पाकिस्तान-श्रीलंका 'करो या मरो' लढत (Photo Credit- X)
PAK vs SL: सुपर-४ फेरीतील पहिल्या सामन्यात पराभव पत्करल्यानंतर आता पाकिस्तान आणि श्रीलंका या दोन्ही संघांसाठी पुढील लढत ‘करो या मरो’ ची झाली आहे. उद्या, मंगळवारी (२३ सप्टेंबर) हे दोन्ही संघ एकमेकांविरुद्ध मैदानात उतरतील. या सामन्यात विजय मिळवणारा संघ अंतिम फेरीच्या शर्यतीत आपले स्थान मजबूत करेल, तर पराभूत होणाऱ्या संघाचा आशिया कप २०२५ मधून पत्ता कट होईल.
श्रीलंका ग्रुप स्टेजमध्ये अपराजित राहिली होती, पण सुपर-४ च्या पहिल्या सामन्यात त्यांना बांगलादेशकडून चार गडी राखून पराभव पत्करावा लागला. यामुळे टी-२० एशिया कपमधील त्यांचे सलग आठ सामन्यांचे विजयी अभियान थांबले. दुसरीकडे, पाकिस्तानचा संघ मैदानाबाहेरील वादामुळे अधिक चर्चेत राहिला आहे. भारताविरुद्धच्या सामन्यात त्यांना पुन्हा एकदा एकतर्फी पराभव स्वीकारावा लागला.
Points Table 📊 The Super 4️⃣s are off to a thrilling start, with 🇮🇳 & 🇧🇩 recording important wins in their respective rivalry clashes and occupy top spots.#DPWorldAsiaCup2025 #ACC pic.twitter.com/eRw9yRHzco — AsianCricketCouncil (@ACCMedia1) September 22, 2025
रिकव्हरीसाठी पुरेसा वेळ मिळाला नसला तरी, सलमान आगाच्या नेतृत्वाखालील पाकिस्तानी संघाला कोणत्याही परिस्थितीत विजय मिळवणे अनिवार्य आहे. भारताविरुद्धच्या सामन्यात त्यांच्या अव्वल फळीतील फलंदाजांनी (साहिबजादा फरहान, फखर जमां, सईम अयूब) चांगल्या सुरुवातीची आशा दिली होती, मात्र त्यानंतर मधली फळी लवकर कोसळली. दुसरीकडे, श्रीलंकेची सर्वात मोठी चिंता कमकुवत मधली फळी आहे. त्यांच्यासाठी दासुन शनाका वगळता इतर फलंदाज खास कामगिरी करू शकलेले नाहीत.
गुणतालिकेत भारत आणि बांगलादेश प्रत्येकी २ गुणांसह अनुक्रमे पहिल्या आणि दुसऱ्या स्थानावर आहेत, तर श्रीलंका आणि पाकिस्तान अजूनही गुणांचे खाते उघडलेले नाही.
पाकिस्तानला अंतिम फेरी गाठण्यासाठी समीकरण:
बांगलादेश किंवा श्रीलंका हे दोन्ही संघ अंतिम फेरीच्या शर्यतीतून अजून बाहेर झालेले नाहीत. बांगलादेशने आधीच एक विजय मिळवला आहे. तर श्रीलंकेकडे कोणत्याही संघाला धक्का देण्याची क्षमता आहे.
पाकिस्तानः सलमान अली आगा (कर्णधार), अबरार अहमद, फहीम अश्रफ, फखर जमान, हारिस रौफ, हसन अली, हसन नवाज, हुसैन तलत, खुशदिल शाह, मोहम्मद हरिस, मोहम्मद नवाज, मोहम्मद वसीम जूनियर, साहिबजादा फरहान, सैम अयुब, सलमान मिर्झा, शाहीन शाह आफ्रिदी, सुफयान मोकीम.
श्रीलंका: चारिथ असलंका (कर्णधार), पाथुम निसांका, कुसल मेंडिस, कुसल परेरा, नुवानिंदू फर्नांडो, कामिंदू मेंडिस, कामिल मिश्रा, दासुन शनाका, जेनिथ लियानागे, चमिका करुणारत्ने, दुनिथ वेललागे, वानिंदू हसरंगा, महेश थेक्षाना, दुष्मंथा चमीरा, बिनुरा फर्नांडो, नुवान तुषारा, मथीशा पाथीराना.