CSK vs RR Live Streaming (फोटो- ai gemini)
राजस्थान रॉयल्सचा प्रथम गोलंदाजीचा निर्णय
चेन्नई सुपर किंग्सने गमावल्या 3 विकेट्स
ऋतुराज, संजू सॅमसन झाले स्वस्तात बाद
Tata IPL 2026 CSK vs RR Live: आज आसामच्या गुवाहाटी येथे चेन्नई सुपर किंग्स विरुद्ध राजस्थान रॉयल्स (CSK vs RR) यांच्यात सामना सुरू आहे. 7 वाजता टॉस झाला. राजस्थान रॉयल्सचा कर्णधार रियान परागने (IPL 2026) टॉस जिंकत प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. चेन्नईच्या संघाला प्रथम फलंदाजी करण्यासाठी निमंत्रित केले. मात्र पॉवर प्लेमध्ये चेन्नईचा डाव गडबडला असल्याचे दिसून येत आहे.
चेन्नई सुपर किंग्सकडून प्रथम संजू सॅमसन आणि कर्णधार ऋतुराज गायकवाड खेळण्यासाठी उतरले. संजू सॅमसन केवळ 6 धावा करून बाद झाला. तर कर्णधार ऋतुराज गायकवाड देखील 6 धावा करून बाद झाला. तसेच युवा फलंदाज आयुष म्हात्रे पहिल्याच चेंडूवर बाद झाला. तर मॅथ्यू शॉर्ट केवळ 2 धावा करून बाद झाला.
राजस्थान रॉयल्सच्या गोलंदाजांनी पहिल्या ओव्हरपासूनच चेन्नईच्या फलंदाजांवर नियंत्रण ठेवले. त्यामुळे सध्या चेन्नई सुपर किंग्सची अवस्था 59 धावा आणि 6 बाद अशी झाली आहे.
CSK vs RR Live: गुवाहाटीत नाणेफेकीचा कौल राजस्थानच्या बाजूने! CSK ला रोखण्यासाठी घेतला ‘हा’ निर्णय
चेन्नई संघ एमएस धोनीशिवाय उतरली मैदानात
इंडियन प्रीमियर लीग 2026 च्या तिसऱ्या सामन्यात चेन्नई सुपर किंग्सचा सामना राजस्थान रॉयल्सशी सुरू आहे आणि सर्वांचे लक्ष 15 वर्षीय सलामीवीर वैभव सूर्यवंशीवर लागले आहे. वैभवने अलीकडे उत्कृष्ट कामगिरी केली आहे आणि या वेळी आयपीएलमध्ये तो कशी कामगिरी करतो हे पाहणे उत्सुकतेचे ठरेल, कारण प्रत्येक संघ त्याच्याविरुद्ध पूर्ण तयारीने मैदानात उतरला आहे.
वैभव-संजू चर्चेत राहतील
वैभवनंतर, आता संजू सॅमसनची कामगिरी पाहण्यासाठी सर्वजण उत्सुक असतील, जो आयपीएलमध्ये पहिल्यांदाच चेन्नई सुपर किंग्सकडून खेळणार आहे. एमएस धोनी सीएसकेकडून खेळणार नसल्यामुळे, संजू दुहेरी भूमिकेत असेल, तो यष्टीरक्षणासोबतच डावाची सुरुवातही करेल. धोनी दोन आठवड्यांसाठी सीएसकेपासून दूर राहणार आहे, जी संघासाठी एक मोठी समस्या असेल, कारण त्याचा अनुभव संघासाठी महत्त्वपूर्ण आहे.
CSK Vs RR: सावधान! राजस्थानचे ‘हे’ ५ शिलेदार CSK साठी डोकेदुखी; वैभव सूर्यवंशी करणार गेम
चेन्नई सुपर किंग्स: ऋतुराज गायकवाड (कर्णधार), संजू सॅमसन (यष्टीरक्षक), आयुष म्हात्रे, मॅथ्यू शॉर्ट, शिवम दुबे, प्रशांत वीरजेमी ओव्हरटन, नूर अहमद, खलील अहमद, मॅट हेन्री, अंशुल कंबोज, राहुल चहर, श्रेयस गोपाल, सरफराज खान, मुकेश चौधरी, नॅथन एलिस, अकील हुसैन, झॅक फॉल्क्स, कार्तिक शर्मा, अमन खान, उर्विल पटेल, देवाल्ड ब्रेव्हिस (दुखापतग्रस्त), एमएस धोनी (दुखापतग्रस्त).
राजस्थान रॉयल्स: यशस्वी जैस्वाल, वैभव सूर्यवंशी, रियान पराग (कर्णधार), शिमरॉन हेटमायर, ध्रुव जुरेल (यष्टीरक्षक), रवींद्र जडेजा, दासुन शनाका, जोफ्रा आर्चर, संदीप शर्मा, रवी बिश्नोई, ॲडम मिल्ने, शुभम दुबे, डोनोव्हन फरेरा, लुआन-ड्रे प्रिटोरियस, रवी सिंग, युधवीर सिंग चरक, नांद्रे बर्गर, अमन राव पेराला






