GT Vs MI Pitch Report (फोटो- सोशल मिडिया)
हार्दिक पंड्याचा संघ दुसऱ्या विजयाच्या शोधत
मुंबई इंडियन्स विरुद्ध गुजरात टायटन्स आमनेसामने
अहमदाबादमध्ये रंगणार महामुकाबला
Tata IPL 2026 MI vs GT Live Updates: आज आयपीएलच्या यंदाच्या हंगामातील सर्वात मोठा महामुकाबला होणार आहे. गुजरात टायटन्स विरुद्ध मुंबई इंडियन्स यांच्यात सामना होणार आहे. संध्याकाळी 7.30 वाजता हा सामना सुरू होईल. अहमदाबादच्या (IPL 2026) नरेंद्र मोदी स्टेडियमवर हा सामना खेळवला जाणार आहे. या सामन्याचा पीच रिपोर्ट जाणून घेऊयात.
मुंबई इंडियन्सचा संघ सध्या फॉर्ममध्ये नसल्याचे पाहायला मिळत आहे. मागील सामन्यात त्यांचा दारुण पराभव झाला आहे. दुखापतीमुळे रोहित शर्मा खेळू शकला नव्हता. मात्र त्यामुळे मुंबईला मोठा फटका बसल्याचे पाहायला मिळाले. मुंबई इंडियन्सने पहिला सामना केकेआर विरुद्ध जिंकला होता. मात्र त्यानंतर सलग 4 सामने मुंबईचा पराभव झाल्याचे पाहायला मिळाले.
सध्या मुंबई इंडियन्स पॉईंट्स टेबलमध्ये 10 व्या स्थानावर आहे. तर गुजरात टायटन्स 6 व्या स्थानावर आहे. गुजरात टायटन्सने आपले मागील तीनही सामने जिंकले आहेत. पहिले दोन सामने जिंकल्यावर गुजरातने विजयी घौडदौड सुरू केली आहे. मात्र मुंबई इंडियन्सला अजूनही सुर सापडलेला नाही. फलंदाज, गोलंदाज कोणीच साजेशी खेळी करताना दिसून येत नाहीये. त्यामुळे आज मुंबई इंडियन्स 5 सामना हरणार की दुसरा विजय मिळवणार हे पहावे लागणार आहे.
IPL 2026: मॅचनंतर नेमके काय घडलं? ओक्साबोक्शी रडला Vaibhav Sooryavanshi, धावत आले सहखेळाडू
आजचा पीच रिपोर्ट काय?
अहमदाबाद येथील खेळपट्टी ही फलंदाजांसाठी नंदनवन समजले जाते. त्यामुळे आजच्या सामन्यात हाय स्कोअरिंग मुकाबला पाहायला मिळू शकतो. या पीचवर टॉस जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय योग्य ठरू शकतो. आतापर्यंत अहमदाबाद स्टेडियमवर आयपीएलचे 46 सामने खेळवले गेले आहेत. त्यामध्ये प्रथम फलंदाजी करताना या ठिकाणी 23 सामने जिंकले गेले आहेत. तर दुसऱ्या डावात फलंदाजी करताना देखील 23 सामने जिंकले गेले आहेत.
Priyansh Arya ने लखनऊच्या गोलंदाजीची लावली वाट, IPL 2026 च्या 1 सामन्यात झाले 5 रेकॉर्ड्स
मुंबई इंडियन्सच्या संघाने केकेआरविरुद्ध पहिला सामना जिंकून 12 वर्षांची परंपरा मोडली होती. मात्र त्यानंतर हार्दिक पंड्या आणि मुंबई पलटणला मिळालेला सूर हरवला असल्याचे दिसत आहे. बुमराह आणि हार्दिक पंड्यामध्ये मॅचदरम्यान बाचाबाची झाल्याचा एक व्हिडिओ समोर आला होता. मात्र त्यातली सत्यता नेमकी कळू शकलेली नाही. दुसरीकडे कर्णधार शुभमन गिल जबरदस्त फॉर्ममध्ये आहेत. मागील सामन्यात शतकाच्या जवळ जाऊन तो आउट झाला होता. मात्र त्या डावात त्याने चांगली खेळी करून गुजरात टायटन्सला विजय प्राप्त करून दिला होता.






