रोहित शर्माच्या नेतृत्वात भारत खेळणार चॅम्पियन्स ट्रॉफी, तर उपकर्णधार म्हणून शुभमन गिलच्या नावाची घोषणा
Champions Trophy 2025 : चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी टीम इंडियाची घोषणा करण्यात आली आहे. मुंबईच्या वानखेडे स्टेडियममध्ये ही पत्रकार परिषद झाली. कर्णधार रोहित शर्मा आणि चिफ सिलेक्टर अजित अगरकर यांच्या उपस्थितीत ही पत्रकार परिषद पार पडली. आश्चर्याची गोष्ट म्हणजे भारताचे दिग्गज असताना शुभमन गिलवर उपकर्णधारपदाची जबाबदारी सोपवण्यात आली. यामध्ये मोहम्मद सिराजला बाहेर ठेवण्यात आले आहे. तर विशेष गोष्ट म्हणजे अखेर मोहम्मद शमीचे भारतीय संघात आगमन झाले आहे. भारतीय संघ 3 वेगवान गोलंदाजांसोबत चॅम्पियन्स ट्रॉफी खेळणार आहे.
चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी भारतीय संघाची घोषणा
INDIA'S SQUAD FOR CHAMPIONS TROPHY AND ENGLAND ODI SERIES:
Rohit (C), Gill (VC), Kohli, Iyer, KL Rahul, Hardik, Axar, Sundar, Kuldeep, Bumrah*, Shami, Arshdeep, Jaiswal, Pant and Jadeja.
*Harshit Rana will play the ODI series. pic.twitter.com/rbKwiDpLAF
— Mufaddal Vohra (@mufaddal_vohra) January 18, 2025
जसप्रीत बुमराह अनफीट असल्याने हर्षित राणाला मिळणार संधी
जसप्रीत बुमराह अजूनही अनफीट असल्याने त्याच्याऐवजी हर्षित राणाला संधी मिळणार असल्याचे चिफ सिलेक्टर अजित आगरकर यांनी सांगितले. तरीही हर्षित राणाचे भारतीय संघातील अस्तित्व अजूनही अधांतरीच आहे. कारण अगोदरच मोहम्मद सिराजला बाहेर बसवण्यात आले आहे. त्यामुळे आणखी वेगवान गोलंदाज घेताना अगोदर मोहम्मद सिराजचा विचार केला जाईल परंतु जसप्रीत बुमराहच्या जागेवर हर्षित राणाला संधी मिळणार असल्याचे स्पष्टपणे सांगण्यात आले आहे.
रोहित शर्माच्या नेतृत्वात टीम इंडिया खेळणार
चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी भारतीय संघाची घोषणा करण्यात आली आहे. हा संघ रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली मैदानात उतरणार आहे. मुख्य निवडकर्ता अजित आगरकर आणि कर्णधार रोहित शर्मा यांनी पत्रकार परिषदेत संघाची घोषणा केली. यानंतर दोघांनीही माध्यमांच्या प्रश्नांची उत्तरे दिली. १९ फेब्रुवारीपासून चॅम्पियन्स ट्रॉफीला सुरुवात होत आहे. पाकिस्तानसोबतच युएईमध्येही सामने खेळवले जातील. भारताचा पहिला सामना २० फेब्रुवारी रोजी बांगलादेशविरुद्ध होईल.
रोहित शर्माची ग्रॅण्ड एंट्री
#WATCH | Maharashtra | Indian Men's cricket team captain Rohit Sharma arrived to attend the team selection meeting for the ICC Champions Trophy 2025 #iccchampionstrophy2025 pic.twitter.com/IIqE232zo1
— ANI (@ANI) January 18, 2025
विकेटकीपिंगसाठी ऋषभ पंत पहिली पसंती
ऋषभ पंतच्या अपघातानंतर केएल राहुल एकदिवसीय सामन्यांमध्ये विकेटकीपिंग करत होता. २०२३ च्या विश्वचषकातही राहुल यष्टीरक्षक होता. पण चॅम्पियन्स ट्रॉफी आणि इंग्लंडविरुद्धच्या मालिकेत, विकेटकीपिंगसाठी ऋषभ पंत ही पहिली पसंती असणार आहे. याबाबत मुख्य निवडकर्ता अजित आगरकर म्हणाले – चॅम्पियन्स ट्रॉफी आणि इंग्लंडच्या एकदिवसीय संघात ऋषभ पंत हा पहिल्या पसंतीचा विकेटकीपर फलंदाज आहे.
वरिष्ठ खेळाडू देशांतर्गत क्रिकेटपासून दूर का?
भारतीय संघात स्थान मिळताच खेळाडू देशांतर्गत क्रिकेटपासून दूर जातात. यावर कर्णधार रोहित शर्मा म्हणाला – गेल्या ६-७ वर्षांत वरिष्ठ संघातील खेळाडूंना विश्रांती मिळणे खूपच कमी झाले आहे. जेव्हा तुम्ही इतक्या वर्षात इतके आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळता तेव्हा तुम्हाला थोडा वेळ विश्रांतीचीही आवश्यकता असते. कोणीही हे हलके घेत नाही.
बुमराहच्या तंदुरुस्तीसाठी करावी लागणार प्रतीक्षा
जसप्रीत बुमराहच्या तंदुरुस्तीची परिस्थिती अद्याप स्पष्ट नाही. अजित आगरकर म्हणाले की, यासाठी आपल्याला फेब्रुवारीच्या सुरुवातीपर्यंत वाट पाहावी लागणार आहे. आम्ही जसप्रीत बुमराहच्या तंदुरुस्तीची वाट पाहत आहोत आणि बीसीसीआयच्या वैद्यकीय पथकाला फेब्रुवारीच्या सुरुवातीला त्याच्या प्रकृतीबद्दल माहिती मिळणार आहे
भारतीय संघ – रोहित शर्मा, शुभमन गिल, यशस्वी जयस्वाल, विराट कोहली, श्रेयस अय्यर, केएल राहुल, ऋषभ पंत, हार्दिक पांड्या, रवींद्र जडेजा, वॉशिंग्टन सुंदर, अक्षर पटेल, कुलदीप यादव, जसप्रीत बुमराह, मोहम्मद शमी, अर्शदीप सिंग