Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • मंगळ, 13 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • CJP |
  • Ind vs WI |
  • Dharmendra Pradhan |
  • entertainment |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

AUS Vs BAN: महाखळबळ! ऑस्ट्रेलियाविरुद्ध बांगलादेश अडचणीत? ‘या’ खेळाडूंच्या खेळण्यावर टांगती तलवार

बांग्लादेशचा संघ ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर आहे. पहिल्या सामन्यात तंजिद हसन तमीमने शानदार शतकी खेळी केली होती. मात्र आता दुसऱ्या सामन्यात त्याच्या खेळण्यावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.

  • By तेजस भागवत
Updated On: Aug 21, 2026 | 06:13 PM
bangladesh vs australia test series

bangladesh vs australia test series

Follow Us
Follow Us:
  • ऑस्ट्रेलियाच्या दुसऱ्या कसोटीपूर्वी बांग्लादेश संघाला मोठा धक्का
  • उद्यापासून सुरू होणार बांग्लादेश अन् ऑस्ट्रेलियाचा कसोटी सामना 
  • बांग्लादेशच्या संघाने जिंकला आहे पहिला सामना 
Bangladesh Vs Australia Test Series: सध्या बांग्लादेश आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात दोन सामन्यांची टेस्ट सिरिज खेळवली जात आहे. दुसरा सामना बांग्लादेश आणि ऑस्ट्रेलियामध्ये उद्यापासून सुरू होणार आहे. पहिल्या सामन्यात बांग्लादेशच्या संघाने ऑस्ट्रेलियाला त्यांच्याच भूमीत पराभूत केले आहे. दुसऱ्या सामना सुरू होण्याआधी बांग्लादेश संघाला अडचणीत सापडला आहे. संघातील दोन खेळाडू खेळणार की नाही ही अद्याप स्पष्ट झाले नाही.

उद्यापासून ऑस्ट्रेलिया आणि बांग्लादेश यांच्यात दूसरा कसोटी सामना सुरू होणार आहे. या महत्त्वाच्या सामन्यापूर्वी बांगलादेशचा संघ एका मोठ्या अडचणीत सापडला असल्याचे दिसत आहे. संघातील दोन महत्त्वाच्या खेळाडूंच्या दुसऱ्या सामन्यातील सहभागावर अनिश्चिततेचे ढग जमा झाले असून, हे दोन्ही खेळाडू मैदानात उतरणार की नाही, याचा अंतिम निर्णय सामना सुरू होण्यापूर्वीच घेतला जाणार आहे.

पहिला सामना जिंकून बांगलादेशच्या संघाने मालिकेत १-० अशी आघाडी मिळवली आहे, त्यामुळे पुढील सामना अत्यंत रोमांचक आणि चुरशीचा होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. पहिला सामना जिंकल्याने बांग्लादेशचा आत्मविश्वास उंचावला आहे. मात्र याच वेळी बांग्लादेशला मोठा धक्का बसला आहे. संघातील दोन प्रमुख खेळाडूना दुखापत झाल्याचे समजते आहे.

AUS Vs BAN: ऑस्ट्रेलियाची इज्जत जाणार? डार्विनमध्ये बांगलादेशकडे ‘हा’ रेकॉर्ड रचण्याची संधी…

बांग्लादेशचा संघ ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर आहे. पहिल्या सामन्यात तंजिद हसन तमीमने शानदार शतकी खेळी केली होती. मात्र आता दुसऱ्या सामन्यात त्याच्या खेळण्यावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. त्याच्या मानेला दुखापत झाल्याचे समजते आहे. तर मुशफिकुर रहीमच्या खेळण्याबाबत देखील शंका आहे. त्याच्या बोटाला दुखापत झाल्याचे समोर येत आहे. त्यामुळे हे दोन्ही खेळाडू दुसऱ्या सामन्यात खेळणार की नाही याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. सामना सुरू होण्याच्या आधी हे दोन्ही खेळाडू खेळणार की नाही हे ठरवले जाणार आहे.

WTC Points: तब्बल 30 लाखांचा दंड आणि WTC पॉईंटमध्येही घट, बांग्लादेशकडून पराभवानंतर ऑस्ट्रेलियावर नामुष्की

संघातील दोन प्रमुख खेळाडूंना दुखापत झाली असून त्यांच्या तंदुरुस्तीवर वैद्यकीय पथक बारीक लक्ष ठेवून आहे. हे खेळाडू अंतिम ११ मध्ये सामील होण्यासाठी पूर्णपणे तंदुरुस्त आहेत की नाही, याचा निर्णय टॉसच्या वेळी किंवा सामन्याच्या अवघ्या काही वेळ आधी केला जाईल. मालिकेचा पहिला सामना जिंकून बांगलादेशने इतिहास रचण्याच्या दिशेने पाऊल टाकले आहे. दुसरा सामना जिंकून देखील ऑस्ट्रेलियाला क्लीन स्वीप देण्याचा प्रयत्न बांग्लादेश संघाचा असणार आहे.

Web Title: Tanjid imam and mushfikur rahim injured second test australia vs bangladesh test series

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Aug 21, 2026 | 06:13 PM

Topics:  

  • Australia Team
  • australia vs bangladesh
  • Bangladesh Cricket

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.