RCB Vs PBKS Live Streaming (फोटो- ट्विटर)
पंजाब किंग्जचा प्रथम गोलंदाजीचा निर्णय
विराट कोहलीचे शानदार अर्धशतक
वेंकटेश अय्यरने केली पंजाबची धुलाई
Tata IPL 2026 PBKS Vs RCB Live Updates: हिमाचल प्रदेशमध्ये असलेल्या धरमशाळा येथील क्रिकेट स्टेडियमवर पंजाब किंग्ज विरुद्ध रॉयल चॅलेंजर्स बंगलोरमध्ये सामना सुरू आहे. पंजाब किंग्जचा कर्णधार श्रेयस अय्यरने टॉस जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. पंजाबकडून पहिल्यांदाच सामना खेळणारया हरप्रीत ब्रारने चांगली गोलंदाजी केली. अखेर पहिल्या डावात आरसीबीने 222 रन्स केल्या आहेत. आता पंजाब किंग्जला जिंकण्यासाठी 223 रन्सची गरज असणार आहे.
आरसीबीची फलंदाजी
पंजाब किंग्जने टॉस जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर आरसीबीकडून डावाची सुरूवात करण्यासाठी विराट कोहली आणि जेकब बेथल खेळण्यासाठी आले. जेकब बेथलने आजच्या सामन्यात साजेशी खेळी केली नाही. तो केवळ 7 रन्स करून आउट झाला. देवदत्त पाडीकल आणि विराट कोहलीने चांगली भागीदारी केली. मात्र पाडीकल 45 रन्स करून आउट झाला. विराट कोहलीने शानदार अर्धशतक लगावले. विराट कोहली 58 रन्स करून आउट झाला. कर्णधार रजत पाटीदार आज खेळत नाहीये त्याच्या जागेवर खेळणारया वेंकटेश अय्यरने आज अत्यंत आक्रमक आणि पंजाबची झोप उडवणारी फलंदाजी केली. त्याने शानदार अर्धशतक केले.
RCB vs PBKS Live: पंजाबने जिंकला टॉस, आरसीबी करणार प्रथम फलंदाजी; ‘हा’ दिग्गज खेळाडू बाहेर
पंजाब किंग्जची गोलंदाजी
पॉवर प्लेमध्ये पंजाबच्या गोलंदाजांना यश मिळाले. सलामीची जोडी फोडण्यात त्यांना यश आले. हरप्रीत ब्रारने जेकब बेथलची विकेट घेतली. हरप्रीत ब्रारने लागोपाठ दोन महत्वाच्या विकेट घेतल्या. त्याने सेट झालेल्या देवदत्त पडीकलला आउट केले. वेंकटेश अय्यरने गोलंदाजांची चांगलीच धुलाई केली. मात्र एका बाजूने आरसीबीचा डाव सांभाळणाऱ्या विराट कोहलीला युझवेंद्र चहलने आउट केले.
A maiden fifty in red and gold ❤️ Venkatesh Iyer is putting on a show in Dharamshala 👌 Updates ▶️ https://t.co/3u5qL0Zn75#TATAIPL | #KhelBindaas | #PBKSvRCB pic.twitter.com/OH6VQKjmYB — IndianPremierLeague (@IPL) May 17, 2026
रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु प्लेइंग ११– जेकब बेथेल, विराट कोहली, देवदत्त पडिक्कल, व्यंकटेश अय्यर, जितेश शर्मा (कर्णधार/विकेटकीपर), टिम डेव्हिड रोमारियो शेफई, कृणाल पंड्या, भुवनेश्वर कुमार, जोश हेजलवूड आणि सुयश शर्मा, इमपॅक्ट सबस्टीट्यूट – रसिक सलाम, जॉर्डन कॉक्स, अभिनंदन सिंह, स्वप्नील सिंह, कनिष्क चौहान.
RCB vs PBKS: आरसीबी विरुद्ध पंजाबच्या ‘करो या मरो’ सामन्यात कसा असेल खेळपट्टीचा अंदाज? जाणून घ्या
पंजाब किंग्स प्लेइंग ११– प्रियांश आर्य, प्रभसिमरन सिंग (विकेटकिपर), कूपर कोनोली, श्रेयस अय्यर (कर्णधार), सूर्यांश शेडगे, शशांक सिंग, अझमतुल्ला उमरझाई, हरप्रीत ब्रार, लॉकी फर्ग्युसन, अर्शदीप सिंग आणि युझवेंद्र चहल. मार्कस स्टोइनिस, झेवियर बार्टलेट, विष्णू विनोद, मुशीर खान, प्रवीण दुबे






