फोटो सौजन्य - Aditya Raj Kaul सोशल मीडिया
Shahid Afridi’s controversial statement after the terrorist attack : पहलगाममधील प्राणघातक दहशतवादी हल्ल्यानंतर भारत सरकार मोठ्या प्रमाणात ऍक्टिव्ह पाहायला मिळाले आहेत. आज, सरकारने भारतामधील १६ पाकिस्तानी चॅनेल्सच्या यूट्यूब चॅनेल्सवर बंदी घातली आहे, ज्यामध्ये पाकिस्तानी दिग्गज माजी क्रिकेट खेळाडू शोएब अख्तरचे नाव देखील आहे. दरम्यान, पाकिस्तानचा माजी क्रिकेटपटू दानिश कनेरियाने एक्स वर शाहिद आफ्रिदीबद्दल धक्कादायक टिप्पणी केली. त्याचे मत आहे की शाहिद आफिदीलाही भारतातील कोणत्याही व्यासपीठावर स्थान देऊ नये असे त्याने स्पष्टपणे सांगितले.
माजी पाकिस्तानी क्रिकेटपटू दानिश कनेरियाने एक्सवरील एका वापरकर्त्याने उपस्थित केलेल्या प्रश्नाचे उत्तर दिले. वापरकर्त्याने विचारले की भारत सरकारने शाहिद आफ्रिदीच्या यूट्यूब चॅनेलवर बंदी का घातली नाही? तो स्वतःचा प्रचार करण्यासाठी आणि नागरिकांपासून इस्लामिक दहशतवाद्यांचे रक्षण करण्यासाठी पाकिस्तानी सैन्याकडून मोठ्या प्रमाणात पैसे घेतो हे सर्वज्ञात आहे.
IPL 2025 : दमदार खेळीनंतर विराट कोहलीच्या हाती लागली ऑरेंज कॅप, आरसीबीच्या या गोलंदाजांकडे पर्पल कॅप
वापरकर्त्याने उपस्थित केलेल्या प्रश्नाचे उत्तर देताना दानिश कनेरिया म्हणाले की, “तो सतत अतिरेकी विचारांशी स्वतःला जोडत आला आहे. दानिश कनेरिया हे म्हणाले की त्यांच्या मते त्याला भारतीय टेलिव्हिजनवर किंवा देशामध्ये कोणतेही काम देऊ नये. शिवाय, त्याने मला इस्लाम धर्म स्वीकारण्यास प्रवृत्त करण्याचा प्रयत्न केला आणि माझ्यासोबत जेवण करण्यास नकार दिला, जो मला अत्यंत अनादर करणारा वाटला.”
पहलगाम हल्ल्यादरम्यान शाहिद आफ्रिदीचा एक व्हिडिओ समोर आला आहे, ज्यामध्ये तो असे म्हणत असल्याचे दिसत आहे, “एक तास दहशतवादी तिथे दहशत माजवत राहिले आणि ८ लाख सैन्यातील कोणीही आले नाही आणि जेव्हा ते आले तेव्हा १० मिनिटांमध्ये त्यांनी पाकिस्तानला दोष दिला आहे. ते स्वतःच चुका करत राहतात, ते स्वतःच लोकांना मारतात, नंतर त्यांचे व्हिडिओ दाखवतात की ते जिवंत आहेत असे करू नका.”
पुढे तो असेही म्हणाला की, “पाहा, कोणताही देश दहशतवादाला पाठिंबा देत नाही. पाकिस्तान नेहमीच शांततेबद्दल बोलतो. आपला धर्म शांतीचा संदेश देतो. आपण नेहमीच भारताशी चांगले संबंध निर्माण करण्याचा प्रयत्न केला आहे. आपल्याला तिथे धमक्या येत आहेत. आपल्याला हे देखील माहित नव्हते की आपण जाणार की नाही. जर तुम्हाला २०१६ चा विश्वचषक आठवत असेल तर आपण लाहोरमध्ये होतो, मी कर्णधार होतो आणि संघाचे नेतृत्व करत होतो, आपल्याला उड्डाण मिळेल की नाही हे देखील माहित नव्हते. मला वाटते की क्रीडा राजनयिकता नेहमीच चांगली असते. तुमचा कबड्डी संघ आज येथे जात आहे, आम्ही आपापसात क्रिकेट खेळत नाही. जर तुम्हाला थांबायचे असेल तर पूर्णपणे थांबा किंवा जर तुम्हाला निघून जायचे असेल तर पूर्णपणे निघून जा.”