Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शुक्र, 6 नोव्हेंबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Diwali |
  • India Vs New Zealand |
  • Under 19 Asia Cup |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Suryakumar Yadav : सूर्यकुमार यादवने घेतली कुटुंबीयांसह पंतप्रधान मोदींची भेट; चिमुरडीनं गायलेल्या भजनानं पंतप्रधानांचे मंत्रमुग्ध

Suryakumar Yadav : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सूर्यकुमार यादव, पत्नी देविशा शेट्टी आणि कुटुंबीयांची भेट घेतली. चिमुकलीने सादर केलेल्या भजनाने मोदी मंत्रमुग्ध झाले. भेटीचा व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर केला आहे.

  • By Rakesh Khedekar
Updated On: Nov 06, 2026 | 04:54 PM
Surykumar Yadav : सूर्यकुमार यादवने घेतली कुटुंबीयांसह पंतप्रधान मोदींची भेट; चिमुरडीनं गायलेल्या भजनानं पंतप्रधानांचे मंत्रमुग्ध

Surykumar Yadav : सूर्यकुमार यादवने घेतली कुटुंबीयांसह पंतप्रधान मोदींची भेट; चिमुरडीनं गायलेल्या भजनानं पंतप्रधानांचे मंत्रमुग्ध

Follow Us
Follow Us:
  • सुर्यकुमारने घेतली सहकुटुंब पंतप्रधानांची भेट
  • भेटीदरम्यान सुर्याच्या मुलीची पहिली झलक
  • चिमुरडीच्या भजनानं मोदी मंत्रमुग्ध
 

भारतीय टी-20 संघाचा माजी कर्णधार सूर्यकुमार यादवने (Suryakumar Yadav) आपली पत्नी देविशा शेट्टी व मुलांसह पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांची खास भेट घेतली. दरम्यान, या भेटीचा व्हिडिओ पंतप्रधान मोदी यांनी सोशल मीडियावर शेअर केला आहे. या व्हिडिओमध्ये सूर्यकुमारसोबत आलेल्या मुलीनं गायलेल्या भजनानं पंतप्रधान मोदी मंत्रमुग्ध झाल्याचे पाहण्यास मिळाले.

सुर्याच्या मुलीची पहिली झलक

पंतप्रधान मोदी यांनी आपल्या एक्स अकाउंटवर या भेटीचा व्हिडिओ पोस्ट केला आहे. त्यामध्ये ते सूर्यकुमार यादव, त्याची पत्नी देविशा शेट्टी आणि त्यांच्या सोबत आलेल्या मुलांशी संवाद साधताना दिसत आहेत. या वेळी सूर्यकुमारसोबत आलेल्या एका चिमुकलीने भजन सादर केले. तिचे भजन ऐकून मोदी भारावून गेल्याचे व्हिडिओमध्ये दिसते. तसेच मे महिन्यात जन्मलेल्या सूर्यकुमारची मुलगी रिधीमाचा या व्हिडिओमध्ये झलक पाहायला मिळते. पंतप्रधान मोदी यांनी रिधीमाला प्रेमाने जवळ घेत तिची विचारपूस केली.

या भेटीचा उल्लेख करताना मोदी यांनी एक्सवर लिहिले की, दिवाळीच्या वातावरणात राम आणि सरयूचे आगमन झाले आहे. त्यामुळे दिवाळीचे वातावरण अधिक पवित्र आणि दिव्य झाले आहे. धनत्रयोदशीच्या मुहूर्तावर झालेली सूर्यकुमार यादव आणि त्याच्या कुटुंबीयांची पंतप्रधानांसोबतची ही भेट विशेष ठरली.

Asian Champions Trophy : भारताचा विक्रमी षटकार! जपानला 4-1 ने नमवत सहाव्यांदा आशियाई चॅम्पियन्स ट्रॉफीवर नाव कोरले

सुर्याच्या नेतृत्त्वात भारताला जेतेपद

सूर्यकुमार यादवच्या नेतृत्वाखाली भारतीय संघाने 2026 च्या टी-20 विश्वचषकाचे विजेतेपद पटकावले होते. मायदेशात टी-20 विश्वचषक जिंकणारा भारत हा पहिलाच संघ ठरला होता. मात्र, कर्णधार म्हणून विश्वविजेतेपद मिळवूनही वैयक्तिक खराब फॉर्ममुळे सूर्यकुमारला पुढील मालिकेतून वगळण्यात आले. सध्या तो देशांतर्गत क्रिकेटमध्ये खेळून भारतीय संघात पुनरागमन करण्याच्या प्रयत्नात आहे.

आगामी सय्यद मुश्ताक अली ट्रॉफी आणि विजय हजारे करंडक स्पर्धेसाठी त्याच्याकडे मुंबई संघाचे नेतृत्व सोपवण्यात आले आहे. एकेकाळी टी-20 क्रमवारीत जगातील अव्वल फलंदाज राहिलेल्या सूर्यकुमारने भारताकडून 113 टी-20 आंतरराष्ट्रीय सामन्यांत चार शतके आणि 25 अर्धशतकांसह 3 हजार 272 धावा केल्या आहेत.

IND vs SL ODI: भारत-श्रीलंका मालिकेबाबत मोठी अपडेट! पहिल्या वनडे सामन्याचे ठिकाण बदलले; पाहा अपडेटेड शेड्यूल

💡

Frequently Asked Questions

  • Que: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कोणाची भेट घेतली?

    Ans: पंतप्रधान मोदी यांनी भारतीय क्रिकेटपटू सूर्यकुमार यादव, त्याची पत्नी देविशा शेट्टी आणि कुटुंबीयांची भेट घेतली.

  • Que: सूर्यकुमार यादव आणि मोदी यांच्या भेटीचा व्हिडिओ कुठे शेअर करण्यात आला?

    Ans: पंतप्रधान मोदी यांनी हा व्हिडिओ त्यांच्या अधिकृत एक्स अकाउंटवर शेअर केला.

  • Que: या भेटीत पंतप्रधान मोदी कशामुळे मंत्रमुग्ध झाले?

    Ans: सूर्यकुमारसोबत आलेल्या एका चिमुकलीने सादर केलेले भजन ऐकून पंतप्रधान मोदी मंत्रमुग्ध झाले.

Web Title: Pm modi meets suryakumar yadav family devisha shetty rk

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Nov 06, 2026 | 04:54 PM

Topics:  

  • Narendr Modi
  • Suryakumar Yadav
  • T-20 World Cup

संबंधित बातम्या

Narendra Modi : 2014 मध्ये 5 शहरांमध्ये मेट्रो; आता 26 शहरांपर्यंत विस्तार, पंतप्रधान मोदींची माहिती
1

Narendra Modi : 2014 मध्ये 5 शहरांमध्ये मेट्रो; आता 26 शहरांपर्यंत विस्तार, पंतप्रधान मोदींची माहिती

Asian Para Games : पॅरा खेळाडूंचा ऐतिहासिक पराक्रम! पंतप्रधान मोदी 5 नोव्हेंबरला साधणार संवाद
2

Asian Para Games : पॅरा खेळाडूंचा ऐतिहासिक पराक्रम! पंतप्रधान मोदी 5 नोव्हेंबरला साधणार संवाद

Ishan Kishan : ईशान किशनने रचला टी-20 मध्ये इतिहास; असं करत त्याने अनेकांना मागे सारलं
3

Ishan Kishan : ईशान किशनने रचला टी-20 मध्ये इतिहास; असं करत त्याने अनेकांना मागे सारलं

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.