
RR Vs GT Live: राजस्थानविरुद्ध गुजरातचे पारडे जड; मात्र यंदाच्या हंगामात टायटन्सचा...
आज राजस्थान रॉयल्स विरुद्ध गुजरात टायटन्स आमनेसामने
संध्याकाळी 7.30 वाजता सुरू होणार सामना
रियान पराग अन् शुभमन गिल भिडणार
Tata IPL 2026 RR Vs GT Live Updates: आज जयपूरच्या क्रिकेट स्टेडियमवर राजस्थान रॉयल्स विरुद्ध गुजरात टायटन्स यांच्यात सामना होणार आहे. दोन्ही संघ आज विजयासाठी भिडणार आहेत. (IPL 2026) पॉईंट्स टेबलमध्ये आपले स्थान मजबूत करण्यासाठी दोन्ही संघांना आजचा विजय महत्वाचा असणार आहे. दोन्ही संघांचा हेड टू हेड रेकॉर्ड जाणून घेऊयात.
गुजरात टायटन्सचा संघ सध्या पॉईंट्स टेबलमध्ये पाचव्या स्थानी आणि राजस्थान रॉयल्सचा संघ पॉईंट्स टेबलमध्ये चौथ्या स्थानावर आहे. त्यामुळे दोन्ही संघांसाठी आजचा सामना महत्वाचा असणार आहे. दरम्यान आज आपण या दोन्ही संघांची प्लेइंग 11 आणि हेड टू हेड रेकॉर्ड जाणून घेऊयात. मागील सामन्यात राजस्थान रॉयल्सने गुजरात वर विजय मिळवला होता. त्यामुळे आजच्या सामन्यात कोण जिंकणार हे पहावे लागणार आहे.
आतापर्यंत गुजरात टायटन्स आणि राजस्थान रॉयल्स 9 वेळेस आमनेसामने आले आहेत. या 9 समन्यांपैकी गुजरात टायटन्सने 6 सामने जिंकून आपले वर्चस्व सिद्ध केले आहे. तर राजस्थान रॉयल्सचा संघ केवळ 3 सामने जिंकू शकला आहे. यामुळे सध्या तरी गुजरातचे पारडे जड दिसण येत आहे. मात्र यंदाच्या हंगामात पहिल्या सामन्यात राजस्थान रॉयल्सने गुजरातचा पराभव केला आहे.
राजस्थान रॉयल्सचे नेतृत्व रियन पराग करत आहे. राजस्थान रॉयल्सच्या संघाची सुरुवात चांगली झाली होती. मात्र गेल्या काही सामन्यांमध्ये त्यांना पराभव स्वीकारावा लागला आहे. तसेच गुजरात टायटन्सची सुरुवात खराब झाली होती. मात्र गेले काही सामना गुजरातने सलग जिंकत पॉइंट टेबलमध्ये 5 वे स्थान पटकावले आहे.
गुजरात टायटन्स संघ : शुभमन गिल (कर्णधार), साई सुदर्शन, जोस बटलर (यष्टीरक्षक), निशांत सिंधू, वॉशिंग्टन सुंदर, जेसन होल्डर, अर्शद खान, रशीद खान, कागिसो रबाडा, मोहम्मद सिराज, मानव सुथार, राहुल तेवाटिया, ग्लेन फिलिप्स, अनुल्ले कुमार, कुमार कुमार, अरशद खान. कुशाग्रा, इशांत शर्मा, शाहरुख खान, जयंत यादव, ल्यूक वुड, प्रसिध कृष्णा, गुरनूर ब्रार, अशोक शर्मा, कॉनर एस्टरहुइझेन, रविश्रीनिवासन साई किशोर.
राजस्थान रॉयल्स संघ : यशस्वी जैस्वाल, वैभव सूर्यवंशी, ध्रुव जुरेल (यष्टीरक्षक), रियान पराग (कर्णधार), रवींद्र जडेजा, डोनोवन फरेरा, शुभम दुबे, जोफ्रा आर्चर, रवी बिश्नोई, नांद्रे बर्गर, ब्रिजेश शर्मा, ॲडम मिलने, दासुन शनाका, रवी सिंग, यशराज पुंजा, तुषार देशपांडे संदीप शर्मा, शिमरॉन हेटमायर, कुलदीप सेन, सुशांत मिश्रा, युधवीर सिंग चरक, क्वेना मफाका, लुआन-ड्रे प्रिटोरियस, विघ्नेश पुथूर, अमनो रामा.