
GT Vs DC Live: शुभमनची 'किलींग' खेळी'; गोलंदाजांची धुलाई, दिल्लीला जिंकण्यासाठी 211 धावांची गरज
दिल्ली कॅपिटल्स विरुद्ध गुजरात टायटन्स
अक्षर पटेलचा प्रथम गोलंदाजीचा निर्णय
गुजरात टायटन्ससाठी करो या मरो स्थिती
Tata IPL 2026 Live GT vs DC Updates: सध्या दिल्लीतील अरुण जेटली स्टेडियमवर दिल्ली कॅपिटल्स विरुद्ध गुजरात टायटन्स सामना सुरू आहे. दिल्ली कॅपिटल्सचा कर्णधार अक्षर पटेलने टॉस जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. आजच्या सामन्यावर पावसाचे सावट आहे. गुजरात टायटन्ससाठी हा सामना त्यांत महत्वाचा समजला जात आहे. दरम्यान प्रथम फलंदाजी करताना गुजरात टायटन्स इतक्या 210 रन्स केल्या असून दिल्ली कॅपिटल्सला 211 रन्सचे टार्गेट दिले आहे.
गुजरात टायटन्सची फलंदाजी
गुजरात टायटन्सकडून फलंदाजीची सुरुवात करण्यासाठी सलामीला कर्णधार शुभमन गिल आणि डावखुरा फलंदाज साई सुदर्शन मैदानात उतरले. साई सुदर्शन 12 रन्स करून आउट झाला. मागील सामन्यातील कामगिरीचे सातत्य त्याला या सामन्यात राखता आले नाही. त्यानंतर जोस बटलर खेळण्यासाठी आला. त्याने 24 चेंडूत आपले अर्धशतक पूर्ण केले. जोस बटलर 27 चेंडूत 52 रन्स आउट झाला.
बटलर आउट झाल्यावर वॉशिंग्टन सुंदर खेळण्यासाठी आला. कर्णधार शुभमन गिलने 34 चेंडूत 51 रन्सची अर्धशतकी तुफानी खेळी केली. शुभमन गिलने 45 चेंडूत 70 रन्सची तुफानी खेळी केली. राहुल तेवतीयाने 1 तर ग्लेन फिलिप्सने 14 रन्स केल्या. तर वॉशिंग्टन सुंदरने 55 रन्सची जोरदार अर्धशतकी खेळी केली.
दिल्ली कॅपिटल्सची गोलंदाजी
टॉस जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय कर्णधार अक्षर पटेलने घेतला आहे. दरम्यान मुकेश कुमारने फॉर्ममध्ये असणाऱ्या साई सुदर्शनला 12 रन्सवर आउट केले. गुगली बॉलिंगसाठी ओळखल्या जाणाऱ्या कुलदीप यादवने जोस बटलरची विकेट घेतली. शुभमन गिल, वॉशिंग्टन सुंदर, जोस बटलरने दिल्ली कॅपिटल्सच्या गोलंदाजांची चांगलीच धुलाई केली. मुकेश कुमारने 4 ओव्हर्समध्ये 55 रन्स देऊन 2 विकेट्स घेतल्या. तर लुंगी एनगीडीने 4 ओव्हर्समध्ये 24 रन्स देऊन एक विकेट घेतली.
DC Vs GT Pitch Report: मैदान तयार, खेळाडू सज्ज, पण…; पाऊस गेम करणार, पहा पीच रिपोर्ट
गुजरात टायटन्सची संभाव्य टीम: शुभमन गिल (कर्णधार), साई सुदर्शन, जोस बटलर (यष्टिरक्षक), ग्लेन फिलिप्स, वॉशिंग्टन सुंदर, राहुल तेवतिया, शाहरुख खान, राशिद खान, कगिसो रबाडा, मोहम्मद सिराज, प्रसिद्ध कृष्णा
दिल्ली कॅपिटल्सची संभाव्य टीम: अक्षर पटेल (कर्णधार), समीर रिझवी, टिम डेविड, जॅक फ्रेझर-मॅकगर्क, जितेश शर्मा (यष्टिरक्षक), कृणाल पंड्या, मार्कस स्टॉइनिस, वरुण चक्रवर्ती, हर्षल पटेल, मुकेश कुमार