
राजस्थान रॉयल्सने लखनौला दिले 160 रन्सचे टार्गेट
रवींद्र जाडेजाने केल्या सर्वाधिक 22 रन्स
लखनौच्या गोलंदाजीसमोर आरआरचे फलंदाज कोलमडले
Tata IPL 2025 LSG Vs RR Live Updates: आज एकाना क्रिकेट स्टेडियमवर लखनौ सुपर जायंट्स आणि राजस्थान रॉयल्स यांच्यात सामना पार पडला. या सामन्यात लखनौने प्रथम गोलंदाजी केली. राजस्थान रॉयल्सने प्रथम फलंदाजी करताना लखनौला 160 रन्सचे टार्गेट दिले होते. लखनौच्या गोलंदाजीसमोर (IPL 2026) आरआरचे फलंदाज कोलमडले. दरम्यान या आजच्या सामन्यात राजस्थान रॉयल्सने लखनौचा 40 रन्सने पराभव केला आहे.
लखनौची फलंदाजी
आयपीएलचा थरार सुरू होऊन महिना पूर्ण होत आला आहे. 27 एप्रिल रोजी आयपीएलचा महासंग्राम सुरू होऊन 1 महिना पूर्ण होईल. दरम्यान आज राजस्थान रॉयल्स आणि लखनौच्या संघात सामना पार पडला. राजस्थान रॉयल्सने दिलेल्या 160 रन्सच्या टार्गेटचा पाठलाग करण्यासाठी मिशेल मार्श आणि एडन मारक्रम मैदानात उतरले. एडन मारक्रम एकही रन न करता आउट झाला.
Match 32. WICKET! 17.6: Mohsin Khan 0(3) b Jofra Archer, Lucknow Super Giants 119 all out https://t.co/5SaPY8wfsc #TATAIPL | #LSGvRR — IndianPremierLeague (@IPL) April 22, 2026
पॉवर प्लेमध्ये 3 विकेट गमावल्यामुळे लखनौचा संघ थोडासा अडचणीत आला होता. आयुष बडोनी देखील पहिल्याच चेंडूवर रनआउट झाला. त्यामुळे तो आपले खाते ही उघडू शकला नाही. त्यापाठोपाठ कर्णधार ऋषभ पंत देखील आपल्या रन्सचे खाते उघडू करू शकला नाही. हिम्मत सिंगने 15 रन्स केल्या. मिशेल मार्शने शानदार अर्धशतक केले. तो 55 रन्स करून आउट झाला. मुकुल चौधरीने 7 रन्स केल्या. मोहम्मद शामीने एक शानदार सिक्स लगावला. मात्र ब्रजेश शर्माच्या यॉर्करवर शामी आउट झाला. मयंक यादव 5 रन्स करून आउट झाला.
RR Vs LSG Live: जाडेजाने सावरले राजस्थानचे ‘वैभव’; लखनौला विजयासाठी 160 रन्सची आवश्यकता
राजस्थान रॉयल्सची गोलंदाजी
जोफरा आर्चरने एडन मारक्रमला शून्यावर आउट केले. नांद्रे बर्गर कर्णधार ऋषभ पंतची विकेट पटकावली. तर रवींद्र जाडेजाने निकोलस पूरनला आउट केले. रवी बिश्नोईने हिम्मत सिंगला आउट केले. नांद्रे बर्गरने 55 रन्स करून सेट झालेल्या मिशेल मार्शला आउट केले. तर एकहाती सामना फिरवण्याची क्षमता असलेल्या मुकुल चौधरीला ब्रजेश शर्माने 7 रन्स वर आउट केले.
राजस्थान रॉयल्सची फलंदाजी
लखनौच्या संघाने प्रथम फलंदाजी करण्यासाठी आमंत्रित केल्यावर राजस्थान रॉयल्सची सुरुवात वैभव सूर्यवंशी आणि यशस्वी जयस्वालने केली. यशस्वीने 12 बॉल्समध्ये 22 रन्स केल्या. तर वैभव सूर्यवंशी आजच्या सामन्यात चांगली खेळी करू शकला नाही. तो केवळ 8 रन्स करून आउट झाला. त्यानंतर काही सामन्यात महत्वाची खेळी करणारा ध्रुव जुरेल खेळण्यासाठी मैदानात आला. मात्र तो पहिल्याच बॉलवर आउट झाला.
लखनौची गोलंदाजी
मोहम्मद शमीने चांगली गोलंदाजी केली. त्याने 4 ओव्हर्समध्ये 30 रन्स करून 2 विकेट्स घेतल्या. तर प्रिन्स यादवने 2 महत्वाच्या विकेट घेतल्या. त्याने रियान पराग आणि डोनोव्हन फेरेराची विकेट घेतली. तर मोसीन खान वैभव सूर्यवंशी आणि शिमरन हेटमायची विकेट घेतली.
सूड! लागोपाठ यशस्वीने मारले 3 चौकार, मोहम्मद शामीचा राग अनावर अन् पुढच्याच बॉलवर…
लखनौ सुपर जायंट्स : ऋषभ पंत (कर्णधार), एडन मार्कराम, हिम्मत सिंग, मॅथ्यू ब्रेट्झके, मुकुल चौधरी, अक्षत रघुवंशी, जोश इंग्लिस, मिचेल मार्श, अब्दुल समद, शाहबाज अहमद, अर्शीन कुलकर्णी, वानिंदू हसरंगा, आयुष मोहम्मद सिंह, महंमद सिंह, शहीद खान, शहीद खान, एम. राठी, आकाश सिंग, प्रिन्स यादव, अर्जुन तेंडुलकर, एनरिक नोर्टजे, नमन तिवारी, मयंक यादव, मोहसीन खान.
आता चेन्नई जिंकणारच! CSK चा ‘कर्ता धर्ता’ MS Dhoni ‘या’ दिवशी उतरणार मैदानात? मोठी अपडेट आली समोर
राजस्थान रॉयल्स : रियान पराग (कर्णधार), ध्रुव जुरेल, डोनोव्हन फरेरा, लुआन-ड्रे प्रिटोरियस, रवी सिंग, अमन पेरल, शिमरॉन हेटमायर, शुभम दुबे, वैभव सूर्यवंशी, यशस्वी जैस्वाल, रवींद्र जडेजा, ॲडम मिल्ने, ब्रिजेश शर्मा, नानफ्रा, जोफ्रा, अरविंद शर्मा, अरविंद कुमार, के. बर्गर, रवी बिश्नोई, संदीप शर्मा.