Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शुक्र, 9 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Nana Patekar |
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

SA vs AUS: स्टीव्ह स्मिथने डरकाळी फोडली; ऑस्ट्रेलियाच्या कसोटी इतिहासात घातला ‘हा’ धुमाकूळ

Steve Smith Overtakes Steve Waugh Australia's 3rd Highest Run-Scorer: स्टीव्ह स्मिथने दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या पहिल्या कसोटी सामन्यात एक मोठा टप्पा गाठला. त्याने स्टीव्ह वॉचा विक्रम मोडला.

  • By प्रियंका मुंदिनकेरी
Updated On: Oct 09, 2026 | 06:18 PM
Steve Smith Overtakes Steve Waugh

Steve Smith Overtakes Steve Waugh

Follow Us
Follow Us:
  • दक्षिण आफ्रिकेविरुद्ध स्मिथचा मोठा कारनामा
  • २५ धावांत मोडला स्टीव्ह वॉचा विक्रम
  • ऑस्ट्रेलियासाठी गाठला नवा टप्पा

Steve Smith Overtakes Steve Waugh 3rd Highest Run-Scorer: दक्षिण आफ्रिका आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात तीन सामन्यांची कसोटी मालिका सुरु आहे. या मालिकेतील पहिला सामना डर्बन येथे खेळला जात आहे. या सामन्यात स्टीव्ह स्मिथने ऑस्ट्रेलियासाठी उत्कृष्ट कामगिरी करत एक महत्त्वपूर्ण टप्पा गाठला. स्मिथने स्टीव्ह वॉचा विक्रम मोडला आहे. आता तो रिकी पाँटिंग आणि ॲलन बॉर्डर यांचा रेकॉर्ड मोडण्याच्या जवळ आहे.या यादीत फक्त पाँटिंग आणि ॲलन बॉर्डर हेच स्मिथच्या पुढे आहेत.(Steve Smith Overtakes Steve Waugh)

क्रिकेट फिव्हर ऑन! Hong Kong Sixes साठी पाकिस्तानचा संघ जाहीर; ‘या’ दिवशी रंगणार IND vs PAK महामुकाबला

स्टीव्ह स्मिथ ऑस्ट्रेलियासाठी सर्वाधिक धावा करणारा फलंदाज

स्टीव्ह स्मिथने दक्षिण आफ्रिकेविरुद्ध मोठी खेळी केली नाही. पण त्याने या सामन्यात एक महत्त्वपूर्ण कामगिरी केली. त्याने ५३ चेंडूंमध्ये २५ धावा केल्या. या खेळीमुळे तो कसोटी क्रिकेटमध्ये ऑस्ट्रेलियासाठी तिसरा सर्वाधिक धावा करणारा फलंदाज ठरला. ऑस्ट्रेलियासाठी कसोटी क्रिकेटमध्ये सर्वाधिक धावा रिकी पाँटिंगने केल्या आहेत, त्याच्या नावावर १३,३७८ धावा आहेत. ॲलन बॉर्डर ११,१७४ धावांसह दुसऱ्या क्रमांकावर आहे. स्मिथ १०,९४५ धावांसह तिसऱ्या क्रमांकावर आहे. स्टीव्ह वॉ आता १०,९२७ धावांसह चौथ्या क्रमांकावर पोहोचला आहे. डेव्हिड वॉर्नर ८,७८६ धावांसह पाचव्या क्रमांकावर आहे.

स्मिथने ऑस्ट्रेलियासाठी सातत्याने उत्कृष्ट कामगिरी केली आहे. त्याने १२५ कसोटी सामन्यांमधील २२३ डावांमध्ये ३७ शतके झळकावली आहेत. तसेच ४५ अर्धशतकेही ठोकली आहेत. स्मिथने एकदिवसीय क्रिकेटमध्ये १७० सामन्यांत ५८०० धावा केल्या आहेत, तर ६७ टी-२० सामन्यांत १०९४ धावा केल्या आहेत.

कसोटी सामन्यांमध्ये ऑस्ट्रेलियासाठी सर्वाधिक धावा करणारा खेळाडू

  • रिकी पाँटिंग – १३,३७८ धावा
  • ॲलन बॉर्डर – ११,१७४ धावा
  • स्टीव्ह स्मिथ – १०,९४५ धावा
  • स्टीव्ह वॉ – १०,९२७ धावा
  • डेव्हिड वॉर्नर – ८,७८६ धावा

स्मिथ हा कसोटी मध्ये १२वा सर्वाधिक धावा करणारा फलंदाज

स्टीव्ह स्मिथ सध्या कसोटी क्रिकेटमधील १२वा सर्वाधिक धावा करणारा फलंदाज आहे. २०० सामन्यांमध्ये १५,९२१ धावांसह सर्वाधिक कसोटी धावांचा विक्रम सचिन तेंडुलकरच्या नावावर आहे. १६९ सामन्यांमध्ये १४,२७८ धावांसह जो रूट दुसऱ्या क्रमांकावर आहे. या यादीत रिकी पाँटिंग तिसऱ्या क्रमांकावर आहे. दक्षिण आफ्रिकेचा माजी दिग्गज खेळाडू जॅक कॅलिस १६६ सामन्यांमध्ये १३,२८९ धावांसह चौथ्या क्रमांकावर आहे. तर, राहुल द्रविड १६४ कसोटी सामन्यांमध्ये १३,२८८ धावांसह पाचव्या क्रमांकावर आहे.

पहिल्या सत्रात कांगारु बॅकफूटवर

डर्बन कसोटीत ऑस्ट्रेलियाने दक्षिण आफ्रिकेविरुद्ध नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. संघाची सुरुवात अत्यंत निराशाजनक झाली. सलामीवीर ट्रॅव्हिस हेड नऊ धावांवर बाद झाला, तर निक मॅडिसन ३३ चेंडूंचा सामना करून तंबूत परतला. त्यानंतर स्टीव्ह स्मिथ आणि मार्नस लॅबुशेन यांनी तिसऱ्या विकेटसाठी ६० धावा जोडल्या, पण पहिल्या सत्राच्या शेवटच्या चेंडूवर लॅबुशेन ३७ धावा करून बाद झाला. तर, स्टिव्ह स्मिथ देथील २५ धावा करुन बाद झाला.

क्रिकेट जगतातून मोठी बातमी! न्यूझीलंडच्या ‘या’ स्टार खेळाडूची अचानक निवृत्ती; १८ वर्षांची झळाळती कारकीर्द संपली

Web Title: Steve smith overtakes steve waugh australia highest 3rd test run record pm

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Oct 09, 2026 | 06:18 PM

Topics:  

  • AUS vs SA
  • Australia Cricket Team
  • Steve
  • Steve Smith

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.