फोटो सौजन्य - BCCI सोशल मीडिया
भारत विरुद्ध न्यूझीलंड : भारत विरुद्ध न्यूझीलंड यांच्यामध्ये सध्या दुसरा कसोटी सामना २४ ऑक्टोबरपासून सुरू झाला आहे. या सामन्याची पहिली इनिंग झाली आहे आणि ते पाहता भारताच्या संघाच्या हातून सामना निसटताना दिसत आहे. दुसऱ्या दिनाच्या समाप्तीनंतर न्यूझीलंडच्या संघाकडे ३०१ धावांची आघाडी आहे. भारत न्यूझीलंड दुसऱ्या कसोटी सामन्यात नाणेफेक जिंकून न्यूझीलंड संघाचा कर्णधार टॉम लॅथमने फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. त्यानंतर दमदार फटकेबाजी करत न्यूझीलंडच्या संघाने सुरुवातीपासूनच भारतीय संघावर दबदबा कायम ठेवला होता.
भारताच्या संघाने पाहिले गोलंदाजी करत टीम इंडियाने न्यूझीलंडला २५९ धावांवर रोखले. यामध्ये भारताच्या गोलंदाजांमध्ये वॉशिंग्टन सुंदरने कमालीची कामगिरी करत ७ विकेट्स नावावर केले. तर भारताचा अनुभवी गोलंदाज रविचंद्रन अश्विनने ३ विकेट्स घेतले. परंतु भारताच्या संघाने फलंदाजीमध्ये निराशाजनक कामगिरी केली. भारताचा कर्णधार रोहित शर्मा दुसऱ्या कसोटीच्या पहिल्या इनिंगमध्ये एकही धाव न करता ९ चेंडू खेळून बाद झाला. भारताचा युवा सलामीवीर फलंदाज यशस्वी जयस्वालने संघासाठी ३० धावा केल्या. तर दुखापतीमधून सावरून शुभमन गिलने देखील संघासाठी ३० धावा केल्या. विराट कोहलीचा खराब फॉर्म कायम राहत त्याने फक्त एक धाव करून पॅव्हेलियनमध्ये परतला. सरफराज खान सुद्धा चांगली कामगिरी करू शकला नाही. जडेजाने संघासाठी ३८ धावा तर सुंदरने १८ धावा केल्या. त्या व्यतिरिक्त भारताचा एकही फलंदाज चांगली कामगिरी करू शकला नाही. भारताच्या संघाला न्यूझीलंडने १५६ धावांवर सर्वबाद केले.
कालपासून म्हणजेच २५ ऑक्टोंबरपासून भारत विरुद्ध न्यूझीलंड यांच्यामधील होणाऱ्या मालिकेच्या दुसऱ्या सामन्यात दुसऱ्या इनिंगची सुरुवात झाली आहे. यामध्ये न्यूझीलंडच्या संघाने १०३ धावांची आघाडी घेतली होती. आता दुसऱ्या दिनाच्या शेवटपर्यंत न्यूझीलंडने या सामन्यात ५ विकेट्स गमावून ३०१ धावांची आघाडी घेतली आहे. यामध्ये न्यूझीलंड संघासाठी कॅप्टन टॉम लॅथमने ८६ धावांची खेळी खेळली. डेव्हीड कॉनवेने १७ धावा केल्या तर वील यांगने २३ धावा केल्या. रचिन रविंद्रने पहिल्या सामन्यात त्याने कमालीची बॅट चालवली परंतु तो या सामन्याच्या दुसऱ्या इनिंगमध्ये ९ धावा करून बाद झाला. मिचेलने संघासाठी १८ धावा केल्या. आता न्यूझीलंडच्या संघांसाठी ब्लंडेलने ३० धावांची खेळी खेळली आणि सध्या त्याची साथ फिलिप्स देत आहे, फिलिप्सने आतापर्यंत २९ चेंडू खेळत ९ धावा करून सामन्यात टिकून आहे.
भारताच्या संघाने पहिल्या इनिंगमध्ये निराशाजनक कामगिरी केल्यामुळे संघाचे मोठे नुकसान झाले आहे. त्यामुळे न्यूझीलंडच्या संघाला मालिका नावावर करून घायची चागळी संधी आहे भारताच्या संघाला या मालिकेमध्ये कमबॅक करायचा असल्यास टीम इंडियाला दुसऱ्या इनिंगमधे मजबूत फलंदाजी करावी लागणार आहे त्याचबरोबर पाच विकेट्स लवकर घ्यावे लागणार आहेत.