
थोड्याच वेळात लखनौ अन् आरसीबीचा सामना
एकाना क्रिकेट स्टेडियमवर रंगणार सामना
आरसीबीसाठी असणार अत्यंत महत्वाचा सामना
Tata IPL 2026 RCB Vs LSG Live Updates: थोड्याच वेळात भारतरत्न अटल बिहार वाजपेयी क्रिकेट स्टेडियमवर लखनौ सुपर जायंट्स विरुद्ध रॉयल चॅलेंजर्स बंगलोर यांच्यात सामना होणार आहे. आतापर्यंतच्या रेकॉर्डमध्ये आरसीबीचे पारडे जड दिसून येत आहे. सध्या आरसीबी पॉईंट्स टेबलमध्ये तिसऱ्या तर लखनौचा संघ शेवटच्या स्थानावर आहे. त्यामुळे आजचा सामना जिंकणे दोन्ही संघांसाठी आवश्यक ठरणार आहे. आरसीबीने टॉस जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे.
हेड टू हेड रेकॉर्ड काय?
आयपीएलच्या इतिहासात आतापर्यंत हे दोन्ही संघ एकमेकांविरुद्ध 7 वेळा आमनेसामने आले आहेत. यामध्ये आरसीबीचे पारडे जड समजले जाते. 7 पैकी 5 सामने आरसीबीने जिंकले आहेत. तर लखनौचा संघ केवळ 2 सामने जिंकू शकला आहे. यंदाच्या आयपीएलमध्ये पहिल्या सामन्यात आरसीबीने लखनौवर विजय मिळवला आहे. त्यामुळे आजच्या सामन्यात देखील आरसीबीचे पारडे जड दिसून येत आहे.
RCB Vs LSG Pitch Report: विराट कोहली विरुद्ध शामी? टॉस जिंकून थेट…; पहा आजचा पीच रिपोर्ट
आता यंदाच्या हंगामात लखनौ आणि आरसीबीच्या कामगिरीचा विचार केल्यास, आरसीबीने 9 पैकी 6 सामने जिंकले आहेत. आरसीबी सध्या पॉईंट्स टेबलमध्ये दुसऱ्या स्थानावर आहे. तर लखनौचा संघ 9 पैकी केवळ 2 च सामने जिंकला आहे. त्यामुळे पॉईंट्स टेबलमध्ये लखनौचा संघ शेवटच्या स्थानावर आहे.
लखनौच्या भारतरत्न श्री अटल बिहारी वाजपेयी एकाना क्रिकेट स्टेडियमवर लखनौ सुपर जायंट्स आणि रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरू यांच्यात आयपीएलचा 50 वा सामना होणार आहे. दरम्यान आज सामना होणाऱ्या खेळपट्टीचा पीच रिपोर्ट पाहुयात.आजचा सामना भारतरत्न श्री अटल बिहारी वाजपेयी एकाना क्रिकेट स्टेडियमवर होणार आहे. ही खेळपट्टी फलंदाजांसाठी नंदनवन समजली जाते. येथील पीच काळ्या मातीपासून तयार करण्यात आलेले आहे. त्यामुळे कधी बॉल वेगाने तर कधी थांबून बॅटवर येतो.
LSG Vs RCB Head To Head: विराटची बॅट की लखनौची फिरकी? हेड-टू-हेड रेकॉर्डमध्ये कोण आहे सरस?
आरसीबीची संभाव्य टीम: विराट कोहली, फिल सॉल्ट, देवदत्त पडिक्कल, रजत पाटीदार, टिम डेव्हिड, जितेश शर्मा, रोमारियो शेफर्ड, कृणाल पांड्या, भुवनेश्वर कुमार, जेकब डफी / जोश हेझलवूड, सुयश शर्मा, रासीख सलाम
एलएसजीची संभाव्य टीम: एडन मार्करम, मिचेल मार्श, ऋषभ पंत , आयुष बदोनी, निकोलस पूरन, अब्दुल समद, मुकुल चौधरी, जॉर्ज लिंडे / एनरिक नॉर्खिया, मोहम्मद शमी, दिग्वेज सिंह राठी, प्रिन्स यादव / मयंक यादव,