DC Vs RCB Pitch Report (फोटो - सोशल मिडिया)
अरुण जेटली क्रिकेट स्टेडियमवर रंगणार सामना
दिल्ली कॅपिटल्स विरुद्ध रॉयल चॅलेंजर्स बंगलोर आमनेसामने
दिल्लीचा संघ विजयाच्या शोधात
Tata IPL 2026 DC Vs RCB Live Updates: आज दिल्लीच्या अरुण जेटली क्रिकेट स्टेडियमवर संध्याकाळी 7.30 वाजता दिल्ली कॅपिटल्स विरुद्ध रॉयल चॅलेंजर्स बंगलोर यांच्यात सामना होणार आहे. दिल्ली कॅपिटल्ससाठी आजचा सामना हा अत्यंत महत्वाचा असणार आहे. पॉईंट्स टेबलमध्ये आघाडी घेण्यासाठी दिल्लीला आजचा सामना जिंकावाच लागेल. तर (IPL 2026) आजच्या सामन्याच्या पीच रिपोर्ट बाबत जाणून घेऊयात.
काय आहे आजचा पीच रिपोर्ट?
दिल्लीच्या अरुण जेटली क्रिकेट स्टेडियमची खेळपट्टी फलंदाजीसाठी स्वर्ग समजले जाते. त्यामुळे या ठिकाणी मोठी धावसंख्या पाहायला मिळू शकते. या खेळपट्टीवर फलंदाजांचे वर्चस्व असल्याचे दिसून आले. सीमारेषा लहान असल्याने फलंदाजांना येथे थोडी अधिक मदत मिळते. मागच्या सामन्यात या स्टेडियमवर 400 पेक्षा जास्त रन्स झाल्याचे आपण पाहिलेच होते.
रात्रीच्या वेळी मैदानात दव पडण्याची शक्यता अधिक आहे. यामुळे दुसऱ्या डावात गोलंदाजी करणे कठीण होऊ शकते, परिणामी नाणेफेक जिंकणारा संघ प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेण्याची दाट शक्यता आहे. वेगवान गोलंदाजांना सुरुवातीच्या काही षटकांत थोडी मदत मिळू शकते. सामना पुढे जाईल तसा खेळपट्टी फलंदाजीसाठी पूरक ठरू शकते. मध्य ओव्हर्समध्ये स्पिनर्स कमाल दाखवू शकतात.
आरसीबीचा संघ जबरदस्त फॉर्ममध्ये आहे. विराट कोहलीचा फॉर्म चांगला आहे. कर्णधार रजत पाटीदार देखील चांगली खेळी करत आहे. तसेच गोलंदाजीत भुवनेश्वर कुमार देखील भेदक आणि अचूक गोलंदाजी करत आहे. दिल्ली कॅपिटल्ससाठी केएल राहुल, ट्रिस्टन स्टब्स हे प्रमुख खेळाडू असणार आहे. तर गोलंदाजीत कुलदीप यादव, विप्रज निगम यांच्यावर मदार असणार आहे. लुंगी एनगिडी गेल्या सामन्यात दुखापतग्रस्त झाला आहे. त्यामुळे आजच्या सामन्यात तो खेळू शकणार की नाही याकडे सर्वांचे लक्ष आहे.
दिल्ली कॅपिटल्सची संभाव्य टीम: केएल राहुल, पॅथुम निसांका, नितीश राणा, ट्रिस्टन स्टब्स, डेव्हिड मिलर, अक्षर पटेल (कर्णधार), समीर रिझवी, कुलदीप यादव, मुकेश कुमार, लुंगी एन्गिडी, टी. नटराजन, विप्रज निगम, करुण नायर.
आरसीबीची संभाव्य टीम: विराट कोहली, देवदत्त पडिक्कल, रजत पाटीदार (कर्णधार),जितेश शर्मा, टिम डेव्हिड, कृणाल पांड्या, रोमारिओ शेफर्ड, भुवनेश्वर कुमार, जोश हेझलवूड, सुयश शर्मा, रसीख सलाम, यश दयाल,






