Mumbai T20 League: Surya's captaincy flops in Mumbai T20; Mr. 360 Cha Sangh League Madhoon Baher..
Mumbai T20 League 2025 : आयपीएल २०२५ चे जेतेपद आरसीबीने पटकवले. या लीगच्या समाप्तीनंतर टी-२० मुंबई लीग २०२५ खेळवण्यात येत आहे. या दरम्यान, भारतीय संघातील अनेक स्टार खेळाडू या लीगमध्ये काही संघांचे नेतृत्व करताना दिसून येत आहेत. मुंबई इंडियन्सचा खेळाडू आणि टीम इंडियाचा टी-२० कर्णधार सूर्यकुमार यादव हा ट्रायम्फ नाईट्स एमएनई संघाचे नेतृत्व करत आहे. या स्पर्धेत मात्र त्याचे नेतृत्व काही कमाल दाखवू शकले नाही. आयपीएलमध्ये मुंबई इंडियन्सकडून खेळताना त्याने आपल्या बॅट धावांचा पाऊस पडला होता. परंतु त्याला टी-२० मुंबई लीग २०२५ लीगमध्ये आपली छाप सोडता आली नाही.
सूर्यकुमार यादवच्या नेतृत्वाखाली, ट्रायम्फ नाईट्स एमएनई संघ टी-२० मुंबई लीग २०२५ स्पर्धेतून मधून बाहेर पडला आहे. एकंदरीत, सूर्यकुमार यादवच्या नेतृत्वाखालील ट्रायम्फ नाईट्स एमएनई संघ बाद फेरीत देखील पोहचू शकला नाही. पहिल्या सामन्यानंतर सूर्यकुमार यादवल देखील चांगली कामगिरी करता आलेली नाही. आता यामुळे, त्याची सर्वत्र चर्चा सुरू झाली आहे.
हेही वाचा : WTC 2025 : स्टीव्ह स्मिथला खुणावतो ‘हा’ मोठा इतिहास! दिग्गज डॉन ब्रॅडमनच्या महान विक्रमाला करणार उध्वस्त..
मुंबई पँथर्सने सूर्यकुमार यादवच्या नेतृत्वाखाली ट्रायम्फ नाईट्स एमएनआयचा ३८ धावांनी पराभव केला आहे. या पराभवासह त्याचा संघ टी२० मुंबई लीगमधून बाहेर पडला आहे. या दरम्यान, कर्णधार पृथ्वी शॉने टीम पँथर्ससाठी ७५ धावांची संघाला जिंकून देणारी पारी खेळली. ज्यामुळे त्यांचा संघ सूर्याच्या संघाविरुद्ध २०७ धावांचा डोंगर उभा करू शकले. प्रत्युत्तरादाखल ट्रायम्फ नाईट्स एमएनआय संघ १६९ धावांच करू शकला.
या सामन्यात सूर्यकुमार यादव फलंदाजी आणि कर्णधारपद दोन्हीत आघाडीवर अपयशी ठरला आहे. तो मुंबई पँथर्सविरुद्ध २९ धावांची छोटी खेळी करू शकला. सूर्याच्या संघाने लीगमध्ये एकूण ५ सामने खेळले आहेत. या दरम्यान, त्यांना केवळ एकच सामना जिंकता आला, तर तीन सामने गमावले. त्याच वेळी, पावसामुळे एक सामना रद्द करण्यात झाला होता.
हेही वाचा : Bengaluru Stampede : सिद्धरामय्या सरकार संकटात! RCB कडून उच्च न्यायालयात मोठी पोल खोल, वाचा सविस्तर..
सूर्यकुमार यादव सद्या टी२० स्वरूपात टीम इंडियाचे नेतृत्व करत आहे. अशा परिस्थितीत, २०२५ च्या टी-२० मुंबई लीगमध्ये कर्णधार म्हणून त्याची कामगिरी चर्चेचा ठरत आहे. दुसरीकडे, श्रेयस अय्यर आणि पृथ्वी शॉ कर्णधार म्हणून या लीगमध्ये चमकदार कामगिरी करताना दिसत आहेत.