भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया यांच्यामध्ये २२ नोव्हेंबरपासून बॉर्डर गावस्कर ट्रॉफीचे सामने सुरु होणार आहेत. यासाठी भारताचा संघ ऑस्ट्रेलियाला पोहोचला आहे. पहिला सामना भारताचा संघ जसप्रीत बुमराहच्या नेतृत्वाखाली खेळणार असा अंदाज वर्तवला जात आहे. भारताचा संघ ऑस्ट्रेलियाविरुद्ध लढण्यासाठी सध्या मैदानामध्ये कसरत करत आहे. बीसीसीआयने गावस्कर ट्रॉफीसाठी भारताच्या १८ खेळाडूंची निवड केली आहे. यामध्ये प्लेइंग ११ मध्ये टीम इंडियाच्या कोणत्या खेळाडूंना संघामध्ये स्थान मिळणार हे पाहणं मनोरंजक ठरेल.
भारताचा संघाची बॉर्डर गावस्कर ट्रॉफीसाठी मैदानात जोरदार तयारी. फोटो सौजन्य - BCCI सोशल मीडिया
भारताचा अनुभवी फलंदाज आणि यष्टीरक्षक रिषभने न्यूझीलंडविरुद्ध त्याच्या अंदाजात विस्फोटक फलंदाजी करून चाहत्यांची मनं जिंकली आहेत. बॉर्डर गावस्कर ट्रॉफीमध्ये तो कशी कामगिरी करेल हे पाहणं मनोरंजक ठरेल. फोटो सौजन्य - BCCI सोशल मीडिया
भारताच्या संघाने न्यूझीलंडविरुद्ध झालेल्या मालिकेमध्ये पराभव स्वीकारावा लागला. त्यानंतर टीम इंडियाचे कोच गौतम गंभीर आणि अभिषेक नायर यांच्यावर प्रश्न उपस्थित करण्यात आले होते आता त्यांचा ऑस्ट्रेलियाविरुद्ध कशाप्रकारे प्लॅन असेल यावर क्रिकेट प्रेमींची नजर असणार आहे. फोटो सौजन्य - BCCI सोशल मीडिया
बांग्लादेशविरुद्ध झालेल्या मालिकेत नितीश कुमार रेड्डी भारतीय संघासाठी कमालीची कामगिरी केली आहे त्यामुळे त्याला बॉर्डर गावस्कर ट्रॉफीमध्ये खेळण्याची संधी देखील मिळाली. फोटो सौजन्य - BCCI सोशल मीडिया
भारताचा कर्णधार रोहित शर्मा पहिल्या सामन्यांमध्ये नसल्यामुळे त्याच्या जागेवर शुभमन गिल संघासाठी सलामी फलंदाज म्हणून मैदानामध्ये उतरू शकतो. फोटो सौजन्य - BCCI सोशल मीडिया
भारताच्या संघ ऑस्ट्रेलियाविरुद्ध होणाऱ्या मालिकेचा पाहिला सामना जसप्रीत बुमराहच्या नेतृत्वाखाली खेळणार आहे. बुमराह कशाप्रकारे भारताच्या संघाने कर्णधार पद सांभाळेल हे पाहणं उत्सुकतेचं ठरेल. फोटो सौजन्य - BCCI सोशल मीडिया
भारताचा दमदार फिरकी गोलंदाजांची जोडी रवींद्र जडेजा आणि रविचंद्रन अश्विन यांनी न्यूझीलंडविरुद्ध कमालीची कामगिरी केली होती त्यामुळे आता बॉर्डर गावस्कर ट्रॉफीमध्ये ते कशी कामगिरी करतात यावर नजर असणार आहे. फोटो सौजन्य - BCCI सोशल मीडिया
कोलकाता नाईट रायडर्सचा स्टार वेगवान गोलंदाज हर्षित राणाला संघामध्ये स्थान मागील काही मालिकेमध्ये मिळाले आहेत. परंतु अजुनपर्यत त्याला भारतीय संघाच्या प्लेइंग ११ मध्ये स्थान मिळाले नाही यावेळी त्याला खेळण्याची मिळणार की नाही हे पाहणं महत्वाचं ठरेल. फोटो सौजन्य - BCCI सोशल मीडिया