SL vs PAK (Photo Credit- X)
आशिया कप २०२५ मध्ये पाकिस्तानचा पुढील सामना श्रीलंकेसोबत २३ सप्टेंबर रोजी म्हणजे होणार आहे. या सामन्यात जो संघ हरेल, त्याचा या स्पर्धेतील प्रवास जवळजवळ संपुष्टात येईल. दोन्ही संघांनी सुपर-४ मध्ये प्रत्येकी एक सामना खेळला असून, त्यात त्यांना पराभवाचा सामना करावा लागला आहे. त्यामुळे या सामन्यात दोन्ही संघांमध्ये कडवी टक्कर पाहायला मिळू शकते. या सामन्यात पाकिस्तानला ८ वर्षांपासून सुरू असलेला श्रीलंकेविरुद्धचा ‘दुष्काळ’ संपवण्याची संधी आहे. कारण २०१७ नंतर पाकिस्तानला टी-२० आंतरराष्ट्रीय सामन्यांमध्ये श्रीलंकेला हरवता आलेले नाही.
पाकिस्तान आणि श्रीलंका यांच्यातील टी-२० आंतरराष्ट्रीय सामन्यांमधील हेड-टू-हेड रेकॉर्ड पाहिल्यास, त्यात पाकिस्तानचे पारडे जड दिसते. आतापर्यंत दोन्ही संघांमध्ये २३ सामने झाले आहेत, ज्यात पाकिस्तानने १३ सामने जिंकले आहेत, तर श्रीलंकेने १० सामने जिंकले आहेत. पण गेल्या ५ सामन्यांचा विचार केल्यास त्यात श्रीलंकेचे वर्चस्व दिसून येते. दोन्ही संघांमधील मागील ५ सामन्यांत श्रीलंकेनेच बाजी मारली आहे. पाकिस्तानने श्रीलंकेविरुद्ध अखेरचा टी-२० सामना २०१७ मध्ये जिंकला होता.
Super Fours | Match 3 ⚔️ Pakistan take on Sri Lanka in match that could potentially decide their fate in the tournament. With both sides having dropped thier first Super Fours clash, who will make amends?#PAKvSL #DPWorldAsiaCup2025 #ACC pic.twitter.com/jXEZacTZ0Q — AsianCricketCouncil (@ACCMedia1) September 23, 2025
श्रीलंका आणि पाकिस्तान यांच्यातील हा सामना अबू धाबीच्या शेख जायद स्टेडियममध्ये खेळला जाईल. या मैदानावर श्रीलंकेचा पाकिस्तानविरुद्धचा रेकॉर्ड फार चांगला नाही. या मैदानावर श्रीलंकेने पाकिस्तानविरुद्ध आतापर्यंत तीन टी-२० सामने खेळले आहेत आणि तिन्ही सामन्यांमध्ये त्यांना हार पत्करावी लागली आहे. पाकिस्तानने या मैदानावर श्रीलंकेला २०११ मध्ये एकदा आणि २०१७ मध्ये दोनदा हरवले होते.
PAK vs SL: पाकिस्तान-श्रीलंका ‘करो या मरो’ लढत, पराभूत होणाऱ्या संघाला थेट घरचा रस्ता!
श्रीलंका: पथुम निसांका, कुसल मेंडिस (विकेटकीपर), कामिल मिशारा, कुसल परेरा, चरिथ असलांका (कर्णधार), दासुन शनाका, कामिंडु मेंडिस, वानिंदु हसरंगा, दुनिथ वेलालेज, दुष्मंता चमीरा, नुवान तुषारा, नुवानिदु फर्नांडो, बिनुरा फर्नांडो, चमिका करुणारत्ने, जनिथ लियानगे, मथीशा पथिराना, महीश तीक्षणा.
पाकिस्तान: सैम अयूब, साहिबजादा फरहान, फखर जमान, सलमान आगा (कर्णधार), हुसैन तलत, मोहम्मद हारिस (विकेटकीपर), मोहम्मद नवाज, फहीम अश्रफ, शाहीन आफ्रिदी, हारिस रौफ, अबरार अहमद, हसन अली, मोहम्मद वसीम ज्युनियर, सलमान मिर्झा, सुफियान मुकीम, खुशदिल शाह, हसन नवाज.