विराट कोहली(फोटो-सोशल मीडिया)
Virat Kohli’s creation world record : भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील तीन सामन्यांच्या एकदिवसीय मालिकेतील तिसरा सामना सिडनीमध्ये खेळला जाणार आहे. पर्थ आणि अॅडलेडलेडमध्ये विराट कोहली भोपळा ही फोडू शकला नाही. त्यामुळे त्याचे चाहते नाराज झाल्याचे दिसून आले. त्यामुळे आता विराट कोहली सिडनी येथील सामन्यात तो मोठी खेळी करून मागिल दोन सामन्यातील कमी भरून काढण्याची अपेक्षा आहे. शनिवारी, २५ ऑक्टोबर रोजी भारत आणि ऑस्ट्रेलिया ही संघ तिसऱ्या सामन्यासाठी आमनेसामने येणार आहेत. त्यामुळे या सामन्यात विराट कोहलीच्या कामगिरीकडे सर्वांचे लक्ष्य असणार आहे. विराटची सिडनीमध्ये आतापर्यंत सरासरी कामगिरी राहिली आहे असली तरी, त्याला या सामन्यात विश्वविक्रम रचण्याची संधी आहे.
एकदिवसीय क्रिकेटमधील सर्वोत्तम फलंदाजांपैकी एक असलेला भारताचा स्टार फलंदाज विराट कोहली हा एकदिवसीय धावांचा पाठलाग करताना सर्वाधिक धावा करणारा यशस्वी फलंदाज आहे. त्याने १०७ सामन्यांमध्ये १०१ डावांमध्ये ८८.२० च्या सरासरीने आणि ९६.५५ च्या स्ट्राईक रेटने ५९९८ धावा फटकावल्या आहेत. या दरम्यान विराट कोहलीने ३३ वेळा नाबाद राहून किमया साधली आहे. त्याने यशस्वी एकदिवसीय सामन्यात धावांचा पाठलाग करताना २४ शतके आणि २६ अर्धशतके झळकावली आहेत. तसेच यावेळी सिडनीमध्ये यशस्वी पाठलाग करताना कोहलीने २ धावा केल्या तर तो यशस्वी एकदिवसीय पाठलाग करताना ६,००० धावा पूर्ण करणारा पहिलाच फलंदाज ठरू शकतो.
मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर यशस्वी एकदिवसीय पाठलाग करताना सर्वाधिक धावा करणाऱ्या फलंदाजांच्या यादीममध्ये दुसऱ्या स्थानी आहे. सचिनने १२७ सामन्यांमध्ये १२४ डावांमध्ये ५५.४५ च्या सरासरीने आणि ९०.०८ च्या स्ट्राईक रेटने ५,४९० धावा काढल्या आहेत. या यादीत तिसऱ्या क्रमांकावर रोहित शर्मा आहे, त्याने १०३ डावांमध्ये ६२.७३ च्या सरासरीने ४,५८० धावा फटकावल्या आहेत. रिकी पॉन्टिंग ४,१८६ धावांसह यादीत चौथ्या क्रमांकावर असून आणि जॅक कॅलिस ३,९५० धावांसह पाचव्या क्रमांकावर विराजमान आहे.
हेही वाचा : ICC Womens World Cup 2025 : भारतीय संघ Semifinal मध्ये ‘या’ संघासोबत भिडणार! तारीखही ठरली; वाचा सविस्तर
विराट कोहलीने आतापर्यंत सिडनीमध्ये सात एकदिवसीय सामने खेळलेले आहेत. यामध्ये त्याला २४.३ च्या सरासरीने आणि ८३.० च्या स्ट्राईक रेटने १४६ धावाच करता आलेल्या आहेत. विराटनला सिडनीमध्ये फक्त एकच अर्धशतक झळकावता आले आहे. त्याची सर्वोच्च धावसंख्या ८९ इतकी आहे. आकडेवारीवरून सिडनीमधील त्याची कामगिरी समाधानकारक नाही.






