Aus Vs Ban: ऑस्ट्रेलियाचा कणाच बांग्लादेशने मोडला (फोटो सौजन्य - X.com)
AUS vs BAN: उलटा पडला डाव! बांग्लादेशी ठरले वरचढ, 29 धावातच ऑस्ट्रेलियाचे 4 गडी बाद, झाली दमछाक
बांगलादेशच्या संघाने ऑस्ट्रेलियाच्या गोलंदाजांची धुलाई केली आहे. बांगलादेश ऑस्ट्रेलियावर वरचढ ठरला आहे. अद्याप दोन दिवसांचा खेळ बाकी आहे. ऑस्ट्रेलियाचा संघ प्रथम फलंदाजी करताना १९८ रन्स वर ऑल आउट झाला. तर बांगलादेशचा संघ फलंदाजी करण्यासाठी आला. बांगलादेशने ४२६ रन्सचा बलाढ्य डोंगर उभा केला.
आपल्या कारकिर्दीतील दुसराच कसोटी सामना खेळणाऱ्या तंजीद हसनने शानदार शतक ठोकले. त्याने १०१ रन्सची खेळी केली. या खेळीच्या जोरावर बांगलादेश संघाने ऑस्ट्रेलियाविरुद्ध तब्बल २२८ रन्सची आघाडी घेतली आहे. तसेच बांगलादेशने ऑस्ट्रेलियाविरुद्ध आपला सर्वाधिक दुसरा मोठा स्कोअर देखील केला आहे. याआधी २००६ मध्ये बांगलादेशने ४२७ रन्स केल्या होत्या.
दुसऱ्या डावात ऑस्ट्रेलियाचा संघ चांगली फलंदाजी करण्याची अपेक्षा होती. मात्र त्यांनी निराशा केली. तिसऱ्या दिवशीचा खेळ संपला तेव्हा ऑस्ट्रेलियाने ४ विकेट्स गमावून १६१ रन्स केल्या होत्या. अद्याप ऑस्ट्रेलियाचा संघ ६७ रन्सने पिछाडीवर आहे. अद्याप दोन दिवसांचा खेळ बाकी आहे.
AUS Vs BAN: कांगारूंना लयं पळवलं! घरच्या मैदानावर ऑस्ट्रेलिया अडचणीत, तंजिद हसनने…
आतापर्यंत ऑस्ट्रेलिया आणि बांगलादेशमध्ये ६ कसोटी सामने खेळवले गेले आहेत. हा सातवा सामना आहे. यातील पाच ऑस्ट्रेलियाने तर एक बांगलादेशने जिंकला आहे. एक सामना अनिर्णित राहिला होता. बांगलादेशने घरच्या मैदानावर आपला सामना जिंकला होता. मात्र यावेळेस बांगलादेशचा संघ मोठा विक्रम करण्याची शक्यता आहे. याचे कारण म्हणजे बांगलादेशचा संघ ऑस्ट्रेलियाला पराभूत करण्याच्या अगदी जवळ पोहोचला आहे. ऑस्ट्रेलियामध्ये बांगलादेशने अद्याप एकही कसोटी सामना जिंकलेला नाही. त्यामुळे हा पहिला कसोटी सामना जिंकून बांगलादेशला नवा रेकॉर्ड रचण्याची संधी असणार आहे. तसेच बांगलादेशने सामना जिंकल्यास ऐरीजमध्ये ते आघाडीवर असणार आहेत. ज्यामुळे ऑस्ट्रेलियावर दबाव वाढू शकतो. मात्र या सामन्यात ऑस्ट्रेलिया परत येणार का हे पाहावे लागणार आहे.

