Pakistan Announced Squad for Hong kong sixes
हाँगकाँग सिक्सेस २०२५ मध्ये पाकिस्तानने अब्बास आफ्रिदीच्या नेतृत्वाखाली दमदार कामगिरी केली. अंतिम सामन्यात पाकिस्तानचा सामना कुवेतशी झाला. पाकिस्तानने ४३ धावांनी हा सामना जिंकून ट्रॉफी जिंकली. आता, पाकिस्तान पुन्हा हाँगकाँग सिक्सेस जिंकण्याच्या उद्देशाने मैदानात उतरेल. पाकिस्तान क्रिकेट बोर्डाने या स्पर्धेसाठी एक मजबूत संघ जाहीर केला आहे.
हाँगकाँग सिक्सेस २०२६ ( Hong Kong Sixes 2026) स्पर्धेचा पहिला सामना ३० ऑक्टोबर रोजी खेळला जाईल. तर, अंतिम सामना १ नोव्हेंबर रोजी खेळला जाईल. भारत. पाकिस्तान आणि युएई यांचा ‘क’ गटात समावेश आहे. हाँगकाँग सिक्सेसमधील पाकिस्तान पहिला सामना ३० ऑक्टोबर रोजी युएईविरुद्ध खेळेल. त्याच दिवशी पाकिस्तान आणि भारत देखील भिडतील. यावेळी भारत आणि पाकिस्तान हे दोन्ही संघ मजबूत असल्याने एक रोमांचक सामना अपेक्षित आहे.
हाँगकाँग सिक्सर्स २०२५ मध्ये पाकिस्तान आणि भारत यांच्यात गट फेरीचा सामना खेळला गेला. टीम इंडियाने ६ षटकांमध्ये ४ विकेट्स गमावून ८६ धावा केल्या. प्रत्युत्तरात, पावसामुळे खेळ थांबण्यापूर्वी पाकिस्तानने ३ षटकांत ४१ धावा केल्या. डकवर्थ-लुईस-स्टर्न (DLS) पद्धतीनुसार भारताने हा सामना २ धावांनी जिंकला. जरी पाकिस्तानने ही स्पर्धा जिंकली असली, तरी त्यांना भारताविरुद्ध विजय मिळवता आला नाही.
भुवनेश्वर कुमार (कर्णधार), क्रुणाल पंड्या, नितीश राणा, शशांक सिंग, टी नटराजन, राहुल त्रिपाठी आणि राहुल तेवतिया.
मोहम्मद अब्बास आफ्रिदी (कर्णधार), अब्दुल समद, अहमद दानियाल, मुहम्मद इरफान खान, ख्वाजा नफे, मुहम्मद शहजाद आणि साद मसूद






