स्टीव्ह स्मिथ आणि डॉन ब्रॅडमन(फोटो-सोशल मिडिया)
WTC 2025 : दक्षिण आफ्रिका आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात ११ जूनपासून वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप २०२५ चा अंतिम सामना खेळला जाणार आहे. या दोघांमधील हा सामना इंग्लंडमधील ऐतिहासिक लॉर्ड्स क्रिकेट मैदानावर खेळवण्यात येणार आहे. संपूर्ण क्रिकेट जगताचे लक्ष या सामन्याकडे लागून आहे. अशा परिस्थितीत दोन्ही संघ हा महामुकाबला जिंकण्यासाठी प्रयत्नशील असणारा आहे. दरम्यान या सामन्यात ऑस्ट्रेलियाचे काही खेळाडू संघासाठी हुकूमचा एक्का ठरण्याची शक्यता आहे. अनुभवी स्टीव्ह स्मिथचा देखील यामध्ये समावेश आहे. या महान सामन्यात त्याला एक महान विक्रम करण्याची संधी चालून आली आहे.
हेही वाचा : Bengaluru Stampede : सिद्धरामय्या सरकार संकटात! RCB कडून उच्च न्यायालयात मोठी पोल खोल, वाचा सविस्तर..
वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप २०२५ च्या अंतिम सामन्यात स्टीव्ह स्मिथ जगातील दोन महान खेळाडूंचे विक्रम मोडण्याच्या उंबरठ्यावर आहे. खरं तर, स्टीव्ह स्मिथ हा महान क्रिकेटपटू डॉन ब्रॅडमन आणि कॅरिबियन दिग्गज फलंदाज गॅरी सोबर्स यांचा विक्रम मोडण्याची शक्यता आहे. जर स्टीव्ह स्मिथने वर्ल्ड कपच्या अंतिम सामन्यात एक अर्धशतक साकारले तर तो या दोन्ही खेळाडूंचे विक्रम मोडू शकतो.
स्मिथने दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या अंतिम सामन्यात ४० जरी केल्या तरी तो डॉन ब्रॅडमननंतर लॉर्ड्सच्या मैदानावर ऑस्ट्रेलियासाठी सर्वाधिक धावा करणारा फलंदाज ठरणार आहे. स्मिथने लॉर्ड्सवर एकूण ४ कसोटी सामने खेळले आहेत. या काळात त्याने ५१२ धावा काढल्या आहेत. त्याच वेळी डॉन ब्रॅडमन यांनी या ऐतिहासिक मैदानावर ५५१ धावा केल्या आहेत.
स्टीव्ह स्मिथ ऑस्ट्रेलियाचा महान अनुभवी फलंदाज आहे. त्याने वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप २०२५ च्या अंतिम सामन्यात ६० धावा केल्या तर तो लॉर्ड्सवर सर्वाधिक धावा करणारा जगातील पहिला फलंदाज बनणार आहे. आतापर्यंत हा महान विक्रम माजी कॅरिबियन दिग्गज गॅरी सोबर्स यांच्या नावावर आहे. त्याने लॉर्ड्सच्या मैदानावर ५ कसोटी सामन्यांच्या ९ डावात ५७१ धावा केल्या आहेत. या काळात त्याच्या बॅटमधून २ अर्धशतके आणि २ शतके आली आहेत.
हेही वाचा : IND Vs ENG : जसप्रीत बुमराह करणार जागतिक क्रिकेटवर राज्य! दोन विकेट अन् वसीम अक्रमचा विक्रम खालसा..
दक्षिण आफ्रिका संघ:
टोनी डी झॉर्झी, एडन मार्कराम, रायन रिकेल्टन, टेम्बा बावुमा (कर्णधार), डेव्हिड बेडिंगहॅम, ट्रिस्टन स्टब्स, काइल वेरेन, विआन मुल्डर, मार्को जॅनसेन, कॉर्बिन बॉश, कागिसो रबाडा, डेन पॅटरसन, लुंगी एनगिडी, केशव महाराज, केशव महाराज, सेन.
ऑस्ट्रेलिया संघ :
उस्मान ख्वाजा, मारिनस लाबुशेन, सॅम कॉन्स्टाझा, स्टीव्ह स्मिथ, ट्रॅव्हिस हेड, अॅलेक्स कॅरी, जोश इंग्लिस, कॅमेरॉन ग्रीन, ब्यू वेबस्टर, पॅट कमिन्स (कर्णधार), मिचेल स्टार्क, जोश हेझलवूड, स्कॉट बोलँड, नॅथन लायन, मॅट कुह्नेमन.