Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • सोम, 17 ऑगस्ट 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • IND vs SL |
  • Politics |
  • NEET Exam |
  • maharashtra |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

IND vs IRE: संजू सॅमसनची एक चूक पडणार ठरणार भारी! Vaibhav Sooryavanshi करणार ओपनिंग?

टीम इंडिया आयर्लंडविरुद्धचा पहिला टी२० सामना ३४ धावांनी हरली. संजू सॅमसन अवघ्या ५ धावांवर बाद झाला. सुरुवातीच्या जोडीपैकी फक्त अभिषेक शर्माने चांगली कामगिरी केली होती.

  • By दिपाली नाफडे
Updated On: Jun 27, 2026 | 11:47 AM
दुसऱ्या सामन्यात संजूची जागा वैभव घेणार का (फोटो सौजन्य - इन्स्टाग्राम)

दुसऱ्या सामन्यात संजूची जागा वैभव घेणार का (फोटो सौजन्य - इन्स्टाग्राम)

Follow Us
Follow Us:
  • भारताने गमावला आयर्लंडविरूद्ध पहिला सामना 
  • संजू सॅमसन केवळ ५ धावांवर झाला बोल्ड 
  • दुसऱ्या सामन्यात वैभव सूर्यवंशीला खेळवणार का?
आयर्लंडविरुद्धच्या पहिल्या टी२० सामन्यात भारताचा ३४ धावांनी दारुण पराभव झाल्यानंतर, संघरचनेबाबतची चर्चा तीव्र झाली आहे. नवीन कर्णधार श्रेयस अय्यरच्या नेतृत्वाखालील या पराभवामुळे, युवा फलंदाज वैभव सूर्यवंशीला अंतिम ११ खेळाडूंमध्ये स्थान देण्याची मागणी जोर धरू लागली आहे. मालिकेतील पहिल्या सामन्यात, संघ व्यवस्थापनाने नुकत्याच संपलेल्या टी२० विश्वचषक २०२६ विजेत्या संजू सॅमसन आणि अभिषेक शर्मा या सलामीच्या जोडीवर विश्वास ठेवला होता, ज्यामुळे सूर्यवंशीला त्याच्या आंतरराष्ट्रीय पदार्पणासाठी प्रतीक्षा करावी लागली. तथापि, पहिल्या सामन्यातील फलंदाजांच्या निराशाजनक कामगिरीनंतर, रविवारी होणाऱ्या दुसऱ्या टी२० सामन्यात मोठ्या बदलाचे संकेत मिळत आहेत.

IND vs IRE: एक मोठी चूक आणि भारताचा लज्जास्पद पराभव! आयर्लंडमध्ये केली नाचक्की

संजू सॅमसनला संघाबाहेर बसावे लागू शकते

टी२० विश्वचषक २०२६ मध्ये ‘प्लेअर ऑफ द टूर्नामेंट’ ठरलेल्या संजू सॅमसनसाठी हा सामना अत्यंत निराशाजनक ठरला, तो ४ चेंडूंमध्ये केवळ ५ धावा करून पॅव्हेलियनमध्ये परतला. या खराब कामगिरीनंतर, माजी भारतीय क्रिकेटपटू आणि प्रसिद्ध समालोचक संजय मांजरेकर यांनी वरिष्ठ सलामीवीरांना कडक संदेश दिला आहे. मांजरेकर यांनी इशारा दिला आहे की, आयपीएल २०२६ मध्ये राजस्थान रॉयल्ससाठी ७७६ धावा करणारा १५ वर्षीय वैभव सूर्यवंशी बेंचवर बसलेला असताना, प्लेइंग इलेव्हनमधील कोणाचेही स्थान कायमचे नाही.

संजू सॅमसनला सावधगिरी बाळगण्याची गरज आहे

संजय मांजरेकर यांनी संजू आणि अभिषेकला इशारा दिला. त्यांनी स्पष्टपणे सांगितले, “संजू सॅमसनला आता आपल्या स्थानाबद्दल खूप सावधगिरी बाळगण्याची गरज आहे, कारण वैभव सूर्यवंशी त्याच्यासाठी आणि अभिषेक शर्मासाठी एक मोठे आव्हान आहे. तो संघात असताना कोणीही आपले स्थान गृहीत धरू नये.”

Jai Moondra: जन्म भारतात, आयर्लंडच्या संघातून पदार्पण; पहिल्याच चेंडूवर संजू सॅमसनला केले Bold, कोण आहे जय मुंद्रा

वैभव सूर्यवंशीबद्दल हे विधान

तथापि, मांजरेकर यांनी हे देखील स्पष्ट केले की, सूर्यवंशी पहिल्या सामन्यात खेळला असता तरी, निकालात कदाचित फारसा फरक पडला नसता. त्यांच्या मते, १८३ धावांच्या मोठ्या लक्ष्याचा पाठलाग करताना, पॉवरप्लेच्या पहिल्या सहा षटकांमध्ये आवश्यक असलेला आक्रमक वेग संपूर्ण सामन्यात टिकवून ठेवणे गरजेचे होते. मांजरेकर यांचा विश्वास आहे की, सूर्यवंशीच्या पदार्पणाची मागणी वाढत असली तरी, सध्या सलामीची जागा फक्त अभिषेक आणि सॅमसन यांच्यासाठीच आहे आणि वरच्या फळीत कोणतीही जागा रिक्त नाही. वैभव सूर्यवंशीला न खेळवल्यामुळे चाहत्यांची मात्र नक्कीच निराशा झाली आहे. 

Web Title: India vs ireland first t20i sanju samson only scored 5 runs vaibhav sooryavanshi may be in playing 11 for 2nd game

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jun 27, 2026 | 11:47 AM

Topics:  

  • ind vs ire
  • Sanju Samson
  • Vaibhav Sooryavanshi

संबंधित बातम्या

Vaibhav Sooryavanshi: फक्त २ सिक्स आणि वैभव सूर्यवंशीचा होणार महारेकॉर्ड, अफगाणिस्तानविरूद्ध कहर!
1

Vaibhav Sooryavanshi: फक्त २ सिक्स आणि वैभव सूर्यवंशीचा होणार महारेकॉर्ड, अफगाणिस्तानविरूद्ध कहर!

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.