RCB Vs LSG Pitch Report (फोटो- सोशल मिडिया)
लखनौ सुपर जायंट्स विरुद्ध आरसीबी आमनेसामने
लखनौचा पॉईंट्स टेबलमध्ये शेवटच्या स्थानावर
एकाना स्टेडियमवर रंगणार चुरशीचा सामना
Tata IPL 2026 LSG Vs RCB Live Updates: आज लखनौच्या भारतरत्न अटल बिहारी वाजपेयी क्रिकेट स्टेडियमवर लखनौ सुपर जायंट्स विरुद्ध आरसीबी असा सामना होणार आहे. लखनौचा संघ पॉईंट्स टेबलमध्ये शेवटच्या स्थानावर आहे. तर आरसीबीचा संघ तिसऱ्या स्थानावर आहे. टॉप 4 मध्ये आपले स्थान मजबूत करण्यासाठी आरसीबीचा आणि आपले उरलेले काही सामने जिंकून स्पर्धेचा शेवट चांगला करण्याचा प्रयत्न लखनौच्या संघाचा असणार आहे. ऋषभ पंतला यंदाच्या हंगामात लखनौच्या संघाला साजेशी कामगिरी करता आली नसल्याचे पाहायला मिळाले.
लखनौच्या भारतरत्न श्री अटल बिहारी वाजपेयी एकाना क्रिकेट स्टेडियमवर लखनौ सुपर जायंट्स आणि रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरू यांच्यात आयपीएलचा 50 वा सामना होणार आहे. दरम्यान आज सामना होणाऱ्या खेळपट्टीचा पीच रिपोर्ट पाहुयात.आजचा सामना भारतरत्न श्री अटल बिहारी वाजपेयी एकाना क्रिकेट स्टेडियमवर होणार आहे. ही खेळपट्टी फलंदाजांसाठी नंदनवन समजली जाते. येथील पीच काळ्या मातीपासून तयार करण्यात आलेले आहे. त्यामुळे कधी बॉल वेगाने तर कधी थांबून बॅटवर येतो.
ऋषभ पंत अडचणीत? LSG चे कर्णधारपद हातातून जाणार? सततच्या अपयशामुळे नेतृत्वावर प्रश्नचिन्ह
या हंगामात या स्टेडियमवरील सर्वाधिक धावसंख्या 155 ते 160 च्या आसपास आहे. मुळे आजचा सामना हाय-स्कोअरिंग असण्याची शक्यता कमी असून तो अटीतटीचा ठरू शकतो. सामना सुरू झाला की मधल्या काही ओव्हर्समध्ये स्पिनर्सला मदत मिळू शकते. टार्गेटचा पाठलाग करणाऱ्या संघाला या ठिकाणी फायदा मिळाला आहे. त्यामुळे कोणताही संघ टॉस जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेऊ शकतो.
सध्या आरसीबीकडून विराट कोहली, देवदत्त पाडीकल, रजत पाटीदार, भुवनेश्वर कुमार तर लखनौकडून मोहम्मद शमी, मिशेल मार्श, कर्णधार ऋषभ पंत, आवेश खान यांच्या कामगिरीकडे सर्वांचे लक्ष असणार आहे. विराट कोहली सध्या जबरदस्त फॉर्ममध्ये खेळत आहे. तर लखनौचा कर्णधार ऋषभ पंतला साजेशी खेळी यंदाच्या हंगामात करता आलेली नाहीये.
MI Vs LSG Live: मिशेल अन् पूरनने काढली हवा; लखनौने पलटणला दिले 229 रन्सचे टार्गेट
मागील सामन्यात आरसीबीने लखनौवर मात केली होती, त्यामुळे त्यांचा आत्मविश्वास वाढलेला असेल. मात्र, लखनौच्या संथ खेळपट्टीवर आरसीबीच्या आक्रमक फलंदाजांना आपली रणनीती बदलावी लागणार आहे.लखनौमध्ये आज आकाश निरभ्र राहण्याची शक्यता आहे. पावसाची शक्यता नसल्याने रोमांचक सामना पाहायला मिळू शकतो.






