Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • raj thackeray |
  • IPL 2026 |
  • Marathi News |
  • crime news |
  • devendra fadnavis
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

IND vs SA: सूर्याचं ‘ब्रह्मास्त्र’, काळ्या मातीच्या खेळपट्टीवर आकडेच पुरेसे, दक्षिण आफ्रिकेच्या फलंदाजांना फुटेल घाम!

सुपर-८ फेरीच्या पहिल्याच सामन्यात आज क्रिकेट विश्वातील दोन दिग्गज संघ, भारत आणि दक्षिण आफ्रिका आमनेसामने येणार आहेत. दोन्ही संघ साखळी फेरीत चार-चार विजय मिळवून अजिंक्य राहून एकमेकांच्या समोर ठाकले आहेत.

  • By Ankita Karangutkar
Updated On: Feb 22, 2026 | 07:38 PM
IND vs SA:

IND vs SA:

Follow Us
Follow Us:
  • ICC T20 World Cup सुपर-८ फेरीत भारत -दक्षिण आफ्रिका आमनेसामने
  • अहमदाबादची ‘काळी माती’ अन् वरुणचं मिस्ट्री स्पीन
  • वरुणची ‘USP’ आणि वर्ल्ड कपमधील टेरर
IND vs SA: : टी-२० वर्ल्ड कप २०२६ चा थरार आता एका नव्या उंचीवर पोहोचला आहे. सुपर-८ फेरीच्या पहिल्याच सामन्यात आज क्रिकेट विश्वातील दोन दिग्गज संघ, भारत आणि दक्षिण आफ्रिका आमनेसामने लढणार आहेत. दोन्ही संघ साखळी फेरीत 4- 4 विजय मिळवून  एकमेकांच्या समोर ठाकले आहेत. त्यामुळे या दोन्ही संघांमधील सामन्याला ‘फायनलपूर्वीची फायनल’ असं म्हटलं जात आहे. मात्र, अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर होणाऱ्या या महामुकाबल्यात एक खेळाडू असा आहे, ज्याच्या नावाने दक्षिण आफ्रिकेच्या ड्रेसिंग रूममध्ये आत्तापासूनच दहशत पसरली आहे. सूर्याचं ‘ब्रम्हास्त्र’ म्हणजे टीम इंडियाचा मिस्ट्री स्पिनर वरुण चक्रवर्ती!

IND vs SA : एडन मारक्रमने नाणेफेक जिंकले, पहिले फलंदाजी करणार! अक्षर पटेल पुन्हा बेंचवर, जाणून घ्या Playing 11

अहमदाबादची ‘काळी माती’ अन् वरुणचं मिस्ट्री स्पीन

अहमदाबादच्या खेळपट्टीची ‘काळी माती’ फिरकीपटूंना नेहमीच मदत करते. अशा परिस्थितीत वरुण चक्रवर्ती दक्षिण आफ्रिकेच्या फलंदाजांसाठी चॅलेंजींग ठरू शकते. साखळी फेरीत वरुणने ज्या प्रकारे बॉलिंग केली आहेत. त्यातून त्याने जगातील दिग्गज फलंदाजांना गुडघे टेकण्यास भाग पाडले आहे. हळूवारपणे वळणारा बॉल आणि त्यातील वेरिएशन यामुळे फलंदाजांना त्याला खेळणं कठीण होऊन बसतं.

वरुणचे फटके आणि आफ्रिकेचे होतील हाल

वरुणला घातक शस्त्र उगाच म्हटले जात नाही. मुख्य म्हणजे वरुणने आफ्रिकेविरुद्धच्या द्विपक्षीय सीरीजमध्ये दोन्ही संघांमध्ये सगळ्यात जास्त विकेट घेतले आहेत. यामध्ये खेळल्या गेलेल्या ८ मॅचमध्ये त्याने एकूण २२ विकेट घेतली आहेत. म्हणजे त्याने प्रत्येक सामन्यात ३ विकेट पटकावले आहेत. गेल्या वर्षी डिसेंबरमध्ये खेळल्या गेलेल्या मालिकेतही वरुणने मालिकावीरचा किताब मिळवला होता. अशा परिस्थितीत काळी माती मिळेल तर वरुण मोठा कहर करु शकतो, जो दक्षिण आफ्रिकन संघाच्या फलंदाजांसाठी मोठं चॅलेंज ठरेल.

