Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • raj thackeray |
  • IPL 2026 |
  • Marathi News |
  • crime news |
  • devendra fadnavis
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

भारताचा डंका! सात्विक-चिरागची विजयी गर्जना; Singapore Open 2026 जिंकून रचला इतिहास

Satwik-Chirag Won Singapore Open 2026 script history: भारताची स्टार बॅडमिंटन पुरुष दुहेरी जोडी सात्विक-चिरागने सिंगापूर ओपन 2026 जिंकून रचला इतिहास आहे.

  • By प्रियंका मुंदिनकेरी
Updated On: May 31, 2026 | 07:19 PM
photo- social media

photo- social media

Follow Us
Close
Follow Us:
  • बॅडमिंटनमध्ये भारताचा डंका
  • सात्विक-चिरागची ऐतिहासिक कामगिरी
  • सिंगापूर ओपन 2026 जिंकून रचला इतिहास
भारताच्या स्टार बॅडमिंटन पुरुष दुहेरी जोडीने पुन्हा एकदा जागतिक स्तरावर देशाचा झेंडा उंचावला आहे. सात्विकसाईराज रंकीरेड्डी (Satwiksairaj Rankireddy) आणि (Chirag Shetty) चिराग शेट्टी या स्टार जोडीने सिंगापूर ओपन 2026 सुपर 750 स्पर्धेचे विजेतेपद पटकावून इतिहास रचला आहे. रविवारी (३१ मे) खेळल्या गेलेल्या रोमांचक अंतिम सामन्यात भारतीय जोडीने इंडोनेशियाच्या फजर अल्फियान आणि मोहम्मद शोहिबुल फिक्री या जोडीचा यांचा १८-२१, २१-१७, २१-१६ असा पराभव केला. सुमारे एक तास आणि १३ मिनिटे चाललेल्या या हाय-व्होल्टेज सामन्यात, सात्विक- चिरागच्या जोडीने ऐतिहासिक कामगिरी केली. या विजयासह तब्बल दोन वर्षांचा किताबाचा दुष्काळही संपुष्टात आला.

RCB vs GT Final: फायनलआधी बंगळुरू पोलिसांचा मोठा निर्णय; RCB फॅन्सचा उत्साह ठरणार फिका? कडक निर्बंध लागू

पहिला सामना गमावल्यानंतर दमदार कमबॅक

सामन्याच्या सुरुवातीला भारतीय जोडीवर दबाव दिसून. सात्विक आणि चिराग पहिला गेम १८-२१ ने हरले. त्यानंतर त्यांनी पुनरागमन करत दुसरा गेम २१-१७ ने जिंकून सामना बरोबरीत आणला. त्यानंतर या भारतीय जोडीने निर्णायक आणि तिसऱ्या गेममध्ये संयम आणि अचूकता दाखवत इंडोनेशियन जोडीला २१-१६ ने हरवून चषक जिंकला. जेतेपद जिंकल्यानंतर दोन्ही खेळाडू कोर्टवर आडवे झाले. सात्विकने एक खास ‘बेबी सेलिब्रेशन’ केले, तर चिराग आनंदाने आपल्या जोडीदारावर उडी मारली. दोन्ही खेळाडूंनी नाचून आपला विजय साजरा केला. पुरस्कार सोहळ्यात त्यांना एक चषक, सुवर्णपदक आणि ७० लाख रुपयांची बक्षीस रक्कम प्रदान करण्यात आली.

👑 THE SMASHBROS REIGN SINGAPORE 🇮🇳 Pure power, ultimate grit, and a historic finish! Satwiksairaj Rankireddy and Chirag Shetty are your KFF Singapore Badminton Open 2026 MD Champions, conquering a 73-minute thriller against Indonesia’s Fajar Alfian and Muhammad Shohibul Fikri… pic.twitter.com/ghYhJRainB — BAI Media (@BAI_Media) May 31, 2026

भारतासाठी ऐतिहासिक क्षण

सात्विक-चिराग ही सिंगापूर ओपन पुरुष दुहेरीचे विजेतेपद जिंकणारी पहिली भारतीय जोडी ठरली आहे. याआधी त्यांनी २०२४ मध्ये शेवटचे विजेतेपद थायलंड ओपन जिंकले होते. त्यानंतर ते अनेक मोठ्या स्पर्धांच्या अंतिम फेरीत पोहोचले आहेत, परंतु त्यांना अद्याप एकही ट्रॉफी जिंकता आलेली नाही. त्यामुळे हा विजय त्यांच्या कारकिर्दीतील अत्यंत महत्त्वाचा मानला जात आहे. त्यांनी अखेर पुन्हा एकदा मोठ्या BWF सुपर 750 स्पर्धेचे विजेतेपद पटकावले.

उपांत्य फेरीत विश्वविजेत्यांवर मात

अंतिम फेरीपूर्वी भारतीय जोडीने उपांत्य सामन्यात जागतिक क्रमवारीतील अव्वल आणि विद्यमान विश्वविजेते दक्षिण कोरियाच्या किम वोन-हो आणि सिओ स्युंग-जे या जोडीचा सरळ गेममध्ये पराभव केला होता. या विजयामुळेच भारतीय जोडीचा आत्मविश्वास अधिक वाढला होता.

IPL Final 2026: IPL फायनलचा थरार! विजेत्यावर होणार ‘इतक्या’ कोटींचा वर्षाव; उपविजेताही होणार मालामाल; जाणून घ्या प्राइज मनी

Web Title: Satwiksairaj rankireddy chirag shetty win singapore open 2026 bwf super 750 title marathi news

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: May 31, 2026 | 07:19 PM

Topics:  

  • Badminton

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.