शिवालिक शर्मा(फोटो-सोशल मीडिया)
IPL २०२५ : भारतात सद्या आयपीएल २०२५ चा थरार रंगला आहे. आतापर्यंत ५५ सामने खेळवण्यात आले आहे. त्यामध्ये मुंबई इंडियन्स शानदार कामगिरी करताना दिसत आहे. सुरुवातीच्या पराभवानंतर, संघाने जोरदार मुसंडी मारळिया आहे आणि प्लेऑफच्या दिशेने आपला दावा मजबूत केला आहे. अशातच एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. मुंबई इंडियन्सचा माजी खेळाडू शिवालिक शर्मावर बलात्काराचा आरोप करण्यात आला असून त्याला अटक देखील करण्यात आली आहे.
राजस्थानमधील जोधपूर येथील कुडी भगतसुनी गृहनिर्माण मंडळ पोलिसांनी माजी आयपीएल क्रिकेटपटू शिवालिक शर्माला बलात्कार प्रकरणात अटक केली आहे. शिवालिक शर्मावर बलात्काराचा आरोप करणारी मुलगी शिवालिक शर्माची मैत्रीण असल्याची माहिती समोर आली आहे.
शिवालिक आणि त्याची मैत्रीण प्रेमात पडले आणि त्यांनी लग्न केल्याची माहीती आहे. परंतु, नंतर त्याच्या मैत्रिणीने शिवालिक शर्मावर बलात्कार आणि फसवणूकीचा आरोप केलाया आहे. या प्रकरणात एसएचओ हमीर सिंह भाटी यांनी सोमवारी सांगितले की, एका मुलीने दाखल केलेल्या तक्रारीनंतर पोलिसांकडून शनिवारी गुजरातमधील वडोदरा येथील अटलदरा पोलिस स्टेशन परिसरातून शिवालिक शर्माला अटक करण्यात आली आहे. तसेच त्याला जोधपूर न्यायालयात हजर केलेया आहे. जिथून त्याला न्यायालयीन कोठडीत पाठवण्यात आले आहे.
हेही वाचा : MI vs GT : Gujrat Titans संघासाठी खुशखबर! मुंबईविरुद्ध ‘हा’ तेजतर्रार गोलंदाज करणार पुनरागमन..
शिवालिक शर्मा हा वडोदऱ्याचा राहणारा आहे. २०२४ च्या आयपीएलमध्ये त्याला मुंबई इंडियन्स संघाने आपल्या संघात स्थान दिले होते. तथापि, त्याला एका देखील सामन्यात खेळण्याची संधी मिळाली नाही. आयपीएल लिलावात मुंबई इंडियन्सने त्याला २० लाख रुपयांना विकत घेतले होते. याशिवाय शिवालिक बडोदा संघात हार्दिक पंड्या आणि कृणाल पंड्यासोबत देखील खेळला आहे. तो आतापर्यंत बडोद्यासाठी देशांतर्गत क्रिकेटमध्ये ५० हून अधिक सामने खेळला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, पीडितेकडून सांगण्यात आले आहे की, सोशल मीडियाद्वारे तिची शिवालिकशी मैत्री झाली जी नंतर प्रेमात रूपांतरित झाली. यानंतर, शिवालिक अनेक वेळा जोधपूरला आला आणि त्याने पीडितेला लग्नाचे आमिष दाखवून तिच्यासोबत शारीरिक संबंध ठेवले.
इतकेच नाही, तर शिवालिकने त्या मुलीशी लग्न देखील केले होते पण नंतर क्रिकेटपटूच्या कुटुंबाकडून ते तोडण्यात आले आणि ते नवीन संबंध शोधू लागले. यामुळे कंटाळून मुलीने फिरकी गोलंदाज शिवालिक शर्मावर बलात्काराचा आरोप केला. आता शिवालिक शर्माला तुरुंगात जावे लागणारा आहे.