भारतीय संघ(फोटो-सोशल मीडिया)
Who will India face in the semi-finals? : महिला एकदिवसीय विश्वचषक २०२५ मध्ये काल, गुरुवारी भारताने न्यूझीलंड संघाचा डकवर्थ-लुईस पद्धतीने न्यूझीलंडचा ५३ धावांनी पराभव केला. या विजयाने भारताने सेमीफायनलमध्ये स्थान निश्चित केले आहे. भारताव्यतिरिक्त, याआधी ऑस्ट्रेलिया, दक्षिण आफ्रिका आणि इंग्लंड हे सेमीफायनलमध्ये पोहचले आहेत. विशेष म्हणजे, हे तेच तीन संघ आहेत ज्यांच्याकडून भारतीय संघाला पराभव स्वीकारावा लागला आहे. पण सेमीफायनलमध्ये आता कोणता संघ कोणत्या संघाशी सामना करणार? महिला विश्वचषक २०२५ च्या सेमीफायनलमध्ये भारतीय संघ कोणत्या संघासोबत सामना करणार? याबद्दल जाणून घेऊया.
जर आपण पॉइंट टेबल पहिला तर सहा सामन्यांनंतर ऑस्ट्रेलिया ११ गुणांसह टेबलमध्ये अव्वलस्थानी आहे. दक्षिण आफ्रिका सहा सामन्यांतून १० गुणांसह दुसऱ्या स्थानी आहे, तर इंग्लंड सहा सामन्यांतून ९ गुणांसह तिसऱ्या स्थानि विराजमान आहे. सहा सामन्यांतून ६ गुणांसह भारत हा संघ चौथ्या स्थानी आहे.
सेमीफायनलमध्ये स्थान मिळवले असले तरी, या सर्व संघांना गट टप्प्यात अजून एक सामना खेळावा लागणार आहे. ऑस्ट्रेलिया आणि दक्षिण आफ्रिका अंतिम गट सामन्यात एकमेकांसमोर येणार आहेत. तर इंग्लंड न्यूझीलंडशी सामना करणार आहे. तर भारताचा सामना बांगलादेशशी होईल. भारताने हा सामना जिंकला असला तरी त्याचे स्थान बदलणार नाही. बांगलादेशवर विजय मिळवल्यानंतर देखील भारताचे ८ गुण राहणार आणि भारत चौथ्या क्रमांकावर राहणार आहे.मात्र, पहिल्या तीन स्थानांमध्ये बदल होण्याची शक्यता आहे.
जर ऑस्ट्रेलियाने शेवटच्या गट सामन्यात दक्षिण आफ्रिकेला पराभूत केले. तर ऑस्ट्रेलिया १३ गुणांसह पहिल्या क्रमांकावर कायम राहील. तथापि, दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या पराभवामुळे ते दुसऱ्या स्थानावर ढकलले जाणार, कारण विजयामुळे दक्षिण आफ्रिकेचे गुण १२ होणार आहेत.
इंग्लंडबद्दल सांगायचे झेल तर, त्यांना दुसऱ्या क्रमांकावर पोहोचण्याची नामी संधी आहे. जर त्यांनी महिला विश्वचषकाच्या त्यांच्या शेवटच्या गट सामन्यात न्यूझीलंडला पराभूत केले तर त्यांचे ११ गुण होऊन ते दुसऱ्या स्थानावर पोहचतील. तथापि, हे घडण्यासाठी, दक्षिण आफ्रिकेला ऑस्ट्रेलियाविरुद्ध देखील पराभव स्वीकारावा लागेल. जर दक्षिण आफ्रिका पराभूत होऊ शकला नाही, तर इंग्लंड न्यूझीलंडविरुद्ध जिंको किंवा हरो, तरीही तिसऱ्या क्रमांकावर कायम राहील.
हेही वाचा : Aus vs Ind 3rd ODI : दोन ‘डक’ विसरून विराट रचणार इतिहास! किंग कोहली ‘हा’ मेगा रेकॉर्ड मोडण्याच्या उंबरठ्यावर
महिला एकदिवसीय विश्वचषक २०२५ चा पहिला सेमीफायनल २९ ऑक्टोबर रोजी गुवाहाटी येथे खेळवला जाणार आहे, ज्यामध्ये भारतीय संघ खेळणार आहे. स्पर्धेच्या पहिल्या उपांत्य फेरीत, चौथ्या क्रमांकावर असलेल्या भारताचा सामना टेबल टॉपवर असलेल्या संघाशी होणार आहे. तो सामना ऑस्ट्रेलियाशी वा दक्षिण आफ्रिकेसोबत होईल, हे २५ ऑक्टोबर रोजी स्पष्ट होणार आहे.






