Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • बुध, 9 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • Politics |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

RR Vs LSG Pitch Report: कशी असणार एकानाची खेळपट्टी; टॉस जिंकून ‘हा’ निर्णय घेतल्यास…

लखनौमध्ये सध्या कडाक्याचा उन्हाळा आहे. तापमानाचा पारा ४० अंश सेल्सिअसच्या आसपास असल्याने खेळपट्टी अधिक कोरडी झाली आहे. रात्रीच्या वेळी दव पडण्याची शक्यता खूपच कमी आहे.

  • By तेजस भागवत
Updated On: Apr 22, 2026 | 03:37 PM
RR Vs LSG Pitch Report: कशी असणार एकानाची खेळपट्टी; टॉस जिंकून 'हा' निर्णय घेतल्यास...

RR Vs LSG Pitch Report: कशी असणार एकानाची खेळपट्टी; टॉस जिंकून 'हा' निर्णय घेतल्यास...

Follow Us
Follow Us:

ऋषभ पंत अन् रियान पराग आमनेसामने
वैभव सूर्यवंशीच्या कामगिरीकडे लक्ष
राजस्थान विरुद्ध लखनौमध्ये सामना

Tata IPL 2026 Live LSG Vs RR Updates: आयपीएलचा थरार सुरू झाला आहे. चाहत्यांना रोज रोमांचक सामने पाहायला मिळत आहेत. दरम्यान आजचा देखील सामना रंगतदार असणार आहे. आयपीएल २०२६ च्या ३२ व्या सामन्यात आज लखनौ सुपर जायंट्स आणि राजस्थान रॉयल्स हे दोन बलाढ्य संघ समोरासमोर येणार आहेत. लखनौच्या (IPL 2026) भारतरत्न श्री अटल बिहारी वाजपेयी एकाना क्रिकेट स्टेडियमवर हा सामना रंगणार असून, दोन्ही संघांसाठी हा विजय महत्त्वाचा असणार आहे. या सामन्याचा पीच रिपोर्ट जाणून घेऊयात.

काय आहे आजच्या सामन्याचा पीच रिपोर्ट?

श्री अटल बिहारी वाजपेयी एकाना क्रिकेट स्टेडियमवरील खेळपट्टी ही संथ समजली जाते. तसेच खेळपट्टी कोरडी देखील आहे. यामुळे या ठिकाणी स्पिनर्सना मोठी मदत मिळू शकते. मधल्या काही ओव्हर्समध्ये फलंदाजांना रन्स करण्यासाठी संघर्ष करावा लागू शकतो. तसेच सामना सुरू झाल्यावर काही ओव्हर्स नवीन चेंडूने वेगवान गोलंदाजांना थोडा स्विंग मिळू शकतो. मात्र, जसा सामना पुढे जाईल, तसे स्लोअर बॉल्स आणि कटर्स टाकणाऱ्या गोलंदाजांना यश मिळू शकते. या मैदानावर फलंदाजी करणे सुरुवातीला सोपे असले तरी कालांतराने कठीण होते. पहिल्या डावातील सरासरी धावसंख्या 170 -185 च्या आसपास राहू शकते. स्टेडियम थोडे मोठे असल्याने षटकार मारणे इतर मैदानांच्या तुलनेत थोडे आव्हानात्मक आहे.

IPL 2025 : गूगलच्या सीईओलाही सकाळी उठायला भाग पाडले, Vaibhav Suryavanshi साठी सुंदर पिचाईची खास पोस्ट चर्चेत..

हवामान आणि दव फॅक्टर

लखनौमध्ये सध्या कडाक्याचा उन्हाळा आहे. तापमानाचा पारा ४० अंश सेल्सिअसच्या आसपास असल्याने खेळपट्टी अधिक कोरडी झाली आहे. रात्रीच्या वेळी दव पडण्याची शक्यता खूपच कमी आहे, त्यामुळे दुसऱ्या डावात गोलंदाजी करणाऱ्या संघाला फारशी अडचण येणार नाही.

कोणाचे पारडे जड?

राजस्थान रॉयल्सकडे रवी बिश्नोई आणि रवींद्र जडेजा सारखे दर्जेदार फिरकीपटू आहेत, तर लखनौच्या संघातही फिरकीची चांगली ताकद आहे. टॉस जिंकणारा संघ प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेऊ शकतो. खेळपट्टी संथ असल्याने पहिल्यांदा फलंदाजी करणे योग्य ठरेल.

SRH vs DC: कोण आहे Harsh Dubey? 20 व्या ओव्हरमध्ये 3 विकेट्स, IPL मध्ये अनोखा रेकॉर्ड

लखनौ सुपर जायंट्स: ऋषभ पंत (कर्णधार/यष्टिरक्षक), मिचेल मार्श, निकोलस पूरन, एडन मार्कराम, आयुष बदोनी, मोहम्मद शमी, मयंक यादव, आवेश खान, मोहसीन खान, अब्दुल समद, शाहबाज अहमद.

राजस्थान रॉयल्स: रियान पराग (कर्णधार), यशस्वी जयस्वाल, वैभव सूर्यवंशी, ध्रुव जुरेल (यष्टिरक्षक), रवींद्र जडेजा, शिमरॉन हेटमायर, जोफ्रा आर्चर, रवी बिश्नोई, संदीप शर्मा, तुषार देशपांडे, सॅम करन.

 

Web Title: Tata ipl live 2026 rr vs lsg spiners toss factor pitch report sports news

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Apr 22, 2026 | 03:37 PM

Topics:  

  • IPL 2026
  • RR vs LSG
  • Vaibhav Suryavanshi

संबंधित बातम्या

Duleep Trophy 2026: साऊथ झोनची झोप उडवली! Ishan Kishan 269 तर ईस्ट झोन 700 पार
1

Duleep Trophy 2026: साऊथ झोनची झोप उडवली! Ishan Kishan 269 तर ईस्ट झोन 700 पार

Duleep Trophy Final: राडा होणार, पोरं नाही ऐकणार; Vaibhav Suryvanshi तयार, तिलक-ईशान भिडणार
2

Duleep Trophy Final: राडा होणार, पोरं नाही ऐकणार; Vaibhav Suryvanshi तयार, तिलक-ईशान भिडणार

Vaibhav Sooryavanshi: वयवर्ष अवघे 15, वैभव सूर्यवंशीच्या नावे 6 ऐतिहासिक रेकॉर्ड्स; तोडणे असंभव
3

Vaibhav Sooryavanshi: वयवर्ष अवघे 15, वैभव सूर्यवंशीच्या नावे 6 ऐतिहासिक रेकॉर्ड्स; तोडणे असंभव

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.