Suryakumar Yadav: 'मिस्टर 360' संघात असता तर...; 'सूर्या' नसल्याने 'हा' खेळाडू BCCI वर संतापला, टीमचे नुकसान होणार?
Champions Trophy 2025: चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी टीम इंडियाची घोषणा करण्यात आली आहे. मुंबईच्या वानखेडे स्टेडियममध्ये ही पत्रकार परिषद झाली. कर्णधार रोहित शर्मा आणि चिफ सिलेक्टर अजित अगरकर यांच्या उपस्थितीत ही पत्रकार परिषद पार पडली. आश्चर्याची गोष्ट म्हणजे भारताचे दिग्गज असताना शुभमन गिलवर उपकर्णधारपदाची जबाबदारी सोपवण्यात आली. दरम्यान चॅम्पियन ट्रॉफीसाठी मोहम्मद सिराज, सूर्यकुमार यादव, इशान किशन, प्रसिद्ध कृष्णा, शार्दुल ठाकूर या खेळाडूना संधी मिळालेली नाही. दरम्यान सूर्यकुमार यादवची निवड न केल्याने भारताचा माजी खेळाडू सुरेश रैनाने बीसीसीआयवर संताप व्यक्त केला आहे.
रोहित शर्माच्या नेतृत्वात टीम इंडिया खेळणार
चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी भारतीय संघाची घोषणा करण्यात आली आहे. हा संघ रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली मैदानात उतरणार आहे. मुख्य निवडकर्ता अजित आगरकर आणि कर्णधार रोहित शर्मा यांनी पत्रकार परिषदेत संघाची घोषणा केली. यानंतर दोघांनीही माध्यमांच्या प्रश्नांची उत्तरे दिली. १९ फेब्रुवारीपासून चॅम्पियन्स ट्रॉफीला सुरुवात होत आहे. पाकिस्तानसोबतच युएईमध्येही सामने खेळवले जातील. भारताचा पहिला सामना २० फेब्रुवारी रोजी बांगलादेशविरुद्ध होईल.
काय म्हणाला सुरेश रैना?
सूर्यकुमार यादव जर भारतीय संघात असता तर तो एक्स फॅक्टर असता. भारतीय संघाला त्याची उणीव असेल. आता संघांमध्ये तीन फॉर्ममध्ये नसलेल्या तीन टॉप फलंदाजांवर जबाबदारी असणार आहे. सूर्यकुमार यादव असा खेळाडू आहे जो मैदानावर कोणत्याही दिशेला फटका मारू शकतो. कोणत्याही स्थितीमध्ये फलंदाजी करू शकतो.
सूर्यकुमार यादव हा स्फोटक फलंदाजीसाठी ओळखला जातो. मैदानावरील कोणत्याही भागात तो सहजपणे फटके मारू शकतो. अष्टपैलू खेळाडू म्हणून त्याची ओळख आहे. टी-20 वर्ल्ड कप स्पर्धेत अंतिम सामन्यात त्याने पडकलेला कॅच कोणीही विसरू शकत नही. सध्या भारतीय संघ त्याच्या नेतृत्वात टी-20 सामने खेळत आहे.
वरिष्ठ खेळाडू देशांतर्गत क्रिकेटपासून दूर का?
भारतीय संघात स्थान मिळताच खेळाडू देशांतर्गत क्रिकेटपासून दूर जातात. यावर कर्णधार रोहित शर्मा म्हणाला – गेल्या ६-७ वर्षांत वरिष्ठ संघातील खेळाडूंना विश्रांती मिळणे खूपच कमी झाले आहे. जेव्हा तुम्ही इतक्या वर्षात इतके आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळता तेव्हा तुम्हाला थोडा वेळ विश्रांतीचीही आवश्यकता असते. कोणीही हे हलके घेत नाही.
बुमराहच्या तंदुरुस्तीसाठी करावी लागणार प्रतीक्षा
जसप्रीत बुमराहच्या तंदुरुस्तीची परिस्थिती अद्याप स्पष्ट नाही. अजित आगरकर म्हणाले की, यासाठी आपल्याला फेब्रुवारीच्या सुरुवातीपर्यंत वाट पाहावी लागणार आहे. आम्ही जसप्रीत बुमराहच्या तंदुरुस्तीची वाट पाहत आहोत आणि बीसीसीआयच्या वैद्यकीय पथकाला फेब्रुवारीच्या सुरुवातीला त्याच्या प्रकृतीबद्दल माहिती मिळणार आहे.
INDIA'S SQUAD FOR CHAMPIONS TROPHY AND ENGLAND ODI SERIES:
Rohit (C), Gill (VC), Kohli, Iyer, KL Rahul, Hardik, Axar, Sundar, Kuldeep, Bumrah*, Shami, Arshdeep, Jaiswal, Pant and Jadeja.
*Harshit Rana will play the ODI series. pic.twitter.com/rbKwiDpLAF
— Mufaddal Vohra (@mufaddal_vohra) January 18, 2025
भारतीय संघ – रोहित शर्मा, शुभमन गिल, यशस्वी जयस्वाल, विराट कोहली, श्रेयस अय्यर, केएल राहुल, ऋषभ पंत, हार्दिक पांड्या, रवींद्र जडेजा, वॉशिंग्टन सुंदर, अक्षर पटेल, कुलदीप यादव, जसप्रीत बुमराह, मोहम्मद शमी, अर्शदीप सिंग