
राजस्थान रॉयल्सचा प्रथम फलंदाजीचा निर्णय
वैभव आणि यशस्वीने केली जोरदार सुरुवात
गुजरातच्या गोलंदाजांची केली धुलाई
Tata IPL 2026 GT Vs RR Live Updates: सध्या गुजरात टायटन्स विरुद्ध राजस्थान रॉयल्सचा सामना अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर सुरू आहे. राजस्थान रॉयल्स फलंदाजी करत आहे. कर्णधार रियान परागने टॉस जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर वैभव सूर्यवंशी आणि यशस्वी जयस्वालने राजस्थानला एक शानदार सुरुवात करून दिली. प्रथम फलंदाजी करताना राजस्थान रॉयल्सने गुजरात टायटन्सला 211 धावांचे लक्ष्य दिले आहे. आता गुजरात टायटन्सला पहिला विजय मिळवण्यासाठी 211 धावांचे लक्ष्य पूर्ण करावे लागणार आहे.
राजस्थान रॉयल्सची फलंदाजी
राजस्थान रॉयल्सने प्रथम फलंदाजी करण्याचे ठरवले होते. दरम्यान डावखुरा फलंदाज वैभव सूर्यवंशीने पॉवर प्लेमध्ये वेगाने रन्स केले. वैभव सूर्यवंशी 31 रन्स करून आउट झाला. यशस्वी जयस्वालने तडाखेबंद खेळी करत आपले अर्धशतक पूर्ण केले. यशस्वी 55 रन्स करून आउट झाला. त्यानंतर कर्णधार रियान पराग खेळण्यासाठी आला. मात्र रियान पराग केवळ 8 च धावा करू शकला. त्यानंतर हेटमायर खेळण्यासाठी आला, मात्र टो केवळ 18 धावांचे योगदान देऊ शकला. डोनोव्हन फरेरा सुद्धा 1 रन करून आउट झाला. शेवटच्या ओव्हरमध्ये शेवटच्या चेंडूवर रवींद्र जाडेजाने चौकार मारून राजस्थान रॉयल्सला 210 धावांपर्यंत पोहोचवले. ध्रुव जुरेल 75 धावांची खेळी करून आउट झाला.
गुजरात टायटन्सची गोलंदाजी
गुजरात टायटन्सच्या गोलंदाजांना राजस्थान रॉयल्सच्या ओपनर्सने चांगले धुवून काढले. पॉवर प्लेमध्ये गुजरातच्या गोलंदाजांना विकेट मिळवता आली नाही. मात्र फिरकीपटू राशिद खानने वैभव सूर्यवंशीची विकेट घेतली. तर कागिसो रबाडाने यशस्वी जयस्वालला 55 रन्सवर आउट केले. तर मागच्या सामन्यात सर्वाधिक विकेट्स घेणाऱ्या प्रसिद्ध कृष्णाने राजस्थानचा कर्णधार रियान परागची विकेट घेतली. तर अशोक शर्माने हेटमायरला 18 रन्सवर आउट केले. कागिसो रबाडाने 4 ओव्हर्समध्ये 2 विकेट पटकवल्या. शेवटच्या ओव्हरमध्ये मोहम्मद सिराजने चांगली गोलंदाजी केली. त्याने ध्रुव जुरेलला 75 रन्सवर आउट केले.
Setting the tone 🆙🔝 Yashasvi Jaiswal with his first 5⃣0⃣ of the season 👏#RR 111/1 after 11.2 overs. Updates ▶️ https://t.co/6D02Fh0IHv#TATAIPL | #KhelBindaas | #GTvRR | @rajasthanroyals | @ybj_19 pic.twitter.com/cqNMwYxezj — IndianPremierLeague (@IPL) April 4, 2026
GT Vs RR Live: राजस्थान रॉयल्सला जयस्वाल करणार ‘यशस्वी’; कर्णधाराने गुजरातविरुद्ध घेतला ‘हा’ निर्णय
गुजरात टायटन्सची संभाव्य टीम: शुभमन गिल, साई सुदर्शन, जोस बटलर, वॉशिंग्टन सुंदर, ग्लेन फिलिप्स, शाहरुख खान, राहुल तेवतिया, रशीद खान, कागिसो रबाडा, प्रसिद्ध कृष्णा, मोहम्मद सिराज, जेसन होल्डर.
राजस्थान रॉयल्सची संभाव्य टीम यशस्वी जयस्वाल, वैभव सूर्यवंशी, ध्रुव जुरेल, रियान पराग, शिमरॉन हेटमायर, रवींद्र जडेजा, डोनोवन फरेरा, जोफ्रा आर्चर, रवी बिश्नोई, नांद्रे बर्गर, संदीप शर्मा, शिमरॉन हेटमायर,