फोटो सौजन्य - Royal Challengers Bengaluru सोशल मीडिया
आयपीएल २०२५ चा हा १८ वा सिझन फारच मनोरंजक होत चालला आहे. पॉईंट टेबलमध्ये देखील कालच्या दोन्ही सामन्यानंतर अनेक बदल पाहायला मिळत आहेत. कालच्या दोन्ही सामन्यांमध्ये सूर्यकुमार यादव आणि विराट कोहली यांच्यामध्ये ऑरेंज कॅपसाठी लढत पाहायला मिळाली. मागील अनेक सामन्यांमध्ये विराट कोहलीने सातत्याने कमालीची कामगिरी केली आहे त्यांचबरोबर गोलंदाजांमध्ये कोणत्या खेळाडूंकडे पर्पल कॅप आहे आणि या दोन्ही शर्यतीत टॉप ५ खेळाडू कोणते आहेत यासंदर्भात सविस्तर वाचा.
आयपीएल २०२५ मध्ये विराट कोहलीची बॅट चांगली कामगिरी करत आहे. दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध खेळल्या गेलेल्या सामन्यात कोहलीने अर्धशतकही झळकावले. विराटच्या खेळीमुळे आरसीबीने या सीझनमधील सातवा विजय मिळवला. इंडियन प्रीमियर लीगच्या १८ व्या सीझनमध्ये सातवे अर्धशतक झळकावून कोहलीने सूर्यकुमार यादवकडून ऑरेंज कॅप हिसकावून घेतली आहे. कोहली १० सामन्यांमध्ये ४४३ धावा करत सर्वाधिक धावा करणारा फलंदाज बनला आहे. सूर्यकुमार यादवने कालच्या पहिल्या सामन्यांमध्ये चांगली कामगिरी केली होती तेव्हा त्याच्या ऑरेंज कॅप होती. त्यानंतर तो दुसऱ्या सामन्यानंतर तो या शर्यतीत सध्या दुसऱ्या स्थानांवर आहे.
VIRAT KOHLI RULING IPL AT THE AGE OF 36 👑 pic.twitter.com/nugJTfJ54Q
— Johns. (@CricCrazyJohns) April 28, 2025
या शर्यतीत तिसऱ्या स्थानावर साई सुदर्शन आहे, साईने आतापर्यत ८ सामन्यांमध्ये ४१७ धावा केल्या आहेत. यामध्ये चौथ्या स्थानावर निकोलस पुरन आहे त्याने आतापर्यत ४०४ धावा केल्या आहेत. पाचव्या स्थानावर मिचेल मार्श आहे त्याने आतापर्यत ३७८ धावा केल्या आहेत.
पर्पल कॅप आता आरसीबीचा वेगवान गोलंदाज जोश हेझलवूडनेही जिंकली आहे. या हंगामात हेझलवूडने १० सामन्यात १८ विकेट्स घेतल्या आहेत. १६ विकेट घेणारा प्रसिद्ध कृष्ण दुसऱ्या स्थानावर घसरला आहे. या शर्यतीत तिसऱ्या स्थानावर चेन्नई सुपर किंग्सचा नूर अहमद आहे. त्याने आतापर्यत १४ विकेट्स घेतले आहेत. या यादीमध्ये ट्रेंट बोल्ट चौथ्या स्थानावर आहे त्याने आतापर्यत १० सामन्यांमध्ये १३ धावा केल्या आहेत. तर पाचव्या स्थानावर कृणाल पंड्या आहे. त्याने दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध कमालीची कामगिरी केली यामध्ये त्याने संघासाठी आतापर्यत १३ विकेट्स घेतले आहेत.
Josh Hazlewood said, “the environment in the RCB team is amazing. I’m loving my time”. pic.twitter.com/dn9DGtKjqj
— Mufaddal Vohra (@mufaddal_vohra) April 27, 2025
आज गुजरात टायटन्सचा संघ राजस्थान रॉयल्सशी सामना होणार आहे. आज साई सुदर्शनच्या कामगिरीवर चाहत्यांची नजर असणार आहे. साई सुदर्शन संघासाठी सलामीवीर फलंदाज म्हणून चांगली कामगिरी करत आहे. शुभमन गिल देखील चांगली कामगिरी करत आहे.