Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Local Body Election |
  • Thackeray Brothers Alliance |
  • Political news |
  • IND vs NZ |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

IND VS PAK : ‘त्याला IPL मध्येही पंचगिरी…’, फखर झमानच्या बाद होण्यावर शाहिद आफ्रिदीने ओकली गरळ 

आशिया कप २०२५ स्पर्धेतील सुपर ४ सामन्यात भारताने पाकिस्तानचा ६ विकेट्सने पराभव केला. या सामन्यात पाकिस्तानचा फलंदाज फखर झमान चुकीच्या पध्दतीने बाद दिला असे पाकचा माजी कर्णधार शाहिद आफ्रिदीने म्हटले आहे.

  • By लखन शोभा बाळकृष्ण
Updated On: Sep 23, 2025 | 02:29 PM
IND VS PAK: 'He has Panchagiri in IPL too...', Shahid Afridi lashed out at Fakhar Zaman's dismissal

IND VS PAK: 'He has Panchagiri in IPL too...', Shahid Afridi lashed out at Fakhar Zaman's dismissal

Follow Us
Close
Follow Us:
  • सुपर ४ सामन्यात फखर झमान वादग्रस्त बाद 
  • शाहिद आफ्रिदीकडून फखर झमानच्या बाद होण्यावर प्रश्नचिन्ह 
  • शाहिद आफ्रिदीकडून  टीव्हीवर पंचांवर टीका
Asia cup 2025 : आशिया कप २०२५ (Asia cup 2025)मधील सुपर ४ सामन्यात भारत आणि पाकिस्तान हे दोन संघ आमनेसामने आले होते.  सुपर फोर  २१ सप्टेंबर रोजी झालेल्या या या सामन्यात दुबई आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियमवर भारताने पाकिस्तान संघाचा ६ विकेट्सने पराभव केला.  आता, पाकिस्तानकडून या सामन्यात पंचांच्या निर्णयावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले जाऊ लागले आहेत. यामध्ये आता पाकिस्तानचा माजी कर्णधार शाहिद आफ्रिदीने भारताविरुद्धच्या सुपर फोर सामन्यात फखर झमानचे बाद होणे वादग्रस्त असल्याचे म्हटले आहे.  त्याने आशिया कप २०२५ मध्ये पंचांच्या दर्जांबाबत देखील आता वाद सुरू केला आहे.

हेही वाचा : Arjun Tendulkar vs Samit Dravid: सचिन तेंडूलकर आणि राहूल द्रविडचे लेक लढणार एकमेकांच्या विरोधात! कोण जिंकणार?

तिसऱ्या ओव्हरमध्ये फखर झमानने हार्दिक पंड्याच्या ऑफ-कटरला धार लावल्यानंतर चेंडूला टिपण्यासाठी विकेटकीपर संजू सॅमसनने पुढे डाईव्ह केली. त्यानंतर  प्रकरण तिसऱ्या पंचांपर्यंत जाऊन पोहोचले, ज्यांनी फलंदाजाला बाद असल्याचे घोषित केले.

निर्णयावर फलंदाज फखर झमान नाराज असल्याचे दिसून आले. त्यांचा असा विश्वास होता की चेंडू विकेटकीपरच्या ग्लोव्हजपर्यंत पोहोचण्यापूर्वी जमिनीला स्पर्श करून गेला आहे. याबाबत आता पाकिस्तानचा माजी कर्णधार शाहिद आफ्रिदीने सामा टीव्हीवर पंचांवर टीका करताना म्हटले आहे की, “त्याला आयपीएलमध्येही पंचगिरी करावी लागते.”

पाकिस्तानचा दिग्गज फलंदाज मोहम्मद युसूफने देखील आफ्रिदीला समर्थन देत फखर झमानच्या बाद होण्यावर दु:ख व्यक्त केले आहे. युसूफ म्हणाला, “फखर झमान आमचा  महत्त्वाचा खेळाडू होता, त्याने एका जागतिक दर्जाच्या गोलंदाजाविरुद्ध (जसप्रीत बुमराह) काही चौकार मारून चांगली सुरुवात देखील केली.”

याबरोबरच पाकिस्तानचा कर्णधार सलमान अली आगा यांनीही तिसऱ्या पंचाच्या निर्णयावर प्रश्नचिन्ह निर्माण केले आहेत, तो म्हणाला, “मला वाटले की चेंडू उसळला. पंच चुका करू शकतात आणि ते समजण्यासारखे देखील आहे. मला वाटले की चेंडू उसळला, पण मी चुकीचा असू शकतो, जर फखर झमान खेळत राहिला असता तर आमचा संघ १९० च्या आसपास पोहोचू शकलो असतो.”

हेही वाचा : IND vs AUS : ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या तिसऱ्या महिला एकदिवसीय सामन्यात स्लो ओव्हररेटसाठी भारताला दंड

२१ सप्टेंबर रोजी खेळवण्यात आलेल्या दुबई आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियमवर भारत आणि पाकिस्तान यांच्यातील सुपर-४ सामन्यात प्रथम फलंदाजी करताना पाकिस्तानने ५ गडी गमावून १७१ धावा उभ्या केल्या होत्या. पाकिस्तानकडून साहिबजादा फरहानने सर्वाधिक ५८ धावा केल्या होत्या. प्रत्युत्तरादाखल भारताने १८.५ षटकांत ६ गडी राखून सामना आपल्या नावे केला. भारताकडून अभिषेक शर्माने ३९ चेंडूत ७४ धावा केल्या, तर शुभमन गिलने ४७ धावा केल्या.

Web Title: Shahid afridi criticizes umpire over fakhar zamans dismissal in asia cup 2025

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Sep 23, 2025 | 02:29 PM

Topics:  

  • Asia cup 2025
  • IND VS PAK

संबंधित बातम्या

IND U19 vs PAK U19 : लाज वाटली पाहिजे Sarfraz Ahmed… अंतिम सामन्यात टीम इंडियाविरुद्ध वापरले अपशब्द!
1

IND U19 vs PAK U19 : लाज वाटली पाहिजे Sarfraz Ahmed… अंतिम सामन्यात टीम इंडियाविरुद्ध वापरले अपशब्द!

Under 19 Asia Cup : भारताला हरवणाऱ्या पाकिस्तानी खेळाडूंवर होणार कोट्यवधी रुपयांची उधळपट्टी! किती मिळणार प्रत्येक खेळाडूला पैसे
2

Under 19 Asia Cup : भारताला हरवणाऱ्या पाकिस्तानी खेळाडूंवर होणार कोट्यवधी रुपयांची उधळपट्टी! किती मिळणार प्रत्येक खेळाडूला पैसे

IND U19 vs PAK U19: “टॉसचा निर्णय बरोबर होता, पण…”; पराभवानंतर आयुष म्हात्रेने नेमकं कुठे चुकलं ते सांगितलं!
3

IND U19 vs PAK U19: “टॉसचा निर्णय बरोबर होता, पण…”; पराभवानंतर आयुष म्हात्रेने नेमकं कुठे चुकलं ते सांगितलं!

IND U19 vs PAK U19: विकेट काय घेतली पाकिस्तानी गोलंदाज माजला! भारतीय कर्णधाराशी भर मैदानात घातला वाद; पाहा व्हिडिओ
4

IND U19 vs PAK U19: विकेट काय घेतली पाकिस्तानी गोलंदाज माजला! भारतीय कर्णधाराशी भर मैदानात घातला वाद; पाहा व्हिडिओ

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.