वरुणची ‘USP’ आणि वर्ल्ड कपमधील टेरर

वरुण चक्रवर्तीने ग्रुप स्टेजच्या चार सामन्यांमध्ये जी कामगिरी केली, ती फक्त उत्कृष्ट नाही तर भयावह आहे. त्याचा प्लस पॉईंट म्हणजे USP म्हणजेयूनिक सेलिंग प्वाइंट! त्याची अचूक लाईन आणि लेन्थ, ज्याला फलंदाज अजिबात बीट होते. साखळी फेरीतील त्याच्या विकेट्स आणि इकॉनॉमी रेट या गोष्टीची निश्चित करतात की, मधल्या ओव्हर्समध्ये वरुणला खेळणं म्हणजे आगीचे खेळ खेळण्या सारखंच आहे. केवळ दक्षिण आफ्रिकाच नाही, तर वर्ल्ड कपमधील सर्वच संघांमध्ये या मिस्ट्री स्पिनरची मोठी दहशत आहे.

विजयी चौकाराचा विक्रम कोण मोडणार?

एकीकडे सूर्यकुमार यादवचे धुरंधर आक्रमक फॉर्ममध्ये आहेत, तर दुसरीकडे एडन मार्करामचा दक्षिण आफ्रिकेचा संघही सज्ज आहे. मात्र, रेकॉर्ड आणि क्षमतेपेक्षा ‘फॉर्म’ महत्त्वाचा असतो आणि सध्या वरुण चक्रवर्ती ज्या फॉर्ममध्ये आहे, तो पाहता आज दक्षिण आफ्रिकन फलंदाजांची दाणादाण उडण्याची दाट शक्यता आहे.

IPL 2026 : MS Dhoni च्या चाहत्यांना मिळाली मोठी बातमी, चेन्नई सुपर किंग्जने पुनरागमनासाठी बनवला मास्टरप्लान बनवला

Web Title: Ind vs rsa t20 world cup super 8 varun chakravarthy mystery spin terror

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Feb 22, 2026 | 07:28 PM

Topics:  

  • Indian Criket team
  • Suryakumar Yadav
  • Varun Chakaravarthy
  • Varun Chakravarthy

संबंधित बातम्या

IND Vs AFG: एक मॅच खेळायची अन् ६ महिने बसायचं?; ICC च्या अजब वेळापत्रकावर अफगाणिस्तानचा प्रशिक्षक भडकला…
1

IND Vs AFG: एक मॅच खेळायची अन् ६ महिने बसायचं?; ICC च्या अजब वेळापत्रकावर अफगाणिस्तानचा प्रशिक्षक भडकला…

Suryakumar Yadav च्या फॉर्मला लागले ‘ग्रहण’; IPL पाठोपाठ ‘या’ स्पर्धेतही केली निराशा
2

Suryakumar Yadav च्या फॉर्मला लागले ‘ग्रहण’; IPL पाठोपाठ ‘या’ स्पर्धेतही केली निराशा

IPL Final की टीम इंडियासाठी ‘एंट्री टेस्ट’? Rajat Patidar अन् Shubhman Gill ची अग्निपरीक्षा
3

IPL Final की टीम इंडियासाठी ‘एंट्री टेस्ट’? Rajat Patidar अन् Shubhman Gill ची अग्निपरीक्षा

क्रिकेटविश्व हादरलं! Asian Games 2026 टीम इंडियाचे खेळाडू जाहीर? मात्र Suryakumar Yadav ला झटका
4

क्रिकेटविश्व हादरलं! Asian Games 2026 टीम इंडियाचे खेळाडू जाहीर? मात्र Suryakumar Yadav ला झटका

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.