
PBKS Vs RCB Live: पंजाबचा पराभवाचा 'सिक्सर'! तर Virat च्या 'आरसीबी' ठरली पहिली क्वालिफाय टीम
आरसीबीने पंजाबला दिले 223 रन्सचे टार्गेट
कर्णधार श्रेयस अय्यर 1 रन करून आउट
पॉवर प्लेमध्ये भुवनेश्वर कुमारचा जबरदस्त स्पेल
Tata IPL 2026 PBKS Vs RCB Live: हिमाचल प्रदेशच्या धर्मशाळा क्रिकेट स्टेडियम आज आयपीएलचा महत्वाचा सामना पार पडला. पंजाब किंग्ज आणि रॉयल चॅलेंजर्स बंगलोर आमनेसामने आले होते. पंजाबने प्रथम गोलंदाजी केली. आरसीबीने पंजाब किंग्जला 223 रन्सचे टार्गेट दिले होते. अखेर या महत्वाच्या सामन्यात आरसीबीने पंजाब किंग्जचा दारुण पराभव केला आहे. या विजयामुळे आरसीबी यंदाच्या हंगामातील पहिली क्वालिफाय करणारी टीम ठरली आहे. तर पंजाबच्या प्ले ऑफमध्ये जाण्याच्या आशा जवळपास संपल्या आहेत.
पंजाब किंग्जची फलंदाजी
आरसीबीने विराट कोहली, वेंकटेश अय्यर आणि टीम डेव्हिडच्या जोरदार खेळीवर पंजाबला 223 रन्सचे टार्गेट दिले होते. त्या रन्सचा पाठलाग करण्यासाठी पंजाबकडून प्रियांश आर्य आणि प्रभसिमरन सिंग मैदानात उतरले. दोघेही फलंदाजी गेले काही सामने तडाखेबंद खेळी करत आहे. मात्र दोन्ही फलंदाज स्वस्तात आउट झाले. प्रियांश आर्य शून्यावर आणि प्रभसिमरन सिंग 2 रन्स करून आउट झाला. अडचणीत सापडलेल्या पंजाबला सावरण्यासाठी कर्णधार श्रेयस अय्यर खेळण्यासाठी आला. मात्र तो देखील 1 रन करून आउट झाला. कूपर कॉनली चांगली खेळी करत होता. तो 37 रन्स वर आउट झाला. सुयश शेडगेने 35 रन्स केल्या. मार्कसस स्टॉयनीसने 37 रन्सची खेळी केली. शशांक सिंगने पंजाबला विजयी करण्याचे प्रयत्न शेवटपर्यंत केले. मात्र 56 रन्सची महत्वाची खेळी करून तो आउट झाला.
RCB Vs PBKS: धुरळाच! Venky च्या वादळी खेळीने पंजाबचं प्लेऑफचं स्वप्न भंगणार? किंग्जला 223 रन्सची गरज
आरसीबीची गोलंदाजी
पॉवर प्लेमध्ये आरसीबीच्या गोलंदाजांनी पंजाबच्या फलंदाजांना मैदानावर टिकू दिले नाही. भुवनेश्वर कुमारने आपल्या पहिल्याच ओव्हरमध्ये प्रियांश आर्य आणि प्रभसिमरन सिंगची विकेट घेतली. तर रसिख डारने कर्णधार श्रेयस अय्यरची विकेट पटकावली. रोमारीयो शेफर्डने कूपर कॉनलीची विकेट पटकावली. सुयश शर्माने सुयश शेडगेला आउट केले. रासीख डारने शशांक सिगला आउट केले.
आरसीबीची फलंदाजी
पंजाब किंग्जने टॉस जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर आरसीबीकडून डावाची सुरूवात करण्यासाठी विराट कोहली आणि जेकब बेथल खेळण्यासाठी आले. जेकब बेथलने आजच्या सामन्यात साजेशी खेळी केली नाही. तो केवळ 7 रन्स करून आउट झाला. देवदत्त पाडीकल आणि विराट कोहलीने चांगली भागीदारी केली. मात्र पाडीकल 45 रन्स करून आउट झाला. विराट कोहलीने शानदार अर्धशतक लगावले. विराट कोहली 58 रन्स करून आउट झाला. कर्णधार रजत पाटीदार आज खेळत नाहीये त्याच्या जागेवर खेळणारया वेंकटेश अय्यरने आज अत्यंत आक्रमक आणि पंजाबची झोप उडवणारी फलंदाजी केली. त्याने शानदार अर्धशतक केले.
Straight to business right from ball one ☝️ Bhuvneshwar Kumar – The Powerplay Specialist ✨ Updates ▶️ https://t.co/3u5qL0Zn75#TATAIPL | #KhelBindaas | #PBKSvRCB | @BhuviOfficial pic.twitter.com/I16uzU7FVW — IndianPremierLeague (@IPL) May 17, 2026
पंजाब किंग्जची गोलंदाजी
पॉवर प्लेमध्ये पंजाबच्या गोलंदाजांना यश मिळाले. सलामीची जोडी फोडण्यात त्यांना यश आले. हरप्रीत ब्रारने जेकब बेथलची विकेट घेतली. हरप्रीत ब्रारने लागोपाठ दोन महत्वाच्या विकेट घेतल्या. त्याने सेट झालेल्या देवदत्त पडीकलला आउट केले. वेंकटेश अय्यरने गोलंदाजांची चांगलीच धुलाई केली. मात्र एका बाजूने आरसीबीचा डाव सांभाळणाऱ्या विराट कोहलीला युझवेंद्र चहलने आउट केले.
रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु प्लेइंग ११– जेकब बेथेल, विराट कोहली, देवदत्त पडिक्कल, व्यंकटेश अय्यर, जितेश शर्मा (कर्णधार/विकेटकीपर), टिम डेव्हिड रोमारियो शेफई, कृणाल पंड्या, भुवनेश्वर कुमार, जोश हेजलवूड आणि सुयश शर्मा, इमपॅक्ट सबस्टीट्यूट – रसिक सलाम, जॉर्डन कॉक्स, अभिनंदन सिंह, स्वप्नील सिंह, कनिष्क चौहान.
RCB vs PBKS: आरसीबी विरुद्ध पंजाबच्या ‘करो या मरो’ सामन्यात कसा असेल खेळपट्टीचा अंदाज? जाणून घ्या
पंजाब किंग्स प्लेइंग ११– प्रियांश आर्य, प्रभसिमरन सिंग (विकेटकिपर), कूपर कोनोली, श्रेयस अय्यर (कर्णधार), सूर्यांश शेडगे, शशांक सिंग, अझमतुल्ला उमरझाई, हरप्रीत ब्रार, लॉकी फर्ग्युसन, अर्शदीप सिंग आणि युझवेंद्र चहल. मार्कस स्टोइनिस, झेवियर बार्टलेट, विष्णू विनोद, मुशीर खान, प्रवीण दुबे