू संजू सॅमसनसाठी ११ नोव्हेंबर हा दिवस दुहेरी आनंद घेऊन आला आहे. आज सॅमसनचा वाढदिवस आहे. त्याच्या ३२ व्या वाढदिवसानिमित्त एक खास भेट मिळाली. आगामी सय्यद मुश्ताक अली ट्रॉफी २०२६ साठी संजू सॅमसनची केरळम क्रिकेट संघाच्या कर्णधारपदी नियुक्ती करण्यात आली आहे. या स्पर्धेसाठी केरळ क्रिकेट असोसिएशनने १८ सदस्यीय संघाची घोषणा केली असून केरळला यश मिळवून देण्याची जबाबदारी आता संजूच्या खांद्यावर आहे. ही स्पर्धा १४ नोव्हेंबरपासून सुरू होणार असून, केरळ आपल्या मोहिमेची सुरुवात मध्य प्रदेशविरुद्ध करेल.
संजू सॅमसन या स्पर्धेत कर्णधार म्हणून केरळचे नेतृत्व करणार आहे. त्याच्याकडे १८ सदस्यीय संघाची कमान सोपवण्यात आली आहे.केरळचा पहिला सामना मध्य प्रदेशविरुद्ध आहे. हा सामना मोहाली येथील पीसीए स्टेडियमवर खेळला जाईल. या दोन्ही संघांना गट ‘क’ मध्ये ठेवण्यात आले आहे.
सैयद मुश्ताक अली ट्रॉफी २०२६ साठी केरळला गट ‘क’ मध्ये स्थान देण्यात आले आहे . या गटात मध्य प्रदेश, आंध्र प्रदेश, आसाम, हिमाचल प्रदेश, महाराष्ट्र, पुदुचेरी आणि त्रिपुरा यांचा समावेश आहे. केरळचा पहिला सामना १४ नोव्हेंबर रोजी मध्य प्रदेशविरुद्ध होईल.
गेल्या हंगामातही संजू सॅमसनने केरळचे कर्णधारपद भूषवले होते. मात्र, त्याच्या नेतृत्वाखाली संघ ‘अ’ गटात चौथ्या स्थानावर राहिला आणि बाद फेरीसाठी पात्र ठरू शकला नाही. यावेळी, संघ आपल्या मागील कामगिरीला मागे टाकून पुढे जाण्याचा प्रयत्न करेल. संघाला संजूच्या अनुभवाकडून आणि नेतृत्वाकडून मोठ्या अपेक्षा असतील.
सय्यद मुश्ताक अली ट्रॉफी संजू सॅमसनसाठीही महत्त्वाची आहे. कारण तो अलीकडील टी-२० आंतरराष्ट्रीय सामन्यांमध्ये मोठी धावसंख्या उभारण्यात अपयशी ठरला आहे. न्यूझीलंडविरुद्धच्या शेवटच्या चार टी-२० सामन्यांमध्ये त्याने १४, १८, ४ आणि ४ अशा धावा केल्या आहेत. सलग कमी धावा केल्यानंतर, आता त्याला मायदेशात आपल्या फलंदाजीचे कौशल्य दाखवण्याची संधी मिळणार आहे.
संजूने आतापर्यंत भारतासाठी ८२ टी२० आंतरराष्ट्रीय सामने खेळले आहेत. त्याने ७४ डावांमध्ये १५८.२४ च्या स्ट्राइक रेटने १,८४२ धावा केल्या आहेत. त्याच्या नावावर तीन शतके आणि ११ अर्धशतके आहेत. या फॉरमॅटमधील त्याची सर्वोच्च धावसंख्या १११ आहे.
संजू सॅमसन (कर्णधार), रोहन एस कुन्नम्मल, गोविंद देव , मोहम्मद अझरुद्दीन (विकेटकीपर), अहमद इमरान, कृष्ण देवन आर जे, विष्णू विनोद (विकेटकीपर), सलमान निझार, विघ्नेश पुथूर, अखिल स्करिया, कार्तिक बी नायर, निखिल एम, जलाज सक्सेना, बीजू नारायणन एन, शराफुद्दीन एनएम, निधीश एम डी, वैशाख चंद्रन आणि आसिफ के एम.
Ans: संजू सॅमसनची सय्यद मुश्ताक अली ट्रॉफी २०२६ साठी केरळ क्रिकेट संघाच्या कर्णधारपदी नियुक्ती करण्यात आली आहे.
Ans: सय्यद मुश्ताक अली ट्रॉफी २०२६ स्पर्धेला १४ नोव्हेंबरपासून सुरुवात होणार आहे.
Ans: केरळचा पहिला सामना १४ नोव्हेंबर रोजी मध्य प्रदेशविरुद्ध मोहाली येथील पीसीए स्टेडियमवर खेळला जाणार आहे.






