
RCB Vs DC Live: रजत पाटीदारने जिंकला टॉस; प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय
थोड्याच वेळात दिल्ली अन् आरसीबी येणार आमनेसामने
रजत पाटीदार विरुद्ध अक्षर पटेल रंगणार महायुद्ध
आयपीएलचा उत्सव सुरू होऊन झाला एक महिना
Tata IPL 2026 RCB Vs DC Live Updates: थोड्याच वेळात अरुण जेटली क्रिकेट स्टेडियमवर दिल्ली कॅपिटल्स विरुद्ध रॉयल चॅलेंजर्स बंगलोर यांच्यात सामना सुरू होणार आहे. नुकताच टॉस झाला. आरसीबीने टॉस जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. आजचा सामना दिल्ली कॅपिटल्ससाठी अत्यंत महत्वाचा असेल. मागील सामन्यात (RCB Vs DC) 264 रन्स करून देखील पराभव स्वीकारावा लागल्याने दिल्लीचा आत्मविश्वास थोडासा डळमळीत झाला असल्याची शक्यता आहे.
पॉईंट्स टेबलध्ये 2 पॉईंट्स घेत आघाडी घेण्यासाठी आज दोन्ही संघ प्रयत्नशील असतील. सध्या आरसीबी पॉईंट्स टेबलमध्ये दुसऱ्या स्थानी तर दिल्ली कॅपिटल्स सातव्या स्थानी आहे. त्यामुळे दिल्ली कॅपिटल्ससाठी आजचा सामना जिंकणे अत्यंत महत्वाचे असणार आहे. आजचा सामना दिल्ली जिंकल्यास त्यांचा प्ले ऑफसाठी संघर्ष सुरू राहण्याची शक्यता आहे.
DC Vs RCB Pitch Report: 264 कमी पडणार की…; दिल्ली विरुद्ध आरसीबी, आजचा पीच रिपोर्ट काय?
काय आहे आजचा पीच रिपोर्ट?
दिल्लीच्या अरुण जेटली क्रिकेट स्टेडियमची खेळपट्टी फलंदाजीसाठी स्वर्ग समजले जाते. त्यामुळे या ठिकाणी मोठी धावसंख्या पाहायला मिळू शकते. या खेळपट्टीवर फलंदाजांचे वर्चस्व असल्याचे दिसून आले. सीमारेषा लहान असल्याने फलंदाजांना येथे थोडी अधिक मदत मिळते. मागच्या सामन्यात या स्टेडियमवर 400 पेक्षा जास्त रन्स झाल्याचे आपण पाहिलेच होते
‘करामती’ Rashid Khan चा धमाका! Suresh Raina चा ‘हा’ रेकॉर्ड उद्ध्वस्त, आयपीएलमध्ये रचला नवा इतिहास
रात्रीच्या वेळी मैदानात दव पडण्याची शक्यता अधिक आहे. यामुळे दुसऱ्या डावात गोलंदाजी करणे कठीण होऊ शकते, परिणामी नाणेफेक जिंकणारा संघ प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेण्याची दाट शक्यता आहे. वेगवान गोलंदाजांना सुरुवातीच्या काही षटकांत थोडी मदत मिळू शकते. सामना पुढे जाईल तसा खेळपट्टी फलंदाजीसाठी पूरक ठरू शकते. मध्य ओव्हर्समध्ये स्पिनर्स कमाल दाखवू शकतात.
दिल्ली कॅपिटल्सची संभाव्य टीम: केएल राहुल, पॅथुम निसांका, नितीश राणा, ट्रिस्टन स्टब्स, डेव्हिड मिलर, अक्षर पटेल (कर्णधार), समीर रिझवी, कुलदीप यादव, मुकेश कुमार, लुंगी एन्गिडी, टी. नटराजन, विप्रज निगम, करुण नायर.
आरसीबीची संभाव्य टीम: विराट कोहली, देवदत्त पडिक्कल, रजत पाटीदार (कर्णधार),जितेश शर्मा, टिम डेव्हिड, कृणाल पांड्या, रोमारिओ शेफर्ड, भुवनेश्वर कुमार, जोश हेझलवूड, सुयश शर्मा, रसीख सलाम, यश दयाल.