Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • बुध, 9 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • Politics |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

IPL 2026: मुंबई पलटणमध्ये मोठे फेरबदल होणार; Rohit शर्मा खेळणार? पहा Playing 11

मुंबई इंडियन्सने सुरुवात चांगली केली. मात्र त्यानंतर सलग 4 सामने त्यांनी गमावले आहेत. जसप्रीत बुमराह, हार्दिक पंड्या, तिलक वर्माला अजूनही साजेशी कामगिरी करता आलेली नाही.

  • By तेजस भागवत
Updated On: Apr 20, 2026 | 04:05 PM
IPL 2026: मुंबई पलटणमध्ये मोठे फेरबदल होणार; Rohit शर्मा खेळणार? पहा Playing 11
Follow Us
Follow Us:

आजच्या सामन्यात रोहित शर्मा खेळण्याची शक्यता 
हार्दिक पंड्या संघात बदल करण्याचा अंदाज 
अहमदाबादमध्ये टॉस ठरणार निर्णायक

Tata IPL 2026 Live Updates GT vs MI: आज अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर गुजरात टायटन्स विरुद्ध मुंबई इंडियन्स यांच्यात महामुकाबला होणार आहे. संध्याकाळी 7.30 वाजता हा सामना सुरू होईल. दरम्यान मागच्या सामन्यात रोहित शर्मा खेळू शकला नव्हता. त्यामुळे आजच्या सामन्यात तो खेळणार की नाही याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. दरम्यान आज दोन्ही संघाची प्लेइंग 11 काय असणार हे जाणून घेऊयात.

मागील सामन्यात रोहित शर्मा आणि मिशेल सॅटनर दुखापतीमुळे खेळू शकले नव्हते. त्यामुळे आजच्या सामन्यात ते दिसणार का याची उत्सुकता सर्वांना लागली आहे. दरम्यान हे दोन्ही खेळाडू फिट असल्याचे समोर येत आहे, त्यामुळे कदाचित हे दोन्ही खेळाडू आज खेळताना पाहायला मिळतील.

गुजरात टायटन्सने आयपीएलची सुरुवात सलग दोन पराभवाने केली होती मात्र त्यानंतरचे सलग तीनही सामने गुजरातने जिंकले आहेत. तर दुसरीकडे मुंबई इंडियन्सने सुरुवात चांगली केली. मात्र त्यानंतर सलग 4 सामने त्यांनी गमावले आहेत. जसप्रीत बुमराह, हार्दिक पंड्या, तिलक वर्माला अजूनही साजेशी कामगिरी करता आलेली नाही. त्यामुळे मुंबईच्या अडचणी वाढल्या आहेत.

GT vs MI Pitch Report: मुंबई ‘पलटण’चा हरवलेला सूर सापडणार की…? अहमदाबादच्या पीचचा रिपोर्ट काय?

आजचा पीच रिपोर्ट काय?

अहमदाबाद येथील खेळपट्टी ही फलंदाजांसाठी नंदनवन समजले जाते. त्यामुळे आजच्या सामन्यात हाय स्कोअरिंग मुकाबला पाहायला मिळू शकतो. या पीचवर टॉस जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय योग्य ठरू शकतो. आतापर्यंत अहमदाबाद स्टेडियमवर आयपीएलचे 46 सामने खेळवले गेले आहेत. त्यामध्ये प्रथम फलंदाजी करताना या ठिकाणी 23 सामने जिंकले गेले आहेत. तर दुसऱ्या डावात फलंदाजी करताना देखील 23 सामने जिंकले गेले आहेत. मुंबई इंडियन्सच्या संघाने केकेआरविरुद्ध पहिला सामना जिंकून 12 वर्षांची परंपरा मोडली होती. मात्र त्यानंतर हार्दिक पंड्या आणि मुंबई पलटणला मिळालेला सूर हरवला असल्याचे दिसत आहे. बुमराह आणि हार्दिक पंड्यामध्ये मॅचदरम्यान बाचाबाची झाल्याचा एक व्हिडिओ समोर आला होता. मात्र त्यातली सत्यता नेमकी कळू शकलेली नाही.

IPL 2026: मॅचनंतर नेमके काय घडलं? ओक्साबोक्शी रडला Vaibhav Sooryavanshi, धावत आले सहखेळाडू

गुजरात टायटन्सची संभाव्य टीम: शुभमन गिल (कर्णधार), साई सुदर्शन, जोस बटलर (यष्टीरक्षक) , वॉशिंग्टन सुंदर, ग्लेन फिलिप्स्, शाहरुख खान, राहुल तेवतिया, राशिद खान, अशोक शर्मा, कागिसो रबाडा, मोहम्मद सिराज, प्रसिद्ध कृष्णा.

मुंबई इंडियन्सची संभाव्य टीम: रोहित शर्मा, क्विंटन डी कॉक (यष्टीरक्षक), सूर्यकुमार यादव, तिलक वर्मा, हार्दिक पंड्या (कर्णधार), शेरफेन रदरफोर्ड, नमन धीर, मिचेल सँटनर / ए. एम. गझनफर, शार्दुल ठाकूर, दीपक चहर, जसप्रीत बुमराह, मयंक मार्कंडे

Web Title: Tata ipl 2026 mi vs gt playing 11 rohit sharma hardik pandya sports news

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Apr 20, 2026 | 04:05 PM

Topics:  

  • IPL 2026
  • MI vs GT
  • Rohit Sharma

संबंधित बातम्या

Big Breaking: वर्ल्डकप 2027 मध्ये Rohit Sharma खेळणार की नाही? बीसीसीआय सेक्रेटरी म्हणाले…
1

Big Breaking: वर्ल्डकप 2027 मध्ये Rohit Sharma खेळणार की नाही? बीसीसीआय सेक्रेटरी म्हणाले…

BCCI Review Meeting: आज होणार मोठा निर्णय! रोहितचं भविष्य, आगरकरचा कार्यकाळ आणि वर्ल्ड कपचं प्लानिंग, 5 महत्त्वाच्या बाबी
2

BCCI Review Meeting: आज होणार मोठा निर्णय! रोहितचं भविष्य, आगरकरचा कार्यकाळ आणि वर्ल्ड कपचं प्लानिंग, 5 महत्त्वाच्या बाबी

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.