IPL फायनलसाठी भारत दौऱ्यावर PCB अध्यक्ष मोहसिन नक्वी? पाकिस्तानच्या दाव्याने चर्चांना उधाण
आयपीएल २०२६ मध्ये पहिल्यांदाच धर्मशाळा येथे दुपारचा सामना खेळवला जाईल. हिमाचल प्रदेश क्रिकेट असोसिएशन स्टेडियममधील खेळपट्टी फलंदाजांसाठी खूप चांगली मानली जाते. येथे चेंडू बॅटवर सहज येतो, ज्यामुळे फलंदाजांना मोठे शॉट्स खेळता येतात. सामन्याच्या सुरुवातीला वेगवान गोलंदाजांना फायदा होण्याची शक्यता आहे, परंतु खेळ जसजसा पुढे जाईल, तसतसे फिरकी गोलंदाजही प्रभावी ठरु शकतात. या पिचवर दव महत्वाची भूमिका बजावतो. म्हणून या पिचवर नाणेफेक जिंकणे हे महत्वाचे ठरेल. तसेच येथे खेळल्या गेलेल्या १० सामन्यांमध्ये १० सामने लक्ष्याचा पाठलाग करणाऱ्या संघाने जिंकले आहेत. म्हणून नाणेफेक जिंकणारा कर्णधार प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेऊ शकतो. डीसी विरुद्धच्या सामन्यासाठी वापरलेलीच खेळपट्टी या सामन्यासाठीही वापरली जाईल. या स्टेडियमध्ये हवामान चांगले राहण्याची शक्यता असून, तापमान सुमारे २० अंश सेल्सिअस असेल. परंतु, यावेळी पाऊस पडण्याची ३० टक्के शक्यता वर्तवली जात आहे.
आयपीएल २०२६ मध्ये पहिल्यांदाच आरसीबी आणि पंजाब आमनेसामने येणार आहेत. बंगळुरुने आतापर्यंत १२ पैकी आठ सामने जिंकले असून ते प्लेऑफच्या अगदी जवळ पोहोचले आहेत. पंजाबने १२ सामन्यांपैकी ६ सामने जिंकून ते १३ गुणांसह चौथ्या स्थानावर आहे.आयपीएलच्या इतिहासात पंजाब किंग्स आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळूर यांच्यात ३७ सामने खेळले गेले आहेत. यापैकी आरसीबीने १९ सामने जिंकले आहेत, तर पीबीकेएसने १८ सामने जिंकले आहेत.
पंजाब किंग्स– श्रेयस अय्यर (कर्णधार), प्रियांश आर्य, प्रभसिमरन सिंग, मिशेल ओवेन, विष्णू विनोद, नेहल वढेरा, अझमतुल्ला उमरझाई, मार्को यान्सन, मुशीर खान, शशांक सिंग, मार्कस स्टॉइनिस, सूर्यांश शेडगे, अर्शदीप सिंग, जेवियर बार्टलेट युझवेंद्र चहल, हरप्रीत ब्रार, प्रवीण दुबे, विजयकुमार वैशाख, कूपर कोनोली, बेन द्वारशुईस, पायला अविनाश, यश ठाकूर, हरनूर सिंग, प्रवीण दुबे, विशाल निषाद.
रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु– रजत पाटीदार (कर्णधार), टीम डेव्हिड, विराट कोहली, देवदत्त पडिक्कल, फिलिप सॉल्ट, जितेश शर्मा, जेकब बेथेल, कृणाल पंड्या, रोमॅरियो शेफर्ड, अभिनंदन सिंह, जोश हेझलवूड, रसिक सलाम दार, भुवनेश्वर कुमार, सुयश सिंह, वेंकटेश कुमार, सुयश सिंह, स्वप्निल सिंह, जेकब डफी, मंगेश यादव, जॉर्डन कॉक्स, विकी ओस्तवाल, विहान मल्होत्रा, कनिष्क चौहान, सात्विक देसवाल.






