
Ind Vs Sa: "Sarfraj doesn't need..." Why is he not in India A's squad against South Africa? Shardul Thakur spoke clearly
हेही वाचा : ICC Womens World Cup 2025 : भारतीय संघ Semifinal मध्ये ‘या’ संघासोबत भिडणार! तारीखही ठरली; वाचा सविस्तर
शार्दुल ठाकूरने यामागील आता कारण स्पष्ट केले आहे की, सर्फराज खान स्थानिक क्रिकेटमध्ये धावा करून भारतीय कसोटी संघात परतण्याची शक्यता आहे. इंग्लंडविरुद्ध २०२३-२४ च्या राजकोट कसोटीत सरफराज खानने भारताकडून पदार्पण केले आहे. सरफराज ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर कसोटी संघाचा भाग होता, परंतु तेव्हापासून त्याच्याकडे सतत काणाडोळा करण्यात येत आहे. सर्फराजने खान त्याचा शेवटचा कसोटी सामना न्यूझीलंडविरुद्ध मुंबईमध्ये खेळला होता.
रणजी ट्रॉफी ग्रुप डी मध्ये छत्तीसगड विरुद्धच्या घरच्या सामन्याच्या पूर्वसंध्येला भारतीय अष्टपैलू खेळाडू आणि मुंबईचा कर्णधार शार्दुल ठाकूरने मोठा खुलासा केला आहे. ठाकूर म्हणाला की, “आजकाल, भारत अ संघ अशा खेळाडूंवर लक्ष केंद्रित करतो ज्यांना ते आंतरराष्ट्रीय क्रिकेटसाठी तयार करण्याची इच्छा ठेवतात. आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळण्यासाठी सर्फराजला इंडिया अ सामन्यांची काही एक आवश्यकता नाही. जर त्याने पुन्हा धावा करायला सुरुवात केली तर तो थेट कसोटी संघात पुन्हा सामील होऊ शकतो.”
मुंबईच्या रणजी हंगामाच्या पहिल्या सामन्यामध्ये जम्मू आणि काश्मीर विरुद्धच्या चांगल्या सुरुवातीचा सर्फराज खान फायदा उठवूशकला नाही. सरफराजचा बचाव करताना शार्दुल ठाकूर पुढे म्हणाला की, “तो दुखापतीनंतर पुनरागमन करत आहे, परंतु त्यापूर्वी, त्याने दुखापतीपूर्वी बुची बाबू ट्रॉफीमध्ये दोन किंवा तीन शतके देखील झळकावलेली आहेत.”