
CSK सेनेला RR च्या सूर्यवंशीने दाखवले 'वैभव'; अनुभवी गोलंदाजांची अक्षरक्ष: पिसं काढली अन् थेट..
यशस्वी जयस्वाल आणि वैभव सूर्यवंशी जोडीने फोडला घाम
Tata IPL CSK vs RR 2026 Live: चेन्नई सुपर किंग्जने राजस्थान रॉयल्सला 128 धावांचे लक्ष्य दिले आहे. दरम्यान राजस्थानकडून युवा फलंदाज यशस्वी जयस्वाल आणि वैभव सूर्यवंशी खेळण्यासाठी मैदानात उतरले होते. वैभव सूर्यवंशी आणि यशस्वी जयस्वालने राजस्थान रॉयल्सचा चांगली सुरुवात करून दिली. वैभव सूर्यवंशीने वादळी खेळी करत अर्धशतक पूर्ण केले. 52 धावा करून वैभव सूर्यवंशी बाद झाला.
चेन्नई सुपर किंग्सकडून प्रथम संजू सॅमसन आणि कर्णधार ऋतुराज गायकवाड खेळण्यासाठी उतरले. संजू सॅमसन केवळ 6 धावा करून बाद झाला. तर कर्णधार ऋतुराज गायकवाड देखील 6 धावा करून बाद झाला. तसेच युवा फलंदाज आयुष म्हात्रे पहिल्याच चेंडूवर बाद झाला. तर मॅथ्यू शॉर्ट केवळ 2 धावा करून बाद झाला.
बॅटिंग की थट्टा? RR च्या ‘रॉयल’ माऱ्यासमोर CSK ची दांडी गुल; राजस्थानला जिंकण्यासाठी 128 धावांची गरज
तर सरफराज खानने 12 चेंडूत 17 धावा कडून संघाचा डाव सावरण्याचा प्रयत्न केला. मात्र तो देखील 17 धावा करून बाद झाला. कार्तिक शर्माने 18 धावा केल्या. शिवम दुबेने आल्या आल्या पहिल्याच चेंडूवर षटकार मारला. मात्र चौथ्याच चेंडूवर षटकार मारण्याच्या प्रयत्नांत बाद झाला. मॅट हेनरी केवळ 5 धावा करून बाद झाला. राजस्थानच्या गोलंदाजांनी चांगली गोलंदाजी करून चेन्नईच्या फलंदाजीला अंकुश लावला. गोलंदाज बर्गरने 3, रवींद्र जाडेजाने दोन विकेट घेतल्या. संदीप शर्माने 1 विकेट घेतली. तसेच जोफरा आर्चरने एक विकेट घेतली.
चेन्नई सुपर किंग्स: ऋतुराज गायकवाड (कर्णधार), संजू सॅमसन (यष्टीरक्षक), आयुष म्हात्रे, मॅथ्यू शॉर्ट, शिवम दुबे, प्रशांत वीरजेमी ओव्हरटन, नूर अहमद, खलील अहमद, मॅट हेन्री, अंशुल कंबोज, राहुल चहर, श्रेयस गोपाल, सरफराज खान, मुकेश चौधरी, नॅथन एलिस, अकील हुसैन, झॅक फॉल्क्स, कार्तिक शर्मा, अमन खान, उर्विल पटेल, देवाल्ड ब्रेव्हिस (दुखापतग्रस्त), एमएस धोनी (दुखापतग्रस्त).
CSK चा मोठा ‘गेम’! ‘यलो आर्मी’ला मोठा धक्का; संजू अन् ऋतुराजचा RR विरुद्ध फ्लॉप शो
राजस्थान रॉयल्स: यशस्वी जैस्वाल, वैभव सूर्यवंशी, रियान पराग (कर्णधार), शिमरॉन हेटमायर, ध्रुव जुरेल (यष्टीरक्षक), रवींद्र जडेजा, दासुन शनाका, जोफ्रा आर्चर, संदीप शर्मा, रवी बिश्नोई, ॲडम मिल्ने, शुभम दुबे, डोनोव्हन फरेरा, लुआन-ड्रे प्रिटोरियस, रवी सिंग, युधवीर सिंग चरक, नांद्रे बर्गर, अमन राव पेराला