Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Local Body Election |
  • Delhi Blast |
  • Political news |
  • Ind vs SA Test |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Sanju Samson : संजू सॅमसनचे वडील धोनी-कोहली, रोहित आणि द्रविडवर भडकले

संजू सॅमसनचे वडील सॅमसन विश्वनाथ यांचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे, ज्यामध्ये त्यांनी करिअरच्या सुरुवातीलाच आपल्या मुलाचा वेळ वाया घालवल्याबद्दल माजी कर्णधारांवर आरोप केले आहेत.

  • By शुभांगी मेरे
Updated On: Nov 14, 2024 | 11:56 AM
फोटो सौजन्य - सोशल मीडिया

फोटो सौजन्य - सोशल मीडिया

Follow Us
Close
Follow Us:

संजू सॅमसन : भारताचा संघ सध्या दक्षिण आफ्रिकेविरुद्ध मालिका खेळत आहे. टीम इंडियाने चार सामान्यांच्या मालिकेत दोन सामन्यांमध्ये विजय मिळवला आहे तर एक सामन्यात टीम इंडियाचा पराभव झाला आहे. दोन सामान्यांच्या विजयासह भारताच्या संघाने मालिकेमध्ये २-१ अशी आघाडी घेतली आहे. भारताच्या संघाने याआधी बांग्लादेशविरुद्ध झालेल्या मालिकेमध्ये सुद्धा कमालीची कामगिरी करत मालिका एकतर्फी जिंकली होती. या दोन्ही मालिकेमध्ये भारताच्या संघाचा फलंदाज संजू सॅमसन स्टार बनला. भारतीय संघात स्थान मिळवण्यासाठी संघर्ष करणारा संजू सॅमसन काही काळापासून टीम इंडियाचा भाग आहे. मात्र, वेळोवेळी सोशल मीडियावर त्याला संघामध्ये स्थान न मिळाल्यामुळे ट्रेंड होत असतो. त्याचे नाव संघात नसल्याने चाहते निराश झाले आहेत.

हेदेखील वाचा – बॉर्डर गावस्कर ट्रॉफीसाठी टीम इंडियाची तयारी सुरु! १८ खेळाडूंपैकी कोणाला मिळणार प्लेइंग ११ मध्ये जागा?

संजूने गेल्या एका महिन्यात T20 आंतरराष्ट्रीय सामन्यात दोन शतके झळकावली असली तरी गेल्या दोन सामन्यांमध्ये तो शून्यावरही बाद झाला आहे. दरम्यान, संजू सॅमसनचे वडील सॅमसन विश्वनाथ यांचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे, ज्यामध्ये त्यांनी करिअरच्या सुरुवातीलाच आपल्या मुलाचा वेळ वाया घालवल्याबद्दल माजी कर्णधारांवर आरोप केले आहेत. MediaOne ला दिलेल्या मुलाखतीत विश्वनाथ म्हणाले, “असे 3-4 लोक आहेत ज्यांनी माझ्या मुलाच्या महत्त्वाच्या कारकिर्दीची 10 वर्षे उध्वस्त केली… धोनी जी, विराट जी, रोहित जी आणि प्रशिक्षक द्रविड जीसारखे कर्णधार.”

संजू सॅमसनने 2015 मध्ये खेळाच्या सर्वात लहान फॉरमॅटमध्ये भारतासाठी पदार्पण केले. वयाच्या 21 व्या वर्षी त्याने देशांतर्गत क्रिकेटमध्ये स्वतःची वेगळी ओळख निर्माण केली होती. मात्र, पदार्पण केल्यानंतर खराब फॉर्म आणि सांघिक संयोजनामुळे तो संघाचा नियमित सदस्य होऊ शकला नाही. मात्र, २०२१ पासून त्याला सातत्याने संधी मिळत आहेत.

Sanju samson father accused Dhoni,Rohit and Kohli for not picking his son in the team when he was averaging 28 in list A,35 in FC, and 27 in ipl until 2020 Sanju’s PR wants to hide this video from youpic.twitter.com/sYaQKoU9gu — π (@shinzohattori5) November 12, 2024

ते पुढे म्हणाले, “या चौघांनी माझ्या मुलाच्या आयुष्यातील 10 वर्षे उध्वस्त केली. पण त्यांनी त्याला जितका त्रास दिला तितकाच तो बाहेर पडला.” सॅमसनच्या वडिलांनी नवा कर्णधार सूर्यकुमार यादव आणि प्रशिक्षक गौतम गंभीर यांनाही सॅमसनला संधी दिल्याचे श्रेय दिले.

संजू सॅमसनने बांग्लादेशविरुद्ध झालेल्या मालिकेच्या शेवटच्या सामन्यात त्याने भारतीय मैदानावर शतक झळकावले. त्यानंतर त्याने दक्षिण आफ्रिकेविरुद्ध झालेल्या पहिल्याच सामन्यात त्याने पुन्हा सलग दुसऱ्या सामन्यात शतक झळकावले आणि अनेक विक्रम नावावर केले.

भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका यांच्यामध्ये शेवटचा T२० सामना १५ नोव्हेंबर रोजी खेळवला जाणार आहे. भारताच्या संघाला या मालिकेमध्ये जर विजय मिळवायचा असल्यास टीम इंडियाला शेवटचा सामना जिंकणे गरजेचे आहे. दक्षिण आफ्रिकेने शेवटचा सामन्यात विजय मिळवल्यास मालिकेचा निकाल अनिर्णयीत राहील.

Web Title: Sanju samsons father lashed out at ms dhoni virat kohli rohit dravid

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Nov 14, 2024 | 11:56 AM

Topics:  

  • cricket
  • Sanju Samson

संबंधित बातम्या

क्रिकेट विश्वातील जुनी आणि प्रसिद्ध कसोटी मालिकेचा होणार शुभारंभ! जाणून घ्या ‘अ‍ॅशेस’चा इतिहास
1

क्रिकेट विश्वातील जुनी आणि प्रसिद्ध कसोटी मालिकेचा होणार शुभारंभ! जाणून घ्या ‘अ‍ॅशेस’चा इतिहास

‘मी हरमनप्रीत आहे का?’ निगार सुलतानाने मारहाणीचे आरोप फेटाळत, भारतीय कॅप्टनवर साधला निशाणा! कर्णधाराचा नवा ड्रामा सुरु
2

‘मी हरमनप्रीत आहे का?’ निगार सुलतानाने मारहाणीचे आरोप फेटाळत, भारतीय कॅप्टनवर साधला निशाणा! कर्णधाराचा नवा ड्रामा सुरु

तीन सामन्यात पराभव, भारताच्या संघाचे WTC फायनलमध्ये जाण्याचे आव्हान होणार कठीण! जाणून घ्या संपूर्ण समीकरण
3

तीन सामन्यात पराभव, भारताच्या संघाचे WTC फायनलमध्ये जाण्याचे आव्हान होणार कठीण! जाणून घ्या संपूर्ण समीकरण

IND vs SA : खेळपट्टीची चूक नाही, फलंदाजांची चूक…गौतम गंभीरच्या समर्थनार्थ उतरले सुनील गावस्कर
4

IND vs SA : खेळपट्टीची चूक नाही, फलंदाजांची चूक…गौतम गंभीरच्या समर्थनार्थ उतरले सुनील गावस्कर

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.