
एसआरएचचा प्रथम गोलंदाजीचा निर्णय
अहमदाबादच्या स्टेडियमवर सुरू आहे सामना
वॉशिंग्टन सुंदरने केली अर्धशतकी खेळी
Tata IPL 2026 GT Vs SRH Live Updates: अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर गुजरात टायटन्स आणि सनरायझर्स हैदराबाद आमनेसामने आले आहेत. दरम्यान एसआरएचचा कर्णधार पॅट कमिन्सने टॉस जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा (IPL 2026) निर्णय घेतला. गुजरातकडून चांगली खेळी केली. दरम्यान या सामन्यात गुजरात टायटन्सने एसआरएचला 169 रन्सचे टार्गेट दिले आहे.
गुजरात टायटन्सची फलंदाजी
गुजरात टायटन्सकडून सलामीला खेळण्यासाठी कर्णधार शुभमन गिल आणि साई सुदर्शन मैदानात आले. सध्या शुभमन आणि साई सुदर्शन हे आयपीएलमध्ये जबरदस्त फॉर्ममध्ये खेळत आहेत. मात्र गेल्या सामन्याप्रमाणे या दोघांना चांगली सुरुवात करून देता आली नाही. कानरधार शुभमन गिल केवळ 5 रन्स करून आउट झाला. त्यानंतर खेळण्यासाठी जोस बटलर आला. मात्र तो देखील सजहसी खेळी करू शकला नाही. तो 7 रन्स करून आउट झाला. गुजरातच्या फलांदाजांना आपल्या होम ग्राऊंडचा फारसा फायदा उठवता आला नाही. निशांत सिंधू केवळ 22 रन्स करून आउट झाला. साई सुदर्शनने शानदार अर्धशतकी खेळी केली. 61 रन्स करून तो आउट झाला. शेवटच्या काही ओव्हर्समध्ये वॉशिंग्टन सुंदरने अर्धशतकी खेळी केली. त्यामुळे गुजरातने एक सन्मानजनक स्कोअर उभा केला आहे.
GT Vs SRH Live: अहमदाबादच्या स्टेडियमवर वादळ येणार; पॅट कमिन्सने टॉस जिंकून घेतला ‘हा’ निर्णय
Need an early breakthrough? 😉 Call Praful Hinge 📞😎 Updates ▶️ https://t.co/o2tKKCeEaH#TATAIPL | #KhelBindaas | #GTvSRH | @SunRisers pic.twitter.com/Fwbqpsm4El — IndianPremierLeague (@IPL) May 12, 2026
एसआरएचची गोलंदाजी
एसआरएचने प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. त्यांचा तो निर्णय सुरुवातीच्या ओव्हर्समध्ये योग्य ठरला आहे. प्रफुल हिंगेने जबरदस्त फॉर्ममध्ये असलेल्या कर्णधार शुभमन गिलची विकेट पटकावली. प्रफुल हिंगेने जोस बटलरला देखील आउट केले. कर्णधार पॅट कमिन्सने निशांत सिंधुची विकेट पटकावली. सकीब हुसेनने सुदर्शनला आउट केले.
गुजरात टायटन्स संभाव्य प्लेइंग 11: साई सुदर्शन, शुभमन गिल, जोस बटलर, वाशिंग्टन सुंदर, जेसन होल्डर, निशांत सिंधू , राहुल तेवातिया, राशीद खान, अर्शद खान, कागिसो रबाडा, मोहम्मद सिराज, मानव सुतार.
खेळ आकड्यांचा! गुजरातसह ‘हे’ संघ IPL 2026 Playoff मध्ये जाणार? मात्र दिल्लीचा संघ…
सनरायझर्स हैदराबाद संभाव्य प्लेइंग 11: ट्रॅव्हिस हेड, अभिषेक शर्मा, इशान किशन, हेनरिक क्लासेन, नितीश कुमार रेड्डी, सलील अरोरा, अनिकेत वर्मा, पॅट कमिन्स, शिवांग कुमार, ईशान मलिंगा, साकिब हुसेन, हर्ष दुबे.