RCB vs LSG Toss Live Update (फोटो -सोशल मिडिया)
रजत पाटीदार अन् ऋषभ पंत येणार आमनेसामने
आरसीबी विरुद्ध एलएजजीमध्ये सामना
एलएसजी प्रथम करणार फलंदाजी
Tata IPL 2026 RCB vs LSG Live Toss Updates: थोड्याच वेळात एम. चिन्नास्वामी स्टेडियमवर आरसीबी विरुद्ध एलएसजी यांच्यात सामना सुरू होणार आहे. दोन्ही संघांसाठी हा सामना महत्वाचा समजला जात आहे. एलएसजी (IPL) सध्या पॉईंट्स टेबलमध्ये 7 व्या स्थानी आहे. आजचा सामना एलएसजी जिंकल्यास टॉप 4 मध्ये येणार आहे. तर आरसीबीच्या होम ग्राऊंडवर हा सामना होत आहे. दरम्यान आरसीबीने टॉस जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे.
आज बंगळुरूच्या एम. चिन्नास्वामी स्टेडियमवर आरसीबी आणि एलएसजी आमनेसामने येणार आहेत. एलएसजीचे नेतृत्व ऋषभ पंत करत आहे. तर आरसीबीचे नेतृत्व रजत पाटीदार करत आहे. दोन्ही युवा कर्णधार आज आपल्या संघाला विजय मिळवून देण्यासाठी खेळताना दिसून येणार आहेत.
सध्या लखनौचा संघ पॉईंट्स टेबलमध्ये 7 व्या स्थानावर आहे. आरसीबीविरुद्ध लखनौचा संघ जिंकल्यास टॉप 4 मध्ये पोचण्याची संधी मिळणार आहे. आतापर्यंत 4 सामन्यात लखनौने 2 सामने जिंकले आहेत. तर 2 सामन्यात पराभव झाला आहे. आरसीबीने आतापर्यंत 4 पैकी 3 सामने जिंकले आहेत.
Virat Kohli च्या दुखापतीवर मोठी अपडेट! LSG विरुद्ध खेळणार की नाही? चाहत्यांच्या नजरा प्लेइंग 11 कडे
RCB Vs LSG चा Pitch Report
एम. ए. चिन्नास्वामी स्टेडियमवर आयपीएलचे आतापर्यंत 102 सामने खेळवले गेले आहेत. यामध्ये 100 पेक्षा जास्त सामन्यांमध्ये पहिल्यांदा फलंदाजी करताना 44 सामने जिंकले गेले आहेत. तर 54 सामने धावांचा पाठलाग करताना जिंकले गेले आहेत. काही सामने पावसामुळे रद्द झाले आहेत. आज बंगळुरूमध्ये उकाडा थोडा जास्त राहू शकतो. मात्र पावसाची शक्यता दिसून येत नाहीये.
हे ग्राऊंड हाय स्कोअरिंगसाठी ओळखले जाते. त्यामुळे या ठिकाणी टॉस फार महत्वाचा समजला जात नाही. दोन्ही डावात सामने जिंकले गेले आहेत. त्यामुळे आजच्या सामन्यात टॉस गेमचेंजर ठरेल असे म्हणता येणार नाही. या स्टेडियमची सीमारेषा थोडी लहान आहे. त्यामुळे या ठिकाणी मोठ्या धावसंख्या झाल्याचे पाहायला मिळते. आजच्या सामन्यात विराट कोहली, ऋषभ पंत, भुवनेश्वर कुमार, मोहम्मद शामीच्या खेळीकडे सर्वांचे लक्ष असणार आहे.
आज काहीतरी नवीन घडणार! ‘या’ ठिकाणी रन्सचा पाऊस की…; पहा RCB Vs LSG चा Pitch Report
आरसीबीची संभाव्य टीम: विराट कोहली, फिल सॉल्ट, देवदत्त पडिक्कल, रजत पाटीदार, टिम डेव्हिड, जितेश शर्मा, रोमारियो शेफर्ड, कृणाल पांड्या, भुवनेश्वर कुमार, जेकब डफी / जोश हेझलवूड, सुयश शर्मा, रासीख सलाम
एलएसजीची संभाव्य टीम: एडन मार्करम, मिचेल मार्श, ऋषभ पंत , आयुष बदोनी, निकोलस पूरन, अब्दुल समद, मुकुल चौधरी, जॉर्ज लिंडे / एनरिक नॉर्खिया, मोहम्मद शमी, दिग्वेज सिंह राठी, प्रिन्स यादव / मयंक यादव,






