सूर्या आणि 'हिटमॅन' यांच्यातील नाते भारतीय चाहत्यांसाठी नेहमीच खास राहिले आहे. जेव्हा सूर्यकुमार यादव अमेरिकेविरुद्धच्या सामन्यासाठी टॉसला पोहोचला तेव्हा एक आश्चर्यकारक दृश्य पाहायला मिळाले.
२०२६ च्या टी-२० विश्वचषकातील पहिल्याच सामन्यात अवघ्या पाच चेंडूत भारताला अडचणीत आणणारा शॅडली स्कालविक कोण आहे? त्याने भारताविरूद्ध झालेल्या सामन्यामध्ये कमालीची कामगिरी केली.
मोहम्मद सिराजनेही भारताला पराभवापासून वाचवण्यात महत्त्वपूर्ण भूमिका बजावली. संघाचा सर्वात यशस्वी गोलंदाज म्हणून सिद्ध झालेला सिराज विशेषतः उल्लेखनीय होता. या सामन्यानंतर मोहम्मद सिराज मुलाखतीमध्ये भावूक झाला होता.
विजयानंतर, टीम इंडियाचा कर्णधार सूर्यकुमार यादवने वॉशिंग्टन सुंदर आणि जसप्रीत बुमराह यांच्या फिटनेसबद्दल महत्त्वपूर्ण अपडेट दिले. त्यांनी हे देखील स्पष्ट केले की ते विजयावर खूश नाहीत.
सूर्याच्या लढाऊ खेळी आणि मोहम्मद सिराजच्या घातक सलामीच्या जोरावर भारताने अमेरिकेचा २९ धावांनी पराभव केला. गतविजेत्या भारताने टी-२० विश्वचषक इतिहासात सर्वाधिक सलग विजयांचा विक्रम प्रस्थापित केला.
टी-२० वर्ल्ड कप २०२६ च्या पहिल्याच दिवशी भारतीय संघाने गुणतालिकेत (Points Table) अव्वल स्थान पटकावले आहे. पाकिस्तानला मागे सारत टीम इंडियाने टेबल टॉपर बनण्याचा मान मिळवला असून पाहा काय आहे…
T20 World Cup 2026: टी-२० वर्ल्ड कप २०२६ मध्ये सूर्याने कर्णधार म्हणून पदार्पणातच ८४ धावांची शानदार खेळी केली. यामुळे त्याने विराट कोहली आणि बाबर आझमचे विक्रम मोडले आहेत. वाचा सविस्तर…
आयसीसी टी-२० विश्वचषक २०२६ स्पर्धेतील तिसऱ्या सामन्यात भारताने अमेरिकेला २९ धावांनी धूळ चारली. मुंबई येथील वानखेडे स्टेडियमवर खेळवण्यात आलेल्या या सामन्यात भारताने विजय मिळवत स्पर्धेची विजयी सुरुवात केली.
आज आयसीसी टी-२० विश्वचषक २०२६ स्पर्धेत मुंबई येथील वानखेडे स्टेडियमवर भारत आणि अमेरिका यांच्यात सामना खेळला जात आहे. या सामन्यात भारताने प्रथम फलंदाजी करत अमेरिकेसमोर १६२ धावांचे आव्हान उभे केले आहे.
आयसीसी टी-२० विश्वचषक २०२६ स्पर्धेत आज मुंबई येथील वानखेडे स्टेडियमवर अमेरिकेविरुद्ध भारतीय संघ अडचणीत आला आहे. भारतीय संघाच्या ४६ धावांवर ४ विकेट्स गेल्या आहेत.
आज आयसीसी टी-२० विश्वचषक २०२६ स्पर्धेच्या तिसऱ्या सामन्यात मुंबई येथीळ वानखेडे स्टेडियमवर भारत आणि अमेरिका आमनेसामने आले आहेत. अमेरिकेने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे.
टी-२० विश्वचषक स्पर्धेत आज भारत आणि अमेरिका वानखेडे स्टेडियमवर आमनेसामने भिडणार आहेत. या सामन्याआधी भारतीय संघातील सदस्य आणि सहाय्यक कर्मचारी यांनी श्री सिद्धिविनायक मंदिराला भेट दिली आहे.
आज आयसीसी टी-२० विश्वचषक २०२६ भारतीय संघ आणि यूएसए संघ या स्पर्धेतील तिसऱ्या सामन्यात मुंबई येथील वानखेडे स्टेडियमवर आमनेसामने येणार आहेत. या खेळपट्टीवर फलंदाजांना मदत मिळत आली आहे.
बहुप्रत्यक्षित आयसीसी टी-२० विश्वचषक २०२६ स्पर्धेत आज तिसऱ्या सामन्यात मुंबई येथील वानखेडे स्टेडियमवर भारत आणि यूएसए आमनेसामने येणार आहेत. या सामन्यात भारताचा सलामीवीर अभिषेक शर्माला विक्रम रचण्याची संधी असणार आहे.
आयसीसी टी२० विश्वचषक २०२६ चा शुभारंभ 7 फेब्रुवारीपासून होणार आहे. भारत आणि अमेरिका पहिल्या दिवशी त्यांचा तिसरा गट फेरीचा सामना खेळतील. हा सामना कधी आणि कुठे पाहता यावर सविस्तर माहिती…
७ फेब्रुवारी रोजी अमेरिकेविरुद्ध टी-२० विश्वचषक २०२६ मध्ये भारत आपल्या मोहिमेची सुरुवात करणार आहे. तथापि, चाहत्यांना काळजी आहे की पाऊस या सामन्याची मजा खराब करू शकतो.
रताचा वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराह तापामुळे अमेरिकेविरुद्धच्या टी-२० विश्वचषक सामन्यात खेळणार नाही. शनिवारी मुंबईतील वानखेडे स्टेडियमवर भारत आणि अमेरिका यांच्यात सामना होणार आहे.
७ फेब्रुवारीपासून टी-२० विश्वचषक २०२६ सुरू होत आहे. या मोठ्या स्पर्धेपूर्वी भारतीय संघाला मोठा झटका बसला आहे. भारतीय वेगवान गोलंदाज हर्षित राणा सराव सामन्यादरम्या झालेल्या दुखापतीमुळे संघातून बाहेर पडला आहे.
२ फेब्रुवारी रोजी भारत अ आणि अमेरिका यांच्यात सराव सामना झाला. या सामन्यात तिलकने बॅट आणि बॉल दोन्हीने आपली हुशारी दाखवली. त्यांच्या प्रभावी कामगिरीने भारतीय संघात अमेरिकेविरुद्ध विजयातही महत्त्वाची भूमिका…
२०२६ च्या टी२० विश्वचषकापूर्वी भारत अ संघाला अमेरिका आणि नामिबियाविरुद्ध दोन सराव सामने खेळायचे आहेत. या सामन्यांसाठी भारत अ संघाची घोषणा करण्यात आली आहे, ज्याचा कर्णधार आयुष बदोनी आहे.