Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Diwali |
  • Womens World Cup |
  • Ind vs Aus |
  • Bihar Election 2025 |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

SRH vs DC : इशान किशनच्या नावावर नवा रेकॅार्ड! IPL च्या इतिहासात असे पहिल्यांदाच

हैदराबादच्या संघाने सामन्यामध्ये दिल्लीच्या संघाला 133 धावांवर रोखले होते. यामध्ये इशान किशनने कालच्या सामन्यात विकेटकिपिंग केली आणि सर्वांनाच चकित केले. कालच्या सामन्यात इशान किशनने त्याच्या नावावर नवा विक्रम केला आहे.

  • By शुभांगी मेरे
Updated On: May 06, 2025 | 03:04 PM
फोटो सौजन्य - SunRisers Hyderabad

फोटो सौजन्य - SunRisers Hyderabad

Follow Us
Close
Follow Us:

इशान किशनच्या नावावर नवा विक्रम : काल सनराइझर्स हैदराबाद विरुध्द दिल्ली कॅपिटल्स यांच्यामध्ये सामना झाला पण सामना पुर्ण खेळवण्यात आला नाही. कालच्या सामन्यात हैदराबादने नाणेफेेक जिंकून पहिले गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. यामध्ये कालच्या सामन्यात पॅट कमिन्सच्या संघाने कौतुकास्पद कामगिरी केली. तर दिल्लीचे पहिल्या पाच फलंदाजांनी अत्यंत निराशाजनक कामगिरी केली होती. कालच्या सामन्यात सनराइझर्स हैदराबादचा विजय जवळजवळ पक्का होता पण पावसाने त्यांचा विजय हिसकावुन घेतला.

हैदराबादच्या संघाने कालच्या सामन्यामध्ये दिल्लीच्या संघाला 133 धावांवर रोखले होते. यामध्ये इशान किशनने कालच्या सामन्यात विकेटकिपिंग केली आणि सर्वांनाच चकित केले. कालच्या सामन्यात इशान किशनने त्याच्या नावावर नवा विक्रम केला आहे. इशान किशनने कालच्या सामन्यात पहिल्या चार फलंदाजांना बाहेरचा रस्ता दाखवला. असे आयपीएलच्या इतिहासामध्ये कधीच झाले नाही. सनराइझर्स हैदराबाद विरुध्द दिल्ली कॅपिटल्स सामन्यात इशान किशनने चार खेळाडूंचे कॅच घेतले. यामध्ये त्याने करूण नायर, फाफ डुप्लेसी, अभिषेक पोरेल आणि केएल राहूल यांना बाद केले.

Today is 1st ever time in IPL History
All Top 4 batters catches taken by Same player!
Ishan Kishan🗿#SRHvDC pic.twitter.com/7iGE8hjdEN — Cricket Max Masala (@Cricket_CMM) May 5, 2025

इशान किशनने एकाच खेळाडूने टॉप ४ फलंदाजांचे झेल घेतले हे आयपीएलच्या इतिहासामध्ये पहिल्यांदाच झाले आहे. सनराइझर्स हैदराबाद विरुध्द दिल्ली कॅपिटल्स या सामन्याचा पहिला डाव झाला आणि त्यानंतर राजीव गांधी मैदानावर मुसळधार पाऊस झाला. या सामन्यात फक्त दिल्ली कॅपिटल्स संघ फलंदाजी करू शकला. तथापि, पावसामुळे सामना रद्द करण्यात आला आणि दोन्ही संघांना १-१ गुण देण्यात आले. सामना रद्द झाल्यामुळे सनरायझर्स संघही या स्पर्धेतून बाहेर पडला आहे. प्रथम फलंदाजी करताना दिल्ली संघाला २० षटकांत ७ गडी गमावून फक्त १३३ धावा करता आल्या.

IPL २०२५ : धक्कादायक! प्रेम..लग्न अन् बलात्कार.., IPL दरम्यान Mumbai Indians चा माजी खेळाडू अटकेत, नेमकं प्रकरण काय?

दिल्लीकडून फलंदाजी करताना आशुतोष शर्माने २६ चेंडूत ४१ धावा केल्या आणि ट्रिस्टन स्टब्सनेही ४१ धावा केल्या. हैदराबादच्या मजबूत फलंदाजीसमोर हे लक्ष्य खूपच कमी मानले जात असल्याने सनरायझर्स हैदराबादला हा सामना सहज जिंकता आला असता, परंतु पावसाने हैदराबादच्या सर्व आशा धुळीस मिळवल्या. सामना रद्द झाल्यामुळे, सनरायझर्स हैदराबाद स्पर्धेतून बाहेर पडला आणि आयपीएल २०२५ मधून बाहेर पडणारा तिसरा संघ बनला.

दिल्ली कॅपिटल्सचा पुढील सामना पंजाब किंग्स विरूध्द सामना खेळवला जाणार आहे, हा सामना 8 मे रोजी खेळवला जाणार आहे. या सामन्याचे आयोजन धर्मशाला येथे हिमाचल प्रदेश क्रिकेट असोसिएशन स्टेडियमवर करण्यात आले आहे.

Web Title: Srh vs dc new record in ishan kishan name this is the first time in the history of ipl

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: May 06, 2025 | 03:04 PM

Topics:  

  • cricket
  • DC vs SRH
  • IPL 2025
  • Ishan Kishan

संबंधित बातम्या

IND vs AUS : ऑस्ट्रेलिया मालिकेनंतर कळेल की रोहित आणि विराट विश्वचषक खेळणार की नाही… रिकी पॉन्टिंगचा दावा
1

IND vs AUS : ऑस्ट्रेलिया मालिकेनंतर कळेल की रोहित आणि विराट विश्वचषक खेळणार की नाही… रिकी पॉन्टिंगचा दावा

IND vs AUS : कुलदीपचे होणार पुनरागमन? हे दोन्ही खेळाडू बाहेर राहणार! दुसऱ्या ODI सामन्यासाठी अशी असु शकते टीम इंडियाची Playing 11
2

IND vs AUS : कुलदीपचे होणार पुनरागमन? हे दोन्ही खेळाडू बाहेर राहणार! दुसऱ्या ODI सामन्यासाठी अशी असु शकते टीम इंडियाची Playing 11

BAN vs WI : बांग्लादेशविरुद्ध होणाऱ्या ODI सिरीजमध्ये वेस्ट इंडिजला दुहेरी धक्का, गोलंदाज एकदिवसीय मालिकेतून बाहेर
3

BAN vs WI : बांग्लादेशविरुद्ध होणाऱ्या ODI सिरीजमध्ये वेस्ट इंडिजला दुहेरी धक्का, गोलंदाज एकदिवसीय मालिकेतून बाहेर

आर अश्विनने मोहम्मद शमीबद्दल बीसीसीआयला सल्ला दिला, म्हणाला – मुख्य निवडकर्ता अजित आगरकरने…
4

आर अश्विनने मोहम्मद शमीबद्दल बीसीसीआयला सल्ला दिला, म्हणाला – मुख्य निवडकर्ता अजित आगरकरने…

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.