Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • रवि, 21 जून 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Fifa World Cup |
  • Lifestyles |
  • ICC Women's T20 World Cup |
  • India vs Afghanistan |
  • political news
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

T20 World Cup 2026 : टी-२० विश्वचषकापूर्वीच भारताला झटका! सूर्या आर्मीचा ‘हा’ स्टार खेळाडू संघाबाहेर

७ फेब्रुवारीपासून टी-२० विश्वचषक २०२६ सुरू होत आहे. या मोठ्या स्पर्धेपूर्वी भारतीय संघाला मोठा झटका बसला आहे. भारतीय वेगवान गोलंदाज हर्षित राणा सराव सामन्यादरम्या झालेल्या दुखापतीमुळे संघातून बाहेर पडला आहे.

  • By लखन शोभा बाळकृष्ण
Updated On: Feb 06, 2026 | 08:17 PM
T20 World Cup 2026: A setback for India even before the T20 World Cup! This star player from Suryakumar Yadav's team is out of the squad.

T20 World Cup 2026: A setback for India even before the T20 World Cup! This star player from Suryakumar Yadav's team is out of the squad.

Follow Us
Follow Us:

Harshit Rana ruled out of T20 World Cup : ७ फेब्रुवारीपासून टी-२० विश्वचषक २०२६ सुरू होणार आहे. या विश्वचषकापूर्वी भारतीय संघाला मोठा झटका बसला आहे. भारतीय संघात दुखापतग्रस्त खेळाडूंची संख्या सातत्याने वाढत असल्याचे दिसत आहे.  भारतीय वेगवान गोलंदाज हर्षित राणा टी-२० विश्वचषकातून जवळजवळ बाहेर पडल्याची माहिती आहे.

हेही वाचा : IND vs ENG, U19 World Cup Final : सामना एक अन्…! वैभव सूर्यवंशीकडून विक्रमांची झडी; फायनलमध्ये 175 धावांची स्फोटक खेळी

तरुण भारतीय वेगवान गोलंदाज हर्षित राणाला सराव सामन्यादरम्यान गुडघ्याला दुखापत झाली आहे, ज्यामुळे टी-२० विश्वचषकातून त्याला बाहेर ठेवण्याची दाट  शक्यता आहे. आता, तो स्पर्धेतून बाहेर पडणे जवळजवळ निश्चित झाल्यात जमा आहे. भारतीय कर्णधार सूर्यकुमार यादव यांनी शुक्रवारी पत्रकार परिषदेत याबद्दल माहिती देताना  सांगितले की राणाची दुखापत “ठीक दिसत नाही.”

काय म्हणाला सूर्यकुमार यादव?

कर्णधार सूर्यकुमार यादव म्हणाला की, “हर्षित राणा अद्याप बाहेर पडलेला नाही. आमचे फिजिओ त्याची तपासणी करत आहेत, परंतु त्याची दुखापत गंभीर असल्याचे दिसत आहे.” संघातील सूत्रांच्या मते राणा स्पर्धेसाठी वेळेत बरा होण्याची शक्यता कमी असल्याचे दिसत आहे. परिणामी, भारतीय संघ लवकरच राणाच्या जागी बदली खेळाडू शोधणार आहे.

दक्षिण आफ्रिकेविरुद्ध टाकले एकच षटक

हर्षित राणा दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या सराव सामन्यात फक्त एकच षटक टाकू शकला. गुडघ्याच्या दुखापतीमुळे मैदान सोडण्यापूर्वी त्याला १६ धावा मोजाव्या लागल्या. तो भारताच्या सुरुवातीच्या एकादशाचा भाग नसला तरी, विशेष परिस्थितीत खालच्या फळीत गोलंदाजी आणि फलंदाजीसाठी तो उपयुक्त पर्याय ठरू शकतो.

हर्षितच्या जागी कोण?

प्रसिद्ध कृष्णा किंवा मोहम्मद सिराज सारखा अनुभवी वेगवान गोलंदाज हर्षित राणाच्या जागी विचारात घेतला जाऊ शकतो. दरम्यान, अष्टपैलू वॉशिंग्टन सुंदरलाही हॅमस्ट्रिंग स्ट्रेनच्या त्रासातून जावे लागत आहे. ज्यामुळे त्याच्या देखील उपलब्धतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित होताना दिसत आहेत. भारतीय संघ शनिवारी अमेरिकेविरुद्ध टी-२० विश्वचषक मोहिमेला सुरुवात करणार आहे. या सामन्यापूर्वीच  या दुखापतीमुळे भारतीय संघाच्या गोलंदाजीच्या पर्यायांसमोर एक नवीन आव्हान उभे झाले आहे.

हेही वाचा : WPL 2026 Final : ‘तुम्ही सर्वजण या विजयासाठी…’RCB च्या विजेतेपदावर किंग कोहलीचा मानधनासाठी खास संदेश, पोस्ट VIRAL

टी-२० विश्वचषक स्पर्धेसाठी भारतीय संघ

सूर्यकुमार यादव (कर्णधार), तिलक वर्मा, रिंकू सिंग, अभिषेक शर्मा, हार्दिक पांड्या, शिवम दुबे, अक्षर पटेल, वॉशिंग्टन सुंदर, संजू सॅमसन, इशान किशन, हर्षित राणा, जसप्रीत बुमराह, वरुण चक्रदीप सिंग, के अर्लदीप सिंग, के.

Web Title: T20 world cup 2026 harshit rana ruled out of the indian team even before the t20 world cup

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Feb 06, 2026 | 08:17 PM

Topics:  

  • Harshit Rana
  • IND vs USA
  • Suryakumar Yadav
  • T20 World Cup 2026

संबंधित बातम्या

IND vs AFG: तिसऱ्या सामन्यात भारताच्या संघात धडाकेबाज बॉलरची Surprise Entry, BCCI ने केली घोषणा
1

IND vs AFG: तिसऱ्या सामन्यात भारताच्या संघात धडाकेबाज बॉलरची Surprise Entry, BCCI ने केली घोषणा

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.