Shahid Afridi sold his shame, crossed all limits! KISSed Pakistan's Army Chief in front of the camera; Watch the video
Shahid Afridi : पहलगाममधील दहशतवादी हल्ल्यानंतर माजी पाकिस्तानी क्रिकेटपटू शाहिद आफ्रिदी बराच चर्चेत असल्याचे दिसत आहे. तो सतत भारताविरुद्ध आग ओकत असतो. भारताने राबवलेल्या ऑपरेशन सिंदूरबद्दल देखील त्याने आगपाखड केली होती. त्याबाबत त्याने अनेक हास्यास्पद गोष्टी सांगितल्या आहेत. त्यानंतर आता तर त्याने सर्व मर्यादाच पार केल्याचे दिसून आले आहे. तो कॅमेऱ्यासमोर पाकिस्तानचे लष्करप्रमुख असीम मुनीर यांना किस करताना दिसत आहे.
माजी क्रिकेटपटू शाहिद आफ्रिदी पाकिस्तानमध्ये भारताविरुद्ध गरळ ओकत असतो. तसेच खोटेपणा पसरवत असतो. अशातच आता त्याचा आणखी एक व्हिडिओ समोर आला आहे. यामध्ये तो पाकिस्तानचे लष्करप्रमुख असीम मुनीर यांना किस करत असल्याचे दिसत आहे. तो असे देखील म्हणाला आहे की, तुम्ही शत्रूला चांगला धडा शिकवला. हा व्हायरल व्हिडिओ पाहून कोणीही लोट पोट धरून हसायला लागेल.
भारताकडून झालेल्या अपमानानंतर पाकिस्तान अनेक वेळा भारताला धडा शिकवल्याच्या वल्गना करून आनंद साजरा करत बसला आहे. तर भारताने राबवलेल्या ऑपरेशन सिंदूरमुळे पाकिस्तानचे कसे धाबे दणाणले आहे. हे संपूर्ण जग जाणून आहे. पण, काही पाकिस्तानी लोक त्यांचे कारनामे करतच आहेत. त्यात आघाडीवर आहे तो म्हणजे शाहिद आफ्रिदी.
पाकिस्तान क्रिकेट संघाचा माजी कर्णधार शाहिद आफ्रिदी आणि वेगवान गोलंदाज शोएब अख्तर यांनी नुकतीच असीम मुनीरची भेट घेतली होती. दोन्ही माजी खेळाडूंनी त्याला भेटताच मिठी मारली होती. यानंतर शाहिद आणि शोएबनेही मुनीरला किस केल्याचे दिसून आले.
इतकेच नाही, तर शाहिद आफ्रिदीने पाकिस्तानचे पंतप्रधान शाहबाज शरीफ यांची देखील भेट घेतल्याचे दिसत आहे. पंतप्रधानांच्या निवासस्थानी झालेल्या या बैठकीनंतर आफ्रिदी म्हणाला की, या संकटाच्या वेळी संपूर्ण देश एकत्र उभा आहे. तसेच देशाने शत्रूला चोख प्रत्युत्तर दिले आहे. यावेळी शाहबाजने आफ्रिदीचे आभार मानले.
We got Shahid Afridi and Shoaib Akhtar kissing & hugging munir before GTA 6 pic.twitter.com/mS4qnEAmvU
— OsintTV 📺 (@OsintTV) May 17, 2025
२२ एप्रिल रोजी पहलगाममध्ये दहशतवादी हल्ला करण्यात आला होता. ज्यामध्ये दहशतवाद्यांकडून २६ जणांची हत्या करण्यात आली होती. यामुळे देशभरात पाकिस्तानविरुद्ध संतापाची लाट निर्माण झाली होती. कारण या हल्ल्याचा कट पाकिस्तानमधून रचण्यात आला होता. भारतीय सैन्याने ऑपरेशन सिंदूर राबवून पाकिस्तानमधील 9 दहशतवादी अड्डे उद्ध्वस्त करण्यात आले.
हेही वाचा : Asia cup 2025 : टीम इंडियाची Asia Cup मधून माघार! पाकिस्तानशी BCCI ने सर्व क्रिकेट संबंध तोडले..
यानंतर, पाकिस्तान घाबरला आणि त्यांच्या सैन्याने हल्ला करण्यास सुरुवात केली, त्यांनी सीमेवर सतत गोळीबार केला आणि ड्रोनने देखील हल्ला करण्यात आला जो भारतीय सैन्याने परतवून लावला. १० मे रोजी दोन्ही देशांमध्ये युद्धबंदीवर स्वाक्षरी करण्यात आली.