
चेन्नई सुपर किंग्ज विरुद्ध सनरायझर्स हैदराबाद आमनेसामने
ऋतुराज गायकवाडचा प्रथम गोलंदाजीचा निर्णय
एसआरएचने सीएसकेला दिले 195 रन्सचे टार्गेट
Tata IPL 2026 Live CSK Vs SRH Updates: सध्या राजीव गांधी आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियमवर एसआरएच विरुद्ध चेन्नई सुपर किंग्जमध्ये सामना सुरू आहे. चेन्नईचा कर्णधार ऋतुराज गायकवाडने टॉस जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. दरम्यान एसआरएचच्या सलामीच्या जोडीने शानदार सुरुवात केली. हेनरी क्लासेनने शानदार खेळी केली. (IPL 2026) एसआरएचने प्रथम फलंदाजी करत सीएसकेला 195 रन्सचे टार्गेट दिले आहे.
एसआरएचची फलंदाजी
एसआरएचकडून ट्रेविस हेड आणि अभिषेक शर्मा हे सलामीला खेळण्यासाठी मैदानात उतरले. हेड आणि अभिषेक शर्माने वादळी सुरुवात केली. ट्रेविस हेडने 20 चेंडूत 23 रन्स केल्या. 23 रन्स करून हेड आउट झाला. कर्णधार इशान किशन शून्यावर आउट केले. तर अभिषेक शर्माने वादळी अर्धशतक लगावले. अभिषेक शर्मा 59 रन्स करून आउट झाला. नंतर अनिकेत वर्मा केवळ 2 रन्स करून आउट झाला.
नितीश कुमार रेड्डी 8 चेंडूत 12 रन्स करून आउट झाला. हेनरी क्लासेनने 59 रन्सची शानदार खेळी केली. सलील अरोरा 13 रन्स करून आउट झाला. तर शिवांग कुमार 12 रन्स करून आउट झाला.
सीएसकेची गोलंदाजी
चेन्नई सुपर किंग्जच्या गोलंदाजांनी संघाला चांगली सुरुवात केली. पॉवर प्लेमध्ये शर्मा आणि हेडने गोलंदाजांना झोडपून काढले. मात्र जेमी ओव्हरटनने तुफानी खेळी करत असलेल्या अभिषेक शर्माला 59 रन्सवर आउट केले. तर मुकेश चौधरीने ट्रेविस हेड आणि कर्णधार इशान किशनची विकेट पटकावली. जेमी ओव्हरटनने नितीश कुमार रेड्डीची विकेट घेतली. अंशूल कंबोजने हेनरी क्लासेनची विकेट घेतली.
1⃣0⃣th #TATAIPL fifty when his team needed it 👌 Heinrich Klaasen makes it count again 🔝 Updates ▶️ https://t.co/uJG04r8iXD #KhelBindaas | #SRHvCSK | @SunRisers pic.twitter.com/Y2TfQcLhA5 — IndianPremierLeague (@IPL) April 18, 2026
पीच रिपोर्ट
आजचा चेन्नई विरुद्ध एसआरएचचा सामना राजीव गांधी आंतरराष्ट्रीय स्टेडियमवर होणार आहे. एसआरएचने यंदाच्या हंगामात होम ग्राऊंडवर दोन्ही सामने जिंकले आहेत. मागील सामन्यात प्रफुल हिंगे आणि साकीब हुसेनने भेदक गोलंदाजी केली. हे स्टेडियम हाय स्कोअरिंग साठी ओळखले जाते. या स्टेडियम कोणताही संघ टॉस जिंकून चेज करण्यास प्राधान्य देताना पाहायला मिळते.
सीएसकेची संभाव्य टीम: संजू सॅमसन (यष्टिरक्षक), ऋतुराज गायकवाड (कर्णधार), आयुष म्हात्रे, सरफराज खान, डेवाल्ड ब्रेविस, शिवम दुबे, जेमी ओव्हरटन, अंशुल कंबोज, नूर अहमद, गुरजपनीत सिंग, मुकेश चौधरी, महेश तीक्षणा, मॅट हेन्री.
CSK Vs SRH Live: ऋतुराज गायकवाडचा मोठा निर्णय; एसआरएच विरुद्ध टॉस जिंकत…
एसआरएचची संभाव्य टीम: अभिषेक शर्मा, ट्रॅव्हिस हेड, ईशान किशन , हेनरिक क्लासेन, लियाम लिविंगस्टोन, हर्ष दुबे, नीतिश कुमार रेड्डी, अनिकेत वर्मा, ईशान मलिंगा, साकिब हुसेन, प्रफुल हिंगे , शिवंग कुमार,हर्षल पटेल, सलील अरोरा.