Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • सोम, 29 जून 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Fifa World Cup |
  • Lifestyles |
  • ICC Women's T20 World Cup |
  • ind vs ire |
  • political news
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

T20 World Cup 2026 : श्रीलंकेला मोठा झटका! टी२० विश्वचषकातून वानिंदू हसरंगा बाहेर, ‘या’ खेळाडूची लागली वर्णी 

आयसीसी पुरुष टी२० विश्वचषक २०२६ स्पर्धेत श्रीलंकेच्या क्रिकेट संघाला मोठा धक्का बसला आहे. श्रीलंकेचा महत्वाचा फिरकी गोलंदाज वानिंदू हसरंगा दुखापतीमुळे स्पर्धेतून बाहेर पडला आहे.

  • By लखन शोभा बाळकृष्ण
Updated On: Feb 11, 2026 | 05:38 PM
T20 World Cup 2026: Big blow to Sri Lanka! Wanindu Hasaranga out of T20 World Cup, 'this' player has been named

T20 World Cup 2026: Big blow to Sri Lanka! Wanindu Hasaranga out of T20 World Cup, 'this' player has been named

Follow Us
Follow Us:

Wanindu Hasaranga out of T20 World Cup : आयसीसी पुरुष टी२० विश्वचषक २०२६ स्पर्धा ऐन रंगात असताना  श्रीलंकेच्या क्रिकेट संघाला मोठा झटका बसला आहे. श्रीलंका संघाचा महत्वाचा फिरकी गोलंदाज वानिंदू हसरंगा दुखापतीमुळे स्पर्धेतून बाहेर गेला आहे.  त्याच्या जागी फिरकी गोलंदाजी करणारा अष्टपैलू दुशन हेमंथाची वर्णी लागली आहे. आयसीसीच्या इव्हेंट टेक्निकल कमिटीकडून या बदलाला मान्यता देण्यात आली आहे.

श्रीलंकेच्या आयर्लंडविरुद्धच्या पहिल्या सामन्यात हसरंगाला हॅमस्ट्रिंगची दुखापत झाली होती. तरी दुखापत असून देखील, त्याने उल्लेखनीय लवचिकता दाखवली आणि त्याचे चार षटके पूर्ण केली. सामन्यात त्याने २५ धावा देऊन तीन महत्त्वपूर्ण विकेट चटकावल्या होत्या. तथापि, सामन्यानंतर केलेल्या एमआरआय स्कॅनमध्ये त्याच्या डाव्या हाताच्या स्नायूला गंभीर दुखापत झाली असल्याचे स्पष्ट झाले आहे. यामुळे तो संपूर्ण स्पर्धेतूनच आता बाहेर पडला आहे.

हेही वाचा : T20 World Cup 2026 : सूर्याआर्मीच्या चिंतेत वाढ! स्फोटक फलंदाज अभिषेक शर्मा हॉस्पिटलमध्ये भरती; भारताचा ‘प्लॅन बी’ काय?

 हसरंगाच्या जागी हेमंथा वानिन्दुची वर्णी

हसरंगाच्या जागी ३१ वर्षीय दुशान हेमंथाला संघात स्थान देण्यात आले आहे. हेमंथाने आतापर्यंत श्रीलंकेसाठी पाच एकदिवसीय आणि तीन टी-२० आंतरराष्ट्रीय सामन्यात प्रतिनिधित्व केले आहे. तो एक उपयुक्त स्पिन अष्टपैलू खेळाडू मानला जातो तसेच तो फलंदाजी आणि चेंडू दोन्हीतून संघाला संतुलन प्रदान करण्याची क्षमता ठेवतो. श्रीलंकेचा पुढचा सामना गुरुवारी ओमानविरुद्ध आहे, जिथे हेमंथा महत्त्वाची भूमिका बजावेल अशी अपेक्षा व्यक्त करण्यात येत आहे.

आयसीसीकडून दुशान हेमंथाच्या समावेशाला मान्यता

आयसीसीने अधिकृत प्रसिद्धीपत्रकामध्ये म्हटले आहे की, “आयसीसी पुरुष टी-२० विश्वचषक २०२६ च्या इव्हेंट टेक्निकल कमिटीने वानिन्दु हसरंगाच्या जागी श्रीलंकेच्या संघात दुशान हेमंथाचा समावेश करण्यास मान्यता दिली आहे.”

ब्रेसवेलच्या जागी कोण?

दरम्यान, आयसीसीने न्यूझीलंडचा अष्टपैलू मायकेल ब्रेसवेलच्या जागी खेळाडूला देखील मान्यता देण्यात आली आहे. ८ फेब्रुवारी रोजी चेन्नईमध्ये अफगाणिस्तानविरुद्धच्या सराव सामन्यादरम्यान ब्रेसवेलला पायाला दुखापत झाली होती. तथापि, न्यूझीलंडकडून अद्याप त्याच्या जागी खेळाडूची घोषणा करण्यात आलेली नाही.

हेही वाचा : T20 World Cup 2026 : ‘गोलंदाजांपुरतेच मर्यादित…’ उस्मान तारिकच्या गोलंदाजीअ‍ॅक्शनवर अश्विनचे भाष्य! क्रिकेट विश्वात खळबळ

खेळाडूंच्या बदलीसाठी इव्हेंट टेक्निकल कमिटीची मान्यता खूप आवश्यक असते. या समितीमध्ये आयसीसीचे महाव्यवस्थापक वसीम खान, गौरव सक्सेना, हेमांग अमीन आणि दक्षिण आफ्रिकेचा माजी वेगवान गोलंदाज शॉन पोलॉक यांचा समावेश आहे.

Web Title: T20 world cup 2026 sri lankas wanindu hasaranga out of t20 world cup

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Feb 11, 2026 | 05:38 PM

Topics:  

  • Sri Lanka
  • T20 World Cup 2026
  • Wanindu Hasaranga

संबंधित बातम्या

Ravana Lanka Tour: रावणाची लंका आणि अशोकवाटिका आता कशी दिसते? प्रदीप काबरांनी दाखवली थक्क करणारी दृश्ये
1

Ravana Lanka Tour: रावणाची लंका आणि अशोकवाटिका आता कशी दिसते? प्रदीप काबरांनी दाखवली थक्क करणारी दृश्ये

US-Sri Lanka Relations : हिंद महासागरात अमेरिकेची मोठी खेळी! श्रीलंकेत उच्चस्तरीय बैठका सुरू; चीनला थेट संदेश?
2

US-Sri Lanka Relations : हिंद महासागरात अमेरिकेची मोठी खेळी! श्रीलंकेत उच्चस्तरीय बैठका सुरू; चीनला थेट संदेश?

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